Author: editor desk

आजचे राशीभविष्य दि. ११ नोव्हेंबर २०२५ मेष राशी राजकारणात जाण्याचा विचार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, त्यांचे विरोधक त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या संपत्तीत वाढ झाल्याने तुम्ही खूश व्हाल. तुमच्या मुलांकडे विशेष लक्ष द्या. तुम्ही तुमच्या व्यावसायिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवाल. वृषभ राशी तुमच्या व्यवसायात तुमची मुले तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. योग्य गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कलाकारांसाठी दिवस विशेषतः चांगला आहे. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. आज एक प्रकल्प पूर्ण होईल, जो तुम्हाला खूप आनंद देईल. मिथुन राशी जर तुम्ही घर किंवा दुकान खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला…

Read More

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सोमवारी अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असून, पुढील ७२ तास अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अद्याप रुग्णालयाकडून किंवा कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यांच्या मुलींना अमेरिकेतून तातडीने मुंबईत बोलावण्यात आले आहे, तर कुटुंबातील सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत. अलिकडेच धर्मेंद्र यांच्या आगामी “इक्किस” या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये त्यांनी दमदार अभिनय…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात नेहमीच निर्भीडपणे आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. स्वतः दमानिया यांनीच या घटनेचा खुलासा करत सांगितले की, काही विश्वसनीय सूत्रांकडून त्यांना ‘तुमचा गेम केला जाणार’ असा इशारा देण्यात आला आहे. दमानिया यांनी सांगितले की, “मी अमेरिकेत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या हातात काही इनपुट आले आहेत. काही लोक चर्चा करत आहेत की ‘यांचा गेम करायचाच’. त्यामुळे तुम्ही सावध राहा,” असा इशारा त्यांनी दिला. संबंधित अधिकारी अतिशय वरिष्ठ पातळीवरील असून, त्यांनी धमकीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्याचे दमानिया…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवर बेधडक विधाने करून स्वपक्षाची राजकीय कोंडी करणाऱ्या रूपाली पाटील व आमदार अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. रूपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकरणकर यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता. तर मिटकरी यांच्या विधानांमुळे सत्ताधारी महायुतीत तणाव निर्माण होताना दिसून येत होता. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांनाही प्रवक्ते पदावरून दूर करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृ्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी पक्षाच्या 17 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. त्यात रूपाली पाटील व अमोल मिटकरी या 2 नेत्यांची नावे नाहीत. या यादीद्वारे राष्ट्रवादीने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात महायुतीत फुट पडत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर, आता भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी आता जशास तसे उत्तर देत थेट आव्हान दिले आहे. मंत्री उदय सामंत यांनी ‘कुणाला जर स्वबळाची खुमखुमी असेल, तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे,’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला उदय सामंत यांचे नाव न घेता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिलखेडे येथील रहिवासी शुभम प्रभुदास भालेराव (वय २४) याचा गिरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना, रविवार, ९ रोजी घडली. शुभम आपल्या कुटुंबातील तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे, पण ज्या घरात एका महिन्यानंतर दुसऱ्या बहिणीचे लग्न होणार होते, त्या घरात आता भयाण शांतता आणि दुःख दाटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी आहेत. शनिवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शुभम आपल्या मित्रांसोबत गावातील गिरणा नदीत गेला होता. पोहत असताना, तो मुख्य धारेत अडकून नदीत बुडाला. शुभम वाहून गेल्याचे समजताच गावातील आणि परिसरातील नागरिकांनी पिलखेडेपासून ते रामेश्वरपर्यंत…

Read More

बोदवड : प्रतिनिधी शहरातील मलकापूर रस्त्यावरील टेनिस कोर्टमध्ये रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील काही मुले टेनिस खेळत असताना अल्पवयीन काही बालकांनी एका बालकावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले खेळत असताना त्या ठिकाणी काही सात ते आठ अल्पवयीन मुले आले व त्यांनी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन ते तीन बालकाच्या हातात धारदार चाकू होता. चाकू पाहून काही विद्यार्थी तेथून पळून गेले, तर पाचवीत शिकणारा ११ वर्षीय स्वरूप यशपाल बडगुजर याच्यावर इतर अल्पवयीन बालकांनी काहीही विचार न करता चाकूने वार केला. त्यात तो रक्तबंबाळ झाला. यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. स्वरूपच्या सोबत असलेल्या काही बालकांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून संध्याकाळपासून सुरू असलेली धुसफूस वाढत जाऊन रविवारी रात्री १०.३० वाजता थेट गोळीबार करण्यात आल्याची घटना कांचन नगरात घडली. यामध्ये आकाश युवराज बाविस्कर उर्फ टपऱ्या याचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. गोळीबार करणारा आकाश सपकाळे हा पसार झालेला आहे. हद्दपार आकाश सपकाळे उर्फ डोया आणि सागर सपकाळे यांच्यामध्ये जुना वाद आहे. आकाश रविवारी आला असता परिसरात संध्याकाळपासून धुसफूस सुरू होती. रात्री हा वाद वाढत जाऊन आकाश याने सागरच्या घरासमोर येऊन गोळीबार केला. यात सागर सपकाळे यांचे भाचे गणेश सोनवणे यांच्या हाताला तर तुषार रामचंद्र सोनवणे यांच्या कानाला व आकाश बाविस्कर यांच्या छातीत गोळी लागली.…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१० नोव्हेंबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. व्यवसायात अनपेक्षित आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा. जोडीदाराच्या मदतीने कौटुंबिक वाद दूर होतील. तुमच्या नातेसंबंधात गोडवा येईल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. मुले आनंदी राहतील. जुन्या मित्राची भेट फायदेशीर ठरु शकते. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. सकारात्मक विचार करा. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मिश्र स्वरुपातील परिणामांचा असणार आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेतल्याने तुमचा मान-सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे गरजेचे…

Read More