Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारसाठी महत्वाची योजना म्हणून लाडकी बहिण योजनेकडे पाहिले जात आहे. या ‘लाडकी बहीण’ योजनेनुसार फक्त वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. विशेष म्हणजे, कार्यरत सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी यांना या योजनेतून लाभ घेण्यास स्पष्ट मनाई आहे. तरीही काही महिलांनी जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक केली. महिला व बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने अशा सर्व बोगस लाभार्थींची यादी तयार केली आहे. या यादीत जिल्हा परिषदेतील कर्मचारी, शिक्षक, विविध शासकीय विभागातील महिला कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचारी अशा 8 हजारांपेक्षा अधिक महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील शनिमंदिर वॉर्डात राहणाऱ्या चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, जेव्हा त्यांच्या १८ वर्षीय मुलाने, वडिलांनी रागावल्याच्या कारणावरून मानसिक तणावात येत तापी नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. उडी मारण्याआधी त्याने आपल्या मित्राशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधत, “घरचे टेन्शन आहे… मी तापीत उडी घेतोय”, असे सांगितले आणि नंतर फोन बंद केला. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय नीलेश चौधरी (वय १८) असे या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजता तो तापी नदी पुलावर गेला. तिथून त्याने कंडारी येथील मित्र विजय बोदडे याला व्हिडिओ कॉल केला. संवादाच्या दरम्यान अक्षय रडू लागला आणि त्याने थेट नदीत उडी मारल्याचे विजयने सांगितले.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मराठावाड्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचे थैमान सुरु असून आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये पाच दिवसांसाठी मध्यम पावसाचा इशारा देत पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे. यापैकी दोन जिल्ह्यांमध्ये – चंद्रपूर आणि यवतमाळ – गुरुवारी – ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पिवळा इशारा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दर्शवितो, तर ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देतो. आयएमडीच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान नागपूर, बुलढाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. पुढील काही तासांत यवतमाळ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टोलच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. गडकरी यांनी टोलच्या माध्यमातून जनतेचा पैसा त्यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये वळवला असून, त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांना याचा थेट फायदा झाला असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या आरोपांना भारतीय जनता पक्षाने (भाजप) तथ्यहीन आणि बदनामीसाठी केलेले जुने आरोप असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. दमानियांचे आरोप काय? अंजली दमानिया यांनी गडकरींवर टोल व्यवस्थापन आणि रस्ते बांधणीच्या कंत्राटांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, “नागरिक रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटीसारखे कर भरत असताना टोल का…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय आयनोव्हा २०२५ स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आयटी क्विझ, गेमेथॉन, थिंकर टँक व पोस्टर प्रेझेंटेशन अशा आकर्षक उपक्रमांचा समावेश होता. पदवी तसेच पदव्युत्तर गटांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून वातावरण उत्साही केले. या उपक्रमाचे विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम २४ विद्यार्थी स्वयंसेवक यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राकेश जगदीश रामटेके (वरिष्ठ प्राध्यापक व संचालक, संगणकशास्त्र शाळा, प्रमुख – डॉ. आंबेडकर विचार विभाग, समाजशास्त्र शाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. प्रा. डॉ. राकेश रामटेके यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाचे माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री. सचिन जगन्नाथ पवार यांची अखिल भारतीय सरपंच परिषद उत्तर महाराष्ट्र विभाग संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सरपंच कार्यकाळात श्री. पवार यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले असून, त्याचे सकारात्मक परिणाम संपूर्ण परिसरात पाहायला मिळाले. त्यांच्या या कार्याची दखल घेत परिषद अध्यक्षांनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील सरपंच बांधवांना मार्गदर्शन व सहकार्य मिळणार असून, गावपातळीवर अधिक सक्षम नेतृत्व तयार होण्यास हातभार लागणार आहे. या निवडीबद्दल राज्याचे माननीय पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान सिंधी कॉलनी परिसरात ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. या कारवाईत एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला दि. २१ रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोउनि. शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. सिंधी कॉलनीतील नवजीवन सोसायटी येथे प्रकाश हुंदामल कारडा (५५) आणि रणजीत चत्रभान हंडी (३५, रा. गणपतीनगर, जळगाव) हे दोघे ऑनलाइन सट्टेबाजी करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉपसह १,०५,००० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी भुसावळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात लाच घेण्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना आता जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत (वय ३८, रा. पिंप्राळा) यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (२४ जुलै २०२५) रोजी जळगावात करण्यात आली. तक्रारदार हे जळगाव येथील दिव्यांग समिश्र केंद्रात प्रभारी अधीक्षक पदावर काम करत आहेत. जून महिन्याच्या पगारासाठी बिल मंजूर करून पुढे पाठवण्यासाठी अधिकारी माधुरी भागवत यांनी १२ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिल्याने त्यांनी २२ जुलैला एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर खात्री झाल्यानंतर एसीबीने सापळा रचून २४ जुलै रोजी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील वराड येथील १९ वर्षीय तरुण हर्षल राजू पाटील याचा शनिवारी, १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला, तर हर्षलचा मित्र कुणाल गोकुळ पाटील (रा. वराड) गंभीर जखमी झाला. या घटनेप्रकरणी बुधवारी, २३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात डंपरवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पाटील हा आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत वराड गावात राहत होता. बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत मारुती मंदिरात दर शनिवारी जिल्ह्यासह बाहेरून अनेक भाविक दर्शनासाठी जातात. याच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात आता आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता फेसबुकवर पोस्टवार सुरु झाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी फेसबुकवर आ.खडसे यांना प्रफुल्ल लोढा गुलाबाचे फुल देत असल्याचा फोटो व्हायरल केल्यानंतर आता आ.खडसे यांनी देखील त्यांना आक्रमक पद्धतीने सोशल मिडीयावर उत्तर दिले आहे. आ.खडसे यांची हीच ती पोस्ट  गिरीश महाजन…आज सकाळी तुम्ही हा फोटो फेसबुक वर व्हायरल केला आहे… होय,.. या फोटोमध्ये गाडीत मीच बसलोय, आणि लोढाच मला रस्त्यात फुले देऊन माझे स्वागत करतोय. कारण तेव्हा लोढा मला तुमच्या करनाम्यांची सीडी देणार होता. त्यामुळे पुढे तुम्ही उघडे पडणार होता. यातील…

Read More