Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था येत्या विजयादशमीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच काँग्रेसच्या प्रदेशाध्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका केली आहे. संघाला अनुरोध आहे की तुम्ही शंभराव्या वर्षात फेल झालेला आहात. तुमचा संघ विसर्जित करा, नाहीतर मनुस्पुर्तीची होळी करा असा खळबळजनक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, संविधान स्वीकारा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात गांधींचा फोटो लावा असाही सल्ला सपकाळ यांनी दिला आहे. गांधीच्या तत्वज्ञानाचा विरोध म्हणून तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली असल्याचा गंभीर आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी…

Read More

यावल : प्रतिनिधी येथील अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर दहिगाव फाट्याच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्तोल आणि जिवंत काढतोस खरेदी विक्री करताना दोघांना बुधवारी मध्यरात्री पकडण्यात आले होते. तर यावल येथील तरुणाने अमळनेर येथील एकास यापूर्वी दोन पिस्तोल विकले होते. तेव्हा या गुन्ह्यात अमळनेर येथून देखील एकास अटक करण्यात आली आहे. तर या गन्ह्यातील तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता तिघांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि,  यावल शहरातील बोरावल गेटजवळील रहिवाशी युवराज उर्फ युवा राजू भास्कर (वय ३४) हा वराडसिम ता. भुसावळ येथील भूषण कैलास सपकाळे (वय ३१) याला गावठी बनावटीचे पिस्तोल विक्री करत असताना पोलिसांनी बुधवारी रात्री…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आठ दिवसांपूर्वीच जिल्हा कारागृहामध्ये आलेल्या सोहम गोपाल ठाकरे (वय २०) याला झोपेतून उठवून दोन बंद्यांनी बरॅकच्या दरवाजावर आदळत मारहाण केली. ही घटना २७सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहात घडली. या प्रकरणी कुणाल गोपाल चौधरी व अजय मोरे या दोन बंद्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यातील सोहम ठाकरे याला २० सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहातील बरॅक क्रमांक १३मध्ये तीन क्रमांकाच्या सर्कलमध्ये ठेवण्यात आले. २७ सप्टेंबर रोजी सकाळी तो झोपलेला असताना तेथे कुणाल चौधरी हा आला व पायाने धक्का देत उठविले व बाहेर ये, मला तुझ्याशी काम असल्याचे सांगू लागला. सोहम उठताच त्याला…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील होळपिंप्री येथील २८ वर्षीय तरुण शेतकरी विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, होळपिंप्री येथील घरातील कर्ता तरुण शेतकरी कल्पेश गोरख पाटील हे विहिरीजवळ पाणी काढण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरल्याने विहिरीत पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे वडील गोरख पाटील यांनी बराच वेळ होऊन गेला तरी मुलगा परत आला नाही, हे बघण्यासाठी विहिरीजवळ गेले असता ही घटना उघडकीस आली. मात्र संध्याकाळ झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांना बोलवून रात्री मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या अंधारामुळे मृतदेह सापडू शकला नाही. रविवारी सकाळी पोहोण्यासाठी तरबेज असलेल्या…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२९ सप्टेंबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरी-व्यवसायातील सकारात्मक बदल तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील. इतरांना मदत केल्याने आज तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तुमचे कौतुक होईल. धाडस आणि आत्मविश्वासाने घेतलेल्या निर्णयांमध्ये सहज यश मिळेल. आर्थिक स्थिती ठीक असली तरी खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्यावर अचानक खर्च वाढू शकतो, काळजी घ्या. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना आज प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ मिळेल. करिअर संदर्भात शुभ बातमी मिळेल. तसेच तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल. घरात पाहुणे येतील. कामाचा अति-ताण तुमच्या उत्साहावर परिणाम करेल. आरोग्याकडे लक्ष द्या. वाहन चालवताना सावधगिरी…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी महिला घरात एकटीच असल्याची संधी साधत निर्वस्त्र अवस्थेत महिलेच्या घरात शिरला. त्यानंतर महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला. ही घटना शहरातील एका भागात घडली. याप्रकरणी संशयित रामभाऊ माधव पाटील (रा. चितामणी कॉलनी, पाचोरा) याच्याविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका भागात पिडीत महिला वास्तव्यास असून दि. २६ रोजी त्यांचे पती ड्युटीवर गेले होते. त्यामुळे पीडित महिला घरी एकटीच असल्याची संधी साधत संशयित रामभाऊ माधव पाटील हा अचानक निर्वस्त्र अवस्थेत महिलेच्या घरात शिरला. त्याने महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक महिलेच्या घराकडे…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था “मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा” या कुसुमाग्रजांच्या ओळींची सजीव प्रतिमा सध्या सीना नदीच्या काठावर दिसून येते आहे. महापुराच्या तडाख्याने घरे-दारे, शेतं-शिवार वाहून गेली; पण संयम, जिद्द आणि संघर्षाची मशाल घेऊन ब्रह्मदेवनगरमधील कुटुंबे आजही जगण्यासाठी झगडत आहेत. सविस्तर वृत्त असे कि, उमदी तालुक्यातील कोर्सेगाव परिसरातील ब्रह्मदेवनगरमधील सुमारे 20 कुटुंबे सध्या घराच्या छपराऐवजी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आश्रय घेऊन राहतात. दैनंदिन जीवनासाठी लागणारी मूलभूत साधनेदेखील हरवलेली असताना, संततधार पाऊस, अंगात घुसणारी थंडी आणि नदीच्या खवळलेल्या लाटा यांचा सामना करत, ही कुटुंबे उघड्यावर जीवन कंठत आहेत. 23 सप्टेंबर रोजी आलेल्या महापुरात गावात पाणी इतक्या वेगाने घुसले की लोकांना घरातील साहित्य…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तामिळनाडू येथे अभिनेता आणि राजकारणी थलपथी विजय याच्या शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली? याचे कारण समोर आले आहे. चेंगराचेंगरीची घटना नेमकी कशामुळे घडली? अभिनेता विजय रॅलीसाठी दुपारी १२ वाजता पोहोचणार होता, परंतु त्याला तब्बल सहा तास उशीर झाला. यादरम्यान गर्दी हळूहळू वाढत गेली आणि विजय रॅलीला संबोधित करत असताना गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली.…

