Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत ते बरळत असून इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर आहेत, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. बावनकुळे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देशभर फिरून संघटन उभे करतात. राजकारणाला गती देतात. इतकेच नाहीतर 370 कलम रद्द करून इतिहास रचतात. पण उद्धव ठाकरे घरात बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर टीका करतात. या अजगराने स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं,वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळलं. 25 वर्षे मुंबई गिळंकृत केली. तो अजगर आज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील चोरट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, राजकीय नेत्यांची घरेसुद्धा सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ बंगल्यात ही चोरी घडली आहे. एकनाथ खडसे हे बहुतांशी मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील बंगला बंद होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे खडसे यांचे कर्मचारी बंगल्यावर आले असता त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले पाहिले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, आतील सर्व सामान अस्ताव्यस्त…

Read More

चोपडा : प्रतिनिधी शहरा बाहेरील शिरपूर बायपासजवळील रणगाडा चौकात मध्यरात्री सुमारे २:३० वाजेच्या सुमारास रस्ता लुटीच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीपसिंग हरिसिंग पवार (३६, नांदेड), विक्रम बाळासाहेब बोरगे (२४, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर), अनिकेत बालाजी सूर्यवंशी (२५, नांदेड), अमनदीपसिंग अवतारसिंग राठोड (२५, नांदेड), सद्दाम हुसेन मोहम्मद अमीन (३३, नांदेड), अक्षय रवींद्र महाले (३०, भावसार गल्ली, चोपडा) आणि जयेश राजेंद्र महाजन (३०, भाट गल्ली, चोपडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या ठिकाणी चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाल्यावर त्यांनी तत्काळ पोलिस पथक पाठवून चौकशी केली. चौकशीदरम्यान, सात गुन्हेगारांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज शाखेच्या वतीने २०२५-२०२६ या वर्षासाठी १४ वाळू घाटांच्या वापर, उत्खननासाठी ई-निविदा आणि ई लिलाव प्रक्रियेची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली आहे. सोमवारी सकाळी १०:०० वाजता ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून, १० नोव्हेंबरपर्यंत नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. प्रक्रियेनुसार ३० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर ११ नोव्हेंबर रोजी तांत्रिक निविदा आणि १२ नोव्हेंबर रोजी आर्थिक निविदा उघडण्यात येणार आहे. अंतिम ई-लिलाव प्रक्रिया १३ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी घोषित केला जाणार आहे. निविदांची नोंदणी- १० नोव्हेंबर निविदांची छाननी- ११ नोव्हेंबर निविदा उघडणार- १२ नोव्हेंबर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घरातील सदस्य जेजुरी येथे देवदर्शनाला गेलेले असताना खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ४० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (२६ ऑक्टोबर) धानवड येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील धानवड येथील भिकन शंकर पाटील (६२) हे २३ ऑक्टोबर रोजी ते कुटुंबासह जेजुरी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या स्लायडिंग खिडकीचे लॉक तोडून आत प्रवेश केला. शोकेसच्या लॉकरमधून रोख ४० हजार रुपयांसह २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा…

Read More

आजचे राशिभविष्य दि. २८ ऑक्टोबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा आणि धाडसाचा आहे. आज तुमच्यात वेगळाच उत्साह असेल. ज्यामुळे कामामध्ये गती येईल. कामानिमित्त लांबचे प्रवास संभवतात. हे प्रवास फलदायी ठरतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक घटना घेऊन येणारा आहे. वाहने आणि द्रुतगती प्रवासाची विशेष आवड राहील. वृषभ राशी वृषभ राशीसाठी आज अचानक धनलाभाचे योग जुळून येतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल, पण आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला लगेच मिळेलच असे नाही, त्यामुळे धीर धरा आणि आपले काम सातत्याने सुरू ठेवा. मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींना आज जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. त्यांच्या पाठिंब्यामुळे…

Read More

पाळधी : प्रतिनिधी मैत्रीचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांसोबत असणं, फक्त आनंदात नाही तर आठवणींतही. त्या भावनेला साजेसं उदाहरण ठरलं आहे जीपीएस ग्रुप मित्र परिवाराचं एक अनोखं कार्य. जीपीएस मित्र गृपचे सक्रिय सदस्य स्व. अनिल आत्माराम महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या जीपीएस गृपने एक आगळंवेगळं आणि समाजाभिमुख पाऊल उचलत पाळधी गावातील स्मशानभूमी दत्तक घेऊन तिच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अल्पशा आजाराने अनिल महाजन यांचं निधन झालं होतं. त्या काळात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली आणि त्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी निवडणुकीचं संपूर्ण प्रचारकार्य…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. विना परवाना गावठी पिस्तुलसह कोयता घेवून दहशत माजविणारा हद्दपार आरोपी तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचननगर), खुशाल पितांबर सोनार (वय २१) व चेतन पितांबर सोनार (वय २३, दोघ रा. पार्वताबाई ओक नगर) यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई दि. २५ रोजी रात्री नेहरु नगरात केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातून हद्दपार असलेला तेजस सोनवणे याच्यासाह खुशाल सोनार व चेतन सोनार हे तिघे शहरातील नेहरु नगरातील संदीपनी बॉईज हॉस्टेजवळ गावठी पिस्तुल व कोयता घेवून दहशत माजवित होते. याबाबतची…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील उंदिरखेडे गावात एका होतकरू अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सचिन गणेश चांदवडे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो ‘जमतारा २’ आणि ‘असुरवन’ या वेब सीरिजमध्ये झळकणार होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने उंदिरखेडे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन चांदवडे हा स्वप्नाळू आणि होतकरू अभिनेता म्हणून ओळखला जात होता. अभिनयाची आवड जोपासत असतानाच तो पुण्यातील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत होता. कामाच्या व्यापातही तो अभिनय क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी झटत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला दोन वेगवेगळ्या वेब सीरिजमध्ये भूमिका मिळाली होती, ज्यामुळे त्याच्या मित्रपरिवारात आणि गावात…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर येथील कार्यालयात चक्क लावणीचा कार्यक्रम घेण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, त्यात एक महिला कार्यकर्ती लावणी सादर करताना दिसून येत आहे. याविषयी समाज माध्यमांत उलटसुलट चर्चा रंगली आहे. अजित पवारांनी दोन महिन्यांपूर्वी नागपुरातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. राष्ट्रवादीच्या नागपूर शहराध्यक्षांनी नुकताच या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने 2 गाण्यांवर लावणी सादर केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला त्यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित…

Read More