Author: editor desk

चोपडा : प्रतिनिधी दोन आठवडद्यावर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे (श.प.) माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी व पती गट नेते जीवन चौधरी, मुलगी साधना चौधरी, माजी जि प सदस्या सह माजी नगरसेवकी व पदाधिकारी यांनी मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते जळगाव येथे भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार मंगेश चव्हाण, अमोल जावळे, राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा जिल्हा दुध संघाचे संचालक रोहित निकम, आ.राजुमामा भोळे, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते. माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी या मागील पालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने शुक्रवारी दहशतवाद्यांवर शोध मोहीम सुरू केली. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स या युनिटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे की, शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले. लष्कराने याला “ऑपरेशन पिंपल” असे नाव दिले आहे. ही कारवाई अजूनही सुरू आहे. याआधी ५ नोव्हेंबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चतरू भागात चकमक झाली होती. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक सैनिक जखमी झाला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आधार कार्डचा गैरवापर करून ‘मनी लॉडिंग’ आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या खोट्या आरोपाखाली मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचा बनाव करीत, सायबर गुन्हेगारांनी यावल तालुक्यातील सुरेश काशिराम नेहते (वय ६७, रा. बामणोद, ता. यावल) या वृद्ध शेतकऱ्याची ९ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार दि. १ नोव्हेंबर रोजी समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, यावल तालुक्यातील बामणोद येथे सुरेश काशिराम नेहेते (वय ६७) हे वास्तव्यास असून ते शेतकरी आहे. दि. ३० ऑक्टोबर रोजी नेहेते यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पळसोद येथील सुनिल भगवान सोनवणे (वय २८) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील पळसोद येथे सुनिल सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. गुरुवार दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास सुनिल याने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच सुनिल सोनवणे याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. सुनिल याने नेमक्या कोणत्या…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील बहादरपूर येथे ४ रोजी साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवादरम्यान पारोळ्यातील भटू पाटील यांची दुचाकी चोरीस गेली होती. त्यांनी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणी पारोळा पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, बहादरपुर येथे ४ रोजी श्री बद्रीनाथ महाराजांचा यात्रोत्सव साजरा केला. या यात्रेत पारोळ्यातील ओम नगरमधील भटू विष्णू पाटील (वय ४९) हे दुचाकीने कुटुंबासह गेले होते. तेथून भटू पाटील यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एमएच- १९, बीएफ- ६६७५) चोरट्याने चोरुन नेली होती. या बाबत भटू पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण तलावात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. मृताचे नाव प्रकाश राजकमल कांबळे (वय ४८, रा. रामेश्वर कॉलनी) असून ते मजुरीचे काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रकाश कांबळे यांचा मृतदेह मेहरुण तलावात तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने कसोशीने प्रयत्न करत मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह शासकीय प्रक्रियेसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रकाश कांबळे यांना मयत घोषित केले. प्रकाश कांबळे यांच्या अकाली…

Read More

आजचे राशिभविष्य दि.८ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. वृषभ राशी कोणाशीही अनावश्यक वाद घालणे टाळा, कारण यामुळे तुमचे काम लांबेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कोणत्याही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी, मित्रांसोबत वेळ घालवा आणि भविष्याबद्दल विचार करा. मिथुन राशी दैनंदिन कामांमध्ये जास्त वेळ लागू शकतो. व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी वडिलांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. वडिलांच्या पायांना स्पर्श केल्याने संपत्ती वाढेल. तुमचे वडील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील मराठा आरक्षणाच्या नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरु जरांगे पाटील यांनी मुंडेंवर घातपाताचे आणि अन्य गंभीर आरोप केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ते आरोप खंडित केले आणि स्वतःची बाजू मांडली. मुंडे म्हणाले की, त्यांचा ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करावी आणि तरीही सत्य बाहेर येत नसेल तर तपास सीबीआयकडे द्यावा. या वक्तव्यांनंतर जरांगे पाटीलही थेट माध्यमांसमोर येऊन पलटवार केला; त्यांनी धनंजय मुंडे यांना धन्या, म्हणून संबोधत ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्यातले पुरावे दाखवले. जरांगे पाटील म्हणाले की, त्यांच्या आणि मुंडेंमध्ये वैयक्तिक वैर नाही,…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा २०१९ ते लोकसभा २०२४ निवडणुकीदरम्यान मतदारांची झालेली वाढ १ हजार ९५२ इतकी होती. मात्र, लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत ८ हजार ४०० मते वाढली. इतकेच नाही तर, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मतदान केले होते, त्यांची व कुटुंबीयांची नावे विधानसभा २०२४च्या निवडणुकीच्या वेळी मतदारयादीमध्ये नव्हती. मुलाचे आणि वडिलांचे नाव वेगवेगळे असणे, घर क्रमांक शून्य असणे, एकाच व्यक्तीचे नाव शहरातसुद्धा आणि ग्रामीण भागातसुद्धा असल्याचे आढळले. असे दुबार मतदार हे प्रामुख्याने भाजपचेच कार्यकर्ते आहेत, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील अनेक ठिकाणी  अपघातांच्या घटना घडत असताना आता मुक्ताईनगर जवळील बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव मंदिराजवळील वळणावर लक्झरी बस आणि बल्करची धडक झाली. त्यात बल्कर चालक जागीच ठार झाला, तर बसचालक गंभीर जखमी झाला. ५ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता हा अपघात झाला. या दुर्घटनेत २८ प्रवासी बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी लक्झरी बस (क्र.एमपी.०९-एफए ९७१०) अकोटवरून इंदूरकडे जात होती. यावेळी सिमेंटचे बल्कर (क्र.एमएच.४६-सीयू.८१ ५४) हे खामखेडा जवळ बी.एन. अग्रवाल यांच्या रस्त्याच्या कामावरून सिमेंट खाली करून धुळ्याकडे जात होते. मुक्ताईनगर जवळील महादेव मंदिरासमोरील वळणावर लक्झरी व बल्करची समोरासमोर धडक झाली. त्यात बल्कर चालक प्रमोद जग्गेभान पटेल (वय २३, रा. पुनिया खुर्द,…

Read More