Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना मिळणार दिलासा !
    कृषी

    मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना मिळणार दिलासा !

    editor deskBy editor deskSeptember 30, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील शेतकरी व विरोधक गेल्या काही दिवसापासून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, नियमात तशी तरतूद नसल्याने आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या जातात त्या सर्व आता या अतिवृष्टीच्या काळात लागू करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात आतापर्तंच्या अतिवृष्टीने ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. आँगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीपोटी २ हजार २१५ कोटींच्या निधी वितरणला यापुर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या मदतीसाठीची ईकेवायसीची अट शिथिल करून अँग्रीस्टॅकच्या आधारे निधी वितरण करण्याचा निर्णय केला आहे.

    त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची ही रक्कम जमा होईल. त्यानंतर पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेतात पाणी असल्याने प्रशासनाला नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोडा वेळ दिला आहे. तीन चार दिवसात ही सर्व माहिती जमा होईल. त्यानंतर शेतपिकांचे नुकसान, जमीन खरडून गेल्याने झालेल नुकसान, घरांचे किंवा विहिरींचे नुकसान अशा सर्व प्रकारच्या नुकसानीच्या मदतीचा निर्णय केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

    दरम्यान, अतिवृष्टीने ज्या ज्या प्रकारचे नुकसान झाले त्याची भरपाई देण्यासाठीचे सर्वंकष धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नुकसानीची सर्व आकडेवारी जमा होताच मदतीच्या सर्वंकष धोरणाचा निर्णय केल्या जाईल. पुढील आठवड्याच्या आत हा निर्णय करून मदतीची घोषणा केली जाईल. तसेच, दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.