मुंबई: वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची महत्वाची लाडकी बहिण योजना आता आपले पहिले वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मात्र, योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिल्या हप्त्यासाठी राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून, त्यांच्या नजरा आता बँक खात्याकडे लागल्या आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. योजनेच्या पहिल्या वर्षातील सर्व १२ हप्त्यांचे लाभ वेळेवर दिले गेले, ज्यामुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता योजनेचे दुसरे वर्ष सुरू झाले आहे. मात्र, दुसऱ्या वर्षातील पहिला हप्ता…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील कोदगाव बायपास परिसरात दुचाकी अन् पिकअप वाहन यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या अपघातातील मयत व्यक्तींची उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. शहरातील कोदगाव बायपास परिसरात आज झालेल्या भीषण अपघातात दुचाकी (एमएच-२०, सीएक्स- २०५१) आणि पिकअप वाहन (एमएच २०, जीझेड- १८४४) यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात इतका जबरदस्त होता की, अपघातात पिकअप रस्त्यावर उलटली तर दुचाकीला जबर धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३७ वर्षीय महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुरेश गायकवाड याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला घरी एकटी असताना, संशयित सुरेश गायकवाड सकाळी ९ च्या सुमारास अचानक घरात घुसला. महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. हे होत असताना महिलेने आरडाओरड केल्यामुळे शेजारी धावत आले. ते पाहून संशयित गायकवाड तेथून पसार झाला. या घटनेची माहिती समजताच, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तत्काळ देवळी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. संशयित सुरेश गायकवाडला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जळगाव : प्रतिनिधी कामावरून घरी जात असलेल्या संजय सुपडू मालचे (५०, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या डोक्यात दुचाकीवरील एका जणाने बीअरची बाटली मारून दुखापत केली. याविषयी इसमाने जाब विचारला असता त्यांच्या छातीत दगड मारला. ही घटना २० जुलै रोजी रात्री बी.जे. मार्केट परिसरात घडली. रात्रीच्या वेळी मद्यपींच्या टवाळखोरीला आळा घालावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, एका हॉटेलमध्ये कामाला असलेले संजय मालचे हे काम आटोपल्यानंतर रात्री पायी घरी जात होते. ते बी.जे. मार्केटजवळ असताना एका दुचाकीवर तीन जण आले. त्यातील मागे बसलेल्याने मालचे यांच्या डोक्यात बीअरची बाटली मारली. यामध्ये मोठा रक्तस्त्राव होऊन ते रक्तबंबाळ झाले. त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून आपापसामध्ये सुरू असलेल्या धुसफुशीचे पर्यवसान दगडफेकीत होऊन दोन जण जखमी झाले. या घटनेने रामेश्वर कॉलनी परिसरातील स्वामी समर्थ केंद्र चौकात रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना मंगळवारी (२२ जुलै) रात्री नऊ वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर कॉलनीत एका मेडिकलवर असलेल्या तरुणाला कामावरून कमी केल्याने गेल्या काही दिवसांपासून दोन गटांत धुसफुस सुरू होती. मंगळवारी रात्री परिसरातील काही तरुण एका अपार्टमेंटजवळ उभे होते. यावेळी दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरून आले. त्यांनी तेथे उभ्या असलेल्या तरुणांवर अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात सागर पाटील आणि मनोज निंबाळकर हे जखमी झाले.…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील खेडी रोडवर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. घरी सोडतो असे सांगून दुचाकीवरून एका ३५ वर्षीय महिलेला जंगलात नेऊन तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. पीडित महिला ही आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास खेडी रोडने जात असताना दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाले आणि शंकर भगवानसिंग भिलाले (तिघेही रा. भुसावळ) यांनी तिला घरी सोडण्याचा बहाणा करत दुचाकीवरून जवळच जंगलात नेले. तेथे तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार…
मेष : दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. विरोधकही सहकार्य करतील. तुम्ही नवीन काम सुरू करू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस सकारात्मक राहील. नफा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करावा, त्यांना यश मिळू शकते. वृषभ : कामाच्या ठिकाणी नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जुने काम सोडून देऊ शकता. नवीन काम सुरू करणे शक्य आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक खरेदीमध्ये खर्च होऊ शकतो. अभ्यासात रस वाढेल, तुम्हाला यश मिळेल. मिथुन : कामात अस्थिरता असेल. बाह्य सहल शक्य आहे, परंतु यश संदिग्ध आहे. पूर्ण झालेले काम बिघडू शकते, सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. खर्च वाढू…
बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर सहकऱ्यांची दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर ७ जुलै रोजी युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादानंतर देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने दोषी नसल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला होता. या अर्जावर आज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. आरोपी दोष मुक्तीसाठी स्वतंत्र अर्ज करुन कोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आरोपींचे दोष मुक्तीचे अर्ज फेटाळण्यात आले. संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणात 4 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी…
नाशिक : वृत्तसंस्था राज्याच्या विधीमंडळ सभागृहातच मोबाईलवर रम्मी खेळत असल्याच्या व्हिडिओवरुन वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादगग्रस्त वक्तव्य केले आहे. १ रुपया पीक विमा प्रश्नी बोलताना मंगळवारी (दि.२२ जुलै) कोकाटे यांनी ‘शेतकरी भिकारी नाही, तर शासन भिकारी आहे’, असे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांकडून शासन १ रुपया घेत नाही. शासन भिकारी आहे, शेतकरी नाही. पीक विम्याची १ रुपया किंमत खूप थोडी आहे. १ रुपये पीक विम्यामुळे पाच- साडेपाच लाख बोगस अर्ज सापडले. ते मी रद्द केल्याचे कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी पुरनाड पुलाचे काम मंगळवारी आज दि. २२ जुलै सकाळी पोलिस बंदोबस्तात पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी आंदोलन सुरू केले. पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना अडवले आणि काहींना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काम थांबवण्याची मागणी केली. प्रांताधिकाऱ्यांनी महामार्गाचे काम सुरूच राहील, असा ठाम पवित्रा घेतल्याने आमदार संतप्त झाले आणि त्यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले. पोलिसांनी अनेक वेळा विनंती करूनही आमदारांनी आंदोलन मागे घेतले नाही, त्यामुळे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. उल्लेखनीय म्हणजे, इंदूर राष्ट्रीय महामार्गाच्या या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून त्यांना…