Read More

मेष राशी कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. व्यावसायिक आघाडीवर, संघर्षापेक्षा सहकार्य आणि समजूतदारपणा चांगले परिणाम देईल. वृश्चिक राशीतील चंद्र तुमच्या आठव्या घरात आहे, म्हणून आर्थिक बाबींमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अनपेक्षित खर्च टाळा. वृषभ राशी आज व्यवसायात भागीदारीवर लक्ष केंद्रित केले जाईल. आजचा दिवस स्थिरता आणि सुरक्षिततेने भरलेला असेल. नातेसंबंधांमध्ये उबदारपणा आणि मोकळेपणा असेल. व्यावसायिकदृष्ट्या, नवीन प्रकल्पांमध्ये उडी मारण्यापूर्वी जुने काम पूर्ण करा. मिथुन राशी आज नवीन संधी मिळतील. संवाद, अभ्यास आणि नेटवर्किंगसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबियांच्या भावना हाताळताना सावधगिरी बाळगा. तुमची ऊर्जा एक किंवा दोन कामांवर केंद्रित करा; अनेक कामं ओढवून घेऊ नका. कर्क राशी…

Read More

यावल : प्रातिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील २१ वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी सखोल तपास करताना यावल पोलिसांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षीत बालिकेसही ताब्यात घेतले आहे. या मुलीचे प्रेम प्रकरण उघडकीस आणले व तिच्या पालकांना माहिती दिली. या रागातून तिने तरूणांना हत्या करण्याकरीता चिथावणी दिल्याचे समोर आले आहे. या बालिकेस विशेष बाल न्याय मंडळ जळगाव येथे हजर केले असता तिला बाल अधिरक्षा कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर या गुन्ह्यात तीन तरूण सध्या न्यायलयीन कोठडी आहेत. सविस्तर वृत्त असे कि, दहिगाव ता. यावल या गावातील सुरेश आबा नगरातील रहिवासी इम्रान युनुस पटेल (वय २१, मुळ रहिवासी हनुमंतखेडा ता.धरणगाव) या तरूणाची…

Read More