Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारचे मंत्री ना.गिरीश महाजन व आ. राजुमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दिनांक 18.10.2025 रोजी माननीय आमदार श्री.सुरेश भोळे (राजुमामा)यांच्या हस्ते सौ.भारतीताई रंधे यांचा भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश संपन्न झाला.. प्रवेश घेतल्या वेळी आमदार राजुमामा भोळे,जिल्हाअध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उज्वला ताई बेंडाळे व अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेश शोहळ्यात सौ.भारतीताई रंधे यांच्या अंतर्गत कोमलताई वाडे, निलूताई इंगळे, दीपमाला सुरवाडे, पुष्पा तळेले,नंदा म्हस्के, उज्वला शेजवळ,कविता सूर्यवंशी,संगीता मोरे, सुवर्णा तायडे,प्रियांका रंधे, पुष्पा पाटील,विमल वाणी,रिंकू पाटील,वंदना बिऱ्हाडे, प्रतिभा शिंदे, धन्माला सुरडकर, शारदा सुरळके,सुनंदा चौधरी, दिक्षा सैंदाणे, मनीषा पाटील, छाया पाटील,रत्ना पाटील,अलका शिरसाठ, आशा खैरनार व आदी महिला उपस्थित…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. मात्र ही तुटपुंजी मदत करण्यात आल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. यावरूनच आता माजी मंत्री बच्चू कडू सोयाबीन खरेदी केंद्रावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांसाठी 21, 22 तारखेपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न केल्यास पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू, असा थेट इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांनी काल नांदेड दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकतो. शेतकऱ्यांचे आयुष्यच अंधारात आहे. दिवाळीचा काय विषय आहे. फडणवीस साहेब म्हणतात, सगळ्यांना एकरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून मारहाण करण्यासह चाकूने वार करून शंतनू चंद्रकांत गुरव (वय १९, रा. पंढरपूर नगर) या तरुणाच्या खिशातून दोन हजार रुपये जबरीने काढून नेले. तसेच तरुणाच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. ही घटना दि. १५ ऑक्टोबर रोजी रात्री एमआयडीसी परिसरात घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंढरपूर नगरात शंतनू गुरव हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १५ रोजी शंतनू हा त्याचा मित्र अनिकेत उर्फ सोनू राजू निंबाळकर हे औद्योगिक वसाहत परिसरात एका हॉटेलजवळ उभे होते. त्याठिकाणी दीपक पटेल, कुणाल पाटील, राहुल भोसले, प्रवीण राठोड (सर्व रा. कुसुंबा, ता. जळगाव) हे आले. त्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी इलेक्ट्रीक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग लागून दोन झेरॉक्स मशिन, लॅपटॉपसह दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी ठेवलेले सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास स्वातंत्र्य चौकातील मोहीते बिल्डींग परिसरात घडली. ऐन दिवाळीत दुकान जळून खाक झाल्यामुळे विक्रेता हवालदिल झाला होता. आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणपती नगरातील रहिवासी हेमंत अर्जुन चौधरी यांचे शहरातील स्वातंत्र्य चौकातील मोहिते कॉम्प्लेक्समध्ये इलेक्ट्रीकल, कटलरी, झेरॉक्सचे दुकान आहे. या ठिकाणी कलर व ब्लॅक अँड व्हाईट अशा दोन झेरॉक्स मशिनसह दोन लॅपटॉप, प्रिंटर, इलेक्ट्रीक फिटींगचे साहित्य, अन्य इलेक्ट्रीकल वस्तूंसह कटलरी साहित्यही ठेवलेले होते. तसेच चौधरी यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेल्या ६३ मोबाइलचा सायबर पोलिसांनी शोध लावून ते हस्तगत केले. हे मोबाईल शनिवारी (१८ ऑक्टोबर) जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले. दिवाळी सणात मोबाइल परत मिळाल्याने सर्वाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाइल गहाळ झाले होते. या संदर्भात त्या-त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोंद होती. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक गणेश यांच्या अहिरे मार्गदर्शनाखाली पोहेकों किरण वानखेडे, हेमंत महाडिक, पोलिस नाईक सचिन सोनवणे, पोकों पंकज वराडे, गौरव पाटील, मिलिंद जाधव, दीपक पाटील यांनी शोधमोहीम राबविली. महागडे मोबाईल हरविल्यानंतर ते सापडणार नाही,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित “पाडवा पहाट” या कार्यक्रमाचे सालाबाद प्रमाणे आयोजन करण्यात आलेले आहे. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पहाट गेली २३ वर्षे प्रतिष्ठान साजरी करीत आलेले आहे. यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. ही प्रात:कालिन मैफल ठीक ६ वाजता महात्मा गांधी उद्यानात आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी राष्ट्रीय कीर्तनकार, अनेक संगीत नाटकांमध्ये गायकांची भूमिका सादर करणारे प्रख्यात गायक पंडित चारुदत्त आफळे हे यंदाचे कलाकार असून त्यांना तबल्याची संगत रामकृष्ण करंबेळकर ऑर्गन ची संगत राहुल गोळे तर व्हायोलिनची संगत प्रमोद जांभेकर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी कै. नथ्थू शेट चांदसरकर ट्रस्ट तसेच भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे…

