नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी देण्याची शक्यता आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीची उत्सुकता लागली होती. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आजच्या नियोजित मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकतो. सरकारकडून दरवर्षी जानेवारी आणि जुलै मध्ये महागाई भत्ता आणि महागाई सवलत मध्ये द्वैवार्षिक सुधारणा केली जाते, जेणेकरून कर्मचारी आणि निवृत्त लोकांना महागाईच्या वाढत्या दरापासून संरक्षण मिळू शकेल. यावर्षी सप्टेंबरच्या अखेरीस घोषणा आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीस थकबाकी देण्याची प्रथा असताना, अधिसूचनेत थोडा विलंब…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या मादक अदांनी आणि स्टेजवरील परफॉर्मन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे डान्स व्हिडीओ, अल्बम्स आणि थेट कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. पण यावेळी गौतमी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. एक भीषण अपघात घडला असून, पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ तिच्या गाडीने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास वडगाव पुलाजवळील एका हॉटेलसमोर रिक्षा उभी होती. त्या रिक्षामध्ये चालकासोबत दोन प्रवासी बसलेले होते. अचानक मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्या…
अमळनेर : प्रतिनिधी पूर्वीच्या वादावरून दोन गटात वाद होऊन दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना शहरातील शाहआलम नगरमध्ये दि. २८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटातील ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पहिल्या गटाच्या महिलेने फिर्याद दाखल केली की, दि २८ रोजी ती बाजारातून घरी परत येत असताना शाहआलमनगर पाटीजवळ फारुख शेख मजिद, रफीक शेख मजिद समोर आले आणि त्यांनी महिलेला शिवीगाळ करून तेरे पती को केस वापस लेने लगा, नही तो जहा मिलेगे वहा मारेंगे असा दम दिला. आणि तिचा दुपट्टा ओढून धक्काबुक्की केली. तिचा पती आल्यावर ती तक्रार दाखल करायला जात असताना पाऊस पडला…
अमळनेर : प्रतिनिधी सती माता मंदिरावरून परत येताना टाकरखेडा रस्त्यावर गाय आडवी आल्याने मोटारसायकलचा अपघात होऊन मंगलाबाई ठाकरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती मधुकर ठाकरे जखमी झाले. ही घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी २:१० वाजता बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामाजवळ घडली. सविस्तर वृत्त असे कि, आर. के. नगर, अमळनेर येथील मधुकर ठाकरे हे त्यांच्या पत्नी मंगलाबाई यांच्यासोबत मोटारसायकलने सती माता मंदिरावर (टाकरखेडा रस्ता) दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर परत येताना, रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने मोटारसायकलचा तोल गेला व अपघात झाला. या अपघातात मंगलाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर मधुकर ठाकरे यांच्या तोंडाला मार लागून ते जखमी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव-चोपडा मार्गावरील तापी नदीवरील विदगाव पुलावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने कारला दिलेल्या भीषण धडकेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, वडील आणि दुसरा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रविवारी (३० सप्टेंबर) रात्री उशिरा घडली. चौधरी कुटुंब कारमधून चोपडा येथे जात असताना मागून आलेल्या डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेमुळे कार पुलावरून थेट खाली नदीपात्रातील वाळवंटात जाऊन कोसळली. या अपघातात मीनाक्षी निलेश चौधरी (वय ३५) आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा पार्थ यांचा जागीच मृत्यू झाला. निलेश चौधरी आणि दुसरा मुलगा ध्रुव हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. …
आजचे राशिभविष्य दि.१ ऑक्टोबर २०२५ मेष राशी नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होईल. आज तरुणांसाठी यशाचे नवे दरवाजे उघडतील. तुम्हाला तुमच्या मुलांसोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे ते खूप आनंदी होतील. वृषभ राशी मन आनंदी राहील. आज, तुमच्या स्टेशनरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. तुमचे वडील तुम्हाला आवश्यक वस्तू भेट देतील. तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल. तुम्ही तुमच्या वडिलांसोबत दिवस घालवाल. शिवाय, कोणत्याही व्यवसायातील समस्या देखील सोडवल्या जातील. मिथुन राशी राजकारणात सहभागी असलेल्यांना आज महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील आणि समाजात तुमची लोकप्रियता वाढेल. तुमचे रखडलेले काम आज मार्गी करेल, ज्यामुळे आर्थिक समस्या सुटतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि…
मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लस निर्मितीच्या क्षेत्रात हाफकिन संस्थेचं मोलाचं योगदान असून देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये हाफकिनचा मोठा वाटा आहे. भारत सरकारकडून पोलिओच्या २६८ दशलक्ष मौखिक लसींची मागणी आहे. या लसींची निर्मिती करण्यासाठी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हाफकिन खरेदी कक्षाच्या दोन टक्के उपकारातून २५ कोटी रुपयांचा निधी देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात आणि संस्थेतील निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,…
पंचनामे होतील अशी स्थिती नाही ; मंत्री गिरीश महाजन ! दिवाळीपूर्वी नुकसानीचा आढावा घेऊन भरपाई देण्याची ग्वाही दिली आहे. पण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतातील पुराचे पाणी अद्याप हटले नाही. त्यामुळे तिथे लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे पीडित शेतकऱ्यांना तातडीने मिळणाऱ्या नुकसानभरपाईवर सवाल उपस्थित होत आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. या बैठकीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही पाणी आहे. शेतातही पाणी आहे. त्यामुळे आता लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नाही. जिल्हाधिकारी,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी व विरोधक गेल्या काही दिवसापासून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, नियमात तशी तरतूद नसल्याने आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या जातात त्या सर्व आता या अतिवृष्टीच्या काळात लागू करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात आतापर्तंच्या अतिवृष्टीने ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. आँगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीपोटी २ हजार २१५ कोटींच्या निधी वितरणला यापुर्वीच मान्यता देण्यात आली आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठण्याची वाट पकडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि डॉलर-रुपया विनिमय दरातील हालचालींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा १ लाख २० हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला, तर चांदीचा दर प्रतिकिलो १ लाख ५० हजारांच्या जवळ गेला आहे. गेल्या काही दिवसांत सराफा बाजारात दरात सातत्याने वाढ होत असून, संभाव्य तेजीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी सणासुदीच्या खरेदीला तात्पुरता ब्रेक दिला आहे, तर काही गुंतवणूकदारांनी अधिक वाढीच्या अपेक्षेने माल खरेदीचा निर्णय पुढे ढकलला आहे. दागिने बनवणाऱ्या कारागिरांनाही याचा मोठा फटका बसतोय. वाढत्या दरामुळे ग्राहक मागे हटत असल्याने…

