Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीने निवडणुकी दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप कुठलीही कर्जमाफी होत नसल्याचे विरोधकाकडून नेहमीच टीकास्त्र सोडले जात आहे. आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. परतवाडा येथे टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला आहे. तसेच आंदोलकांकडून ‘जय जवान जय किसान’…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभेत रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून अडचणीत सापडलेले तसेच वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्री पद काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्याकडील खाते हे मदत आणि पुनर्वसनमंत्री असलेले मकरंद पाटील यांच्याकडे देणार असल्याचे बोलले जात आहे. तर त्यांच्याकडील खाते माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनकाळात विधान परिषदेत कामकाज सुरू असताना मंत्री कोकाटे हे मोबाइलवर रमी खेळताना दिसून आले होते. त्यावर विरोधकांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. कोकाटेंनी काहीही सांगितले तरी सरकारसाठी ते भूषणावह नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष…

Read More

भडगाव : प्रतिनिधी भोरटेक येथे एका शाळकरी विद्यार्थ्याला एसटी बसने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी घडली असून, जखमी विद्यार्थ्याला चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, नाशिक येथून सोयगाव येथे जाणारी बस (एमएच१४/एमएच३७९१) ही भोरटेक गावाजवळ आली असता, शाळेतून सायकलने घरी जाणाऱ्या कुणाल किशोर वाघ (१४, भोरटेक) या विद्यार्थ्याला मागून जोरदार धडक दिली. बसच्या पुढील चाकामुळे कंबरेला आणि पायाला दुखापत होऊन गंभीर जखमी झाला आहे. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत, जखमी कुणाल वाघ याला पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच, फौजदार लक्ष्मी करनकाळ, पोलिस हवालदार रवींद्र पाटील, दत्तू पाटील यांनी घटनास्थळी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य केली असून, मंगळवारी दोन घरफोड्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी बंद घरांमध्ये प्रवेश करत सुमारे १ लाख ५३ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज आणि रोकड लंपास केली. सविस्तर वृत्त असे कि, ईश्वर कॉलनी परिसरात सोमवारी, दि. २१ जुलै रोजी दुपारी एका बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. फकरोद्दीन बदामी हे बाहेरगावी गेल्याने घर बंद होते. चोरांनी २१ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून १० ग्रॅम वजनाचे ३ सोन्याचे शिक्के, १५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील नहाटा चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील झाडांच्या कुंड्यांची रखवाली करणाऱ्या वॉचमनवर दारूच्या नशेत आलेल्या इसमाने विनाकारण मारहाण करून त्याच्याकडील ८०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले, तसेच मध्यस्थी करणाऱ्या दोन तरुणांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना २२ जुलै रात्री घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, वॉचमन राजू पंडित ठाकूर (वय ६०, रा. दीनदयाल नगर, भुसावळ) हे महामार्गावर लावलेल्या झाडांच्या कुंड्यांची निगा राखण्याचे काम करत होते. त्यावेळी गौरव पाटील नावाचा इसम दारूच्या नशेत आला आणि कुंड्यांची तोडफोड करू लागला. त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने वॉचमनला लाथाबुक्क्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर (वय ४९) आणि खासगी एजंट संजय प्रभाकर दलाल (वय ५८, रा. शिवकॉलनी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. ग्रामपंचायत व सदस्यांविरुद्ध दाखल अतिक्रमण प्रकरणाच्या कागदपत्रांच्या नकला काढून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने १६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या गावातील ग्रामपंचायत आणि सदस्यांविरुद्ध दाखल अतिक्रमणाच्या कागदपत्रांच्या नकला मिळवण्यासाठी अर्ज केला होता. तक्रारदार वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील खाते अभिलेख विभागातील सहायक महसूल अधिकारी प्रशांत ठाकूर आणि संजय दलाल यांना भेटत होते. त्यांनी नकला काढून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच…

Read More

मेष राशी तुम्हाला आजचा दिवस चांगला असेल. जर तुम्ही आज पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळतील. जर तुम्ही भागीदारीत कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर आज सावधगिरी बाळगा, तुमची फसवणूक होऊ शकते. आज तुम्ही लोकांबद्दल मनापासून चांगला विचार कराल, परंतु लोक स्वार्थी वागतील. तुम्ही कोणतेही काम करा, पण आधी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या, नंतर त्यात पुढे जा. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करा. कुटुंबातील सदस्य तुम्ही दिलेल्या सल्ल्याचे पालन करतील. वृषभ राशी या राशीसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकता. कुटुंबातील सदस्यांशी काही वाद होण्याची शक्यता आहे.…

Read More

बीड : वृत्तसंस्था परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. वाल्मीक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महादेव मुंडेंना हालहाल करून मारल्याचा आरोप विजय बांगर यांनी केला आहे. महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या हत्येचे फोटोही विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. महादेव मुंडे हत्येप्रकरणात त्यांच्या पत्नीच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने एसआयटी नेमली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही SIT नेमण्याची मागणी केली होती. या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे वाल्मिक कराडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना झालेल्या महाराणी नंतर आरोपी असलेले सूरज चव्हाण आणि त्यांच्यासोबतच्या 9 पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना शरण जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. सूरज चव्हाण यांच्यासह नऊ जण लातूरच्या विवेकानंद पोलिस ठाण्यात शरण आले होते. सकाळी त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली. या सर्व प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळे या विषयी पुन्हा एकदा वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील दोन दिवसापासून पोलिसांची दोन पथके सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या शोधात होती. या प्रकरणात 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतले होते. तर सूरज चव्हाण आणि इतर 9…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधि मंडळामध्ये पत्ते खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारला होता. यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावाच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून या माध्यमातून आता तटकरे यांना छावा संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. इतकेच नाही तर त्यांना विविध फोन कॉलच्या माध्यमातून धमकी वजा इशारा देखील देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. या सर्व घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. या संदर्भात…

Read More