Read More

आजचे राशिभविष्य दि. १९ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, तुमच्या सर्व समस्या लवकरच सुटतील. सरकारी कामात तुम्हाला लक्षणीय फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या मुलांसोबत पिकनिकला जाऊ शकता आणि त्यांच्यासोबत तुमचा वेळ खूप छान जाईल. आज तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. वृषभ राशी आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला आहे; तुम्हाला नवीन व्यवसाय कराराची ऑफर मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घरातील कामे पूर्ण करण्यात व्यस्त असाल. आज व्यवसायात सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धनधान्य वाढेल. मिथुन राशी आज तुम्ही जे काही हाती घ्याल ते यशस्वी होईल. तुमच्या सकारात्मक विचारसरणीचे सकारात्मक परिणाम होतील. तुमच्या राहणीमानाची आणि बोलण्याची पद्धत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी स्थानिक निवडणुकीसाठी सर्वांनी आपआपल्या पद्धतीने तयारी सुरु केली असताना आता कालच मनसेच्या वतीने आयोजित दीपोउत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्धघाटन उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांंनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही, पण ठाकरे फॅमिली पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी दिपावळीच्या शुभेच्छा दिल्या. आज माध्यमांशी संवाद साधताना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार आहेत, अशी मोठी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दोन ठाकरे…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार पक्षाचे मंत्री छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर असून त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो, मंत्री मंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर, मग मंत्रिमंडळात का रहावे, असा प्रश्न उपस्थित करत राजीनामा देण्याचे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सूचवले आहे. भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा तिटकारा आहे, तर त्यांनी मंत्रिमंडळात गेल नाही पाहिजे, तिकडे ढुंकूनही नाही पाहिले पाहिजे. यामागे राज्य सरकार तर खेळ करत नाही का?, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यातील नेतृत्व करणाऱ्या लोकांचा उद्देश दिसतो. कारण, सदन घोटाळ्याचे मोठे मोठे भाषण हे देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्यांना जेलमध्ये भाजपने टाकले. याच भाजपच्या कृपेने…

Read More

दौंड : वृत्तसंस्था दौंड शहर हे मिनी भारत आहे. येथे सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. शहर दोन भागांमध्ये विभागले असले, तरी इथली एकजूट मोठी आहे. सत्तेचा अहंकार न ठेवता लोकांची कामे प्रामाणिकपणे करावी, ‌’चार दिवस सासूचे असतात, तर चार दिवस सुनेचे‌’, त्यामुळे राजकारणात कोणीही माज करू नये, अशा शब्दांत सज्जड दम उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला. दौंड येथे शुक्रवारी (दि. 17) दौंड शहर भाजपचे माजी अध्यक्ष स्वप्निल शहा यांच्यासह नंदूभाऊ पवार आणि मनोज फडतरे तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळा प्रसंगी पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार…

Read More