Author: editor desk

बीड : वृत्तसंस्था देशभरात आज दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज बीडच्या नारायण गडावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात हजारो मराठा बांधवांनी हजेरी लावली. प्रकृती खराब असतानाही मनोज जरांगे यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. आपल्या भाषणात मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आयुष्यभर लक्षात राहिल असा मंत्र दिला आहे. हा मंत्र काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात. जरांगे पाटलांनी मराठ्यांना मंत्र देताना, ‘आम्ही डावं टाकून सर्वांच्या मुंडक्यावर पाय टाकला. हुशारीने चला. खाताना विचार करा. गरम की गार झालंय. समाज डुबेल असं वागू नका. आपण मुंबईत, अंतरवलीत जमतो मजा म्हणून नाही.…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त यंदाचा दसरा मेळावा खास असणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या दसरा मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सरसंघचालक मोहन भागवत हे दसरा मेळाव्याच्या निमित्त मार्गदर्शन करत आहेत. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, महात्मा गांधी यांचं स्वांतत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय असल्याचे म्हंटले आहे. आज माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचीही जयंती आहे. भागवत यांनी त्यांचेही स्मरण केले. संघप्रमुख म्हणाले की, ज्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले, अशा लाल बहादुर शास्त्री यांची आज जयंती आहे. भक्ती, देशसेवा आणि समर्पण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घराच्या बेडरुममधील ड्रॉवरमधून प्रणाली किरण बारी (वय २९, रा. दिक्षीतवाडी) ३ लाख ८० हजार रुपये किंमतीची ७ तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत चोरुन नेली. ही घटना दि. २७रोजी रात्रीच्या सुमारास दिक्षीत वाडी परिसरात घडली. याप्रकरणी दि. ३० रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील दिक्षीतवाडी परिसरात प्रणाली बारी या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे लीला कोळी रा. कांचननगर या महिला घरकाम करतात. बारी यांच्या घरातील बेडरुममध्ये लाकडी कपाट असून त्यामध्ये ते दैनंदिन वापरातील वस्तू ठेवतात. दि. २५ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांना देवीच्या आरतीसाठी जायचे असल्याने विवाहितेने सासरच्यांकडून मिळालेली ७ तोळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मासे पकडण्यासाठी गेलेले काझी अब्दुल वाहीद रईस अहमद (वय ४५, रा. फातेमा मशिदीजवळ मेहरुण) हे मेहरुण तलावात बुडाले होते. शोध घेवूनही ते मिळून न आल्याने बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना मिळून आला. त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरातील फातेमा मशिदीजवळ काझी अब्दुल वाहीद रईस अहमद हे वास्तव्यास होते. मशिदीत काम करुन ते आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते मेहरुण तलाव परिसरात मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडत असतांना ते पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यभरातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक आयोगाने आरक्षण जाहिर झाल्यानंतर व पंचायत समिती सभापतींच्या आरक्षण सोडतीचा देखील कार्यक्रम जाहिर झाला आहे. आता निवडणुक आयोगाने पंस व जिल्हा परिषदेच्या गट व गणांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला असुन दि.१३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात जाहिर केली जाणार असुन गणांचे आरक्षण तहसील कार्यालयांमध्ये जाहिर होणार आहे. जि.प व पंचायत समितीच्या निवडणूकीचा बिगुल दिवाळीनंतर वाजणार असल्याचे दिसुन येत आहे. गेल्या महिन्यातच जि.प अध्यक्षांचे आरक्षण सर्वसाधारण साठी जाहिर झाले आहे. त्यानंतर जिल्हयातील १५ पंचायत समितींमध्ये कोणत्या प्रवर्गाचा सभापती होणार हे दि.९ रोजी ठरणार आहे. आज निवडणूक आयोगाने जि.प व पंचायत…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आजचा दिवस उत्तम जाईल. काही लोक तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतील. इतरांच्या प्रभावाखाली येण्याऐवजी, स्वतःच्या निर्णयांना प्राधान्य द्या. यामुळे तुमची कामे पूर्ण करणे सोपे होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला आदर मिळेल. वृषभ राशी तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा; भविष्यात तुम्हाला लवकरच लक्षणीय फायदे दिसतील. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुमच्या मुलांसाठी थोडा वेळ काढल्याने त्यांना तुमचे विचार तुमच्यासोबत शेअर करण्यास प्रोत्साहित केले जाईल. प्रिय मित्रांनो, एकमेकांवर विश्वास ठेवा; तुमचे नाते मजबूत राहील. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. मिथुन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्ही तुमच्या शब्दांनी एखाद्याला प्रभावित कराल. समाजात तुमचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था एकनाथ शिंदे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजायला लागले आहेत. सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणून उठतात. बाळासाहेब ठाकरे हे सामान्यांचे पुढारी होते, बहुजन समाज आणि मराठी माणसांचे पुढारी होते. बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष आपल्या भूमिका कधीही अर्पण केल्या नव्हत्या, बाळासाहेब ठाकरे यांनी कधी निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दारात जाऊन उभे राहत नव्हते, असे म्हणत उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंचा पक्ष हा नरेंद्र मोदी यांची बेनामी कंपनी आहे. पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपला की नष्ट होतात. नरेंद्र मोदी…

Read More

मुबई : वृत्तसंस्था माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. एकत्र येऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करूया, अशी सरकारला विनंती केली. पण मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांच्याच धुंदीत आहे. तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करत नाही कारण तुमच्या अक्कलचा दुष्काळ आहे. तातडीने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा. दिल्लीत मजुरी करण्यासाठी जाऊ नका, शेतकऱ्यांसाठी मदत आणा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १ केली. दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “अतिवृष्टीचं राज्यावर मोठं संकट आलं आहे. मी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांवरच सरकारने भार टाकला आहे. शेतकऱ्यांचं केवळ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. राज्याच्या इतरही भागात पावसाने थैमान घातल्याने अवघ्या महाराष्ट्राचा पोशिंदा बळीराजा संकटात सापडला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची शेती जमीनदोस्त झाली आहे. कालच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ओला दुष्काळच्या सवलती लागू करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार असून ओला दुष्काळ नाही तर दुष्काळच्या सर्व सवलती लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. यामुळे शेतकरी सरकारने घोषित केलेल्या आर्थिक मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. राज्यातील विविध भागांमधून पूरग्रस्त भागांतील नागरिकांना…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बाभळे बु. येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न होणार आहे. या पवित्र सोहळ्याचे आयोजन सर्व ग्रामस्थ मंडळ, बाभळे खु. यांच्या वतीने करण्यात आले असून, संपूर्ण गावामध्ये आनंदाचे आणि आध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कीर्तनाचा कार्यक्रम दि.८ रोजी रात्री ८ वाजता तर महाप्रसाद दि.९ ऑक्टोबर रोजी दुपारी ११ वाजेपासून होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मूर्ती स्थापना, मूर्ती विसर्जन पूजन, प्राणप्रतिष्ठा पूजा, मंदिर शिखर पूजन, ग्रामप्रदक्षिणा यांसारखे विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. या सर्व विधींचे धार्मिक परंपरेनुसार आणि मंत्रोच्चारांसह आयोजन केले जाणार आहे. तसेच या सोहळ्याच्या…

Read More