मुंबई : वृत्तसंस्था यंदा श्री. क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक- प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातुन एसटी महामंडळ तब्बल ११५० जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली. पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या ‘ चंद्रभागा ‘ या यात्रा बसस्थानकावरून दिनांक २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे. या बसस्थानकावर १७ फलाट असून सुमारे १००० बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे. तसेच सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय देखील या बसस्थानकामध्ये करण्यात आली आहे. प्रत्यक्ष यात्रे…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मुसळधार पावसामुळे राज्यातील बळीराजा कोलमडला आहे. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. यातच आता पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भावर अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. हे सावट पुढचे चार-पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणासह राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.…
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी दांपत्य सहभागी होत असते, मात्र आता या महापूजेमध्ये जिल्हा परिषदेचा एक विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश करण्याची मागणी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. या मागणीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले असले तरी, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा मूळ अधिकार हा शासनाकडेच असणार आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असल्याने, शिक्षण मंत्र्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी केलेली जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या समावेशाची मागणी एक नवीन परंपरा सुरू करू शकते. यावर वारकरी संप्रदायाची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी 1997…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका चित्रपटगृहातील शौचालयामध्ये गेलेल्या तरुणीचे शेजारील शौचालयातून अर्धनग्न चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शाहूनगरनजीक एका मॉलमधील चित्रपटगृहात घडली. याप्रकरणी १७वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ठाणे येथील १९ वर्षीय तरुणी दिवाळीनिमित्त जळगावात तिच्या मामाकडे आली होती. २४ ऑक्टोबर रोजी ती तिच्या आई व मावशीसह चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. संध्याकाळी चित्रपट संपल्यानंतर सदर तरुणी शौचालयात गेली. त्यावेळी शेजारील शौचालयातून एक मुलगा मोबाइलमध्ये तिचे चित्रीकरण करीत असल्याचे तिला दिसले. त्यावेळी तरुणी घाबरलेली असल्याने तिने तक्रार दिली नाही. मात्र याप्रकरणी तिने २४ ऑक्टोबर रोजी शहर…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण गंभीर झाले. त्यात एक सहा वर्षीय बालिकेचा पाय निकामी झाला, तर दुसऱ्या अपघातात साठ वर्षीय महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. २५ रोजी रात्रीच्या सुमारास पाऊस सुरू होता. यावेळी बोदवडहून दुचाकीने साळशिंगीकडे जाताना पुढे चालणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने दुचाकी व डम्परमध्ये धडक झाली. त्यात मामाच्या घरी भाऊबीजेनिमित्त आलेली मृणाली गोकुळ हिवाळे (वय ६, रा. मोहाडी, जळगाव) या बालिकेच्या डाव्या पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर सोबतचे दोन जण जखमी झाले. दुसऱ्या घटनेत २६ रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जामनेरहून मुक्ताईनगरकडे जाणारी चारचाकी बोदवडच्या बरडीया शाळेसमोर उलटली. त्यात कमलबाई जीवनगीर…
आजचे राशिभविष्य दि.२७ ऑक्टोबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. हा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने अधिक फलदायी ठरेल. कामात आज तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्यातील उत्तम बोलण्याची कला आणि आर्थिक व्यवस्थापन क्षमता याचाही तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत अविस्मरणीय क्षण घालवू शकाल. शिक्षण क्षेत्रात आज विद्यार्थ्यांना यश मिळेल. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायक ठरणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात कोणतीही मोठी डील मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी वेळ घालवाल. तुम्हाला नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते. संध्याकाळी तुमच्या घरी एखादा मित्र…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी “मी 10 वर्ष नगरसेवक होतो. आता चार टर्मचा आमदार आहे. झाले तेवढे पुरे, आता थांबले पाहिजे” असे वक्तव्य करून आपल्या समर्थकांना ऐन दिवाळीतच धक्का दिला आहे. संजय शिरसाट यांनी या वक्तव्यामुळे राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले की, कुटुंबातील नव्या पिढीला पुढे आणण्यासाठीची ही भूमिका आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय शिरसाट यांचे हे वक्तव्य रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर समोर आले आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या 5 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांनी रान पेटवले आहे. आज त्यांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा…
मुंबई : वृत्तसंस्था आगामी स्थानिक निवडणुकीपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाची भेट घेवून आपली प्रतिक्रिया दिली होती आता १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता **’ऍक्शन मोड’**मध्ये आले आहेत. पक्षाने राज्याच्या निवडणूक आयोगाला धारेवर धरण्यासाठी आणि मतदार यादीतील त्रुटी (घोळ) समोर आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मोर्चाच्या तयारीचा एक भाग म्हणून, राज ठाकरे यांनी थेट मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांकडून अहवाल मागवला आहे. मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना आपापल्या भागातील मतदार यादीचा सखोल अभ्यास करून, त्यातील दुबार नावे, चुकीचे पत्ते किंवा बोगस मतदारांसारखे सर्व घोळ शोधून काढण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. मनसेने १ नोव्हेंबरच्या विराट मोर्चाआधी…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विटनेर येथील शिवदास रामा पाटील वय ३४ वर्षे या तरूणाने रात्री १०वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेतला ही घटना घरच्यांच्या लक्ष्यात आल्यावर त्यांनी १२:३० वाजता जळगाव जिल्हा रुग्णालयात मयत स्थितीत दाखल केले होते .शिवदास पाटील यांच्यावर आज २६ रोजी दुपारी २:३०वाजता विटनेर येथे अंतसंस्कार करण्यात आले. मयत शिवदास पाटील हे आई,पत्नी व दोन मुलांसह राहत होते यांच्याकडे तीन ते चार एकर शेतजमीन असून ते शेती करून आपल्या परीवाराचे पालन पोषण करत होते या वर्षी त्यांनी शेतात कापूस या पिकाची लागवड केली होती मात्र सततच्या पावसामुळे शेतातील कापसाचे पीक खराब झाल्याने ते नैराश्यात होते त्यातुन त्यांनी…
सातारा : वृत्तसंस्था जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी फरार झालेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा शरण आला. तत्पूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकरला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. मृत डॉक्टर फलटणला ज्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती, त्याचा प्रशांत बनकर हा मुलगा आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वीच्या सुसाइड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक बदनेने माझ्यावर ४ वेळा अत्याचार केला, असे म्हटले होते. तो फरार झाला होता. त्याचा शोध सुरू असताना तोच शरण आला. दुसरीकडे या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान, वडवणी (जि. बीड) तालुक्यातील मूळ…

