Author: editor desk

अमरावती : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे पाटील म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. “जो कोणी राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल, त्याला मी एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देईन,” अशी धक्कादायक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात नेहमीच विविध विषयांमुळे खळबळ उडत असते. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बांद्रा येथील निवासस्थान ‘मातोश्री’ परिसरात 2 संशयित ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेमुळे मातोश्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, तसेच भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. नेमंक काय घडलं? मुंबईच्या बांद्रा मातोश्री परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या आसपास दोन संशयास्पद ड्रोन उडताना दिसले होते. यामुळे नागरिकांमध्ये घाबराट निर्माण झाली होती. हा परिसर अतिशय संवेदनशील असल्याने, ड्रोन नेमका कोणी उडवला? यामागे हेतू काय होता? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले होते. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असतानाच,…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी फैजपूर शहरात आज दि.९ नोव्हेंबर रोजी पहाटे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी सामीलच्या समोर, सावदा रोडवर असलेल्या राज लॉजिंग आणि संसार फर्निचर मॉलला ही आग लागली असून, संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. घटनास्थळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली असून, पोलिसांनी सुरक्षा व रहदारी नियंत्रणासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र प्राथमिक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण ज्यांचा राजकीय गेम करायचा आहे त्याच्यावर मात्र कारवाई होते. सरकारच्या एका विभागाने सांगून सुद्धा मी समोर आणलेल्या सिडको घोटाळ्याप्रकरणी कारवाई झाली नाही, पण पार्थ पवार यांच्या प्रकरणी सुपरफास्ट कारवाई केली जात आहे, असा भेदभाव न करता कारवाई करण्यात यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले की, जो व्यक्ती चुकीचा आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सिडकोचे प्रकरण असो की नवी मुंबईमधील खडीचे प्रकरण असो की नाशिकमधील जमिनीचे प्रकरण, शिरसाट यांच्या एमआयडीसीचा मुद्दा असे अनेक मुद्दे आहेत. ज्या काही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे किनी मशिन, तीन ट्रॅक्टरसह सुमारे १५ ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई शुक्रवार दि. ७ रोजी खेडी खुर्द गावात केली. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात होता. याबाबत वाळू उपसा करणाऱ्यांसह वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ विजय पाटील, नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, रविंद्र कापडणे यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांचे पथक रवाना झाले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बोलण्यात गुंतवून ठेवून मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून साहेबराव ओंकार पाटील (८९, रा. राधाकृष्ण नगर) यांच्या बँक खात्यातून २८ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. ही घटना दि. ६ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एका अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील राधाकृष्ण नगरातील गजानन साहेबराव पाटील हे त्यांचे वडील साहेबराव ओंकार पाटील यांच्या बँक खात्याचे एटीएम कार्ड घेऊन स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. अनेकदा प्रयत्न करूनही रक्कम निघत नसल्याने त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत एटीएम कार्डची अदलाबदल केली.…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दल आता अनेक कारवाई करीत असताना आता मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी व लालगोटा भागात विविध आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळी कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कोम्बिंग राबवत १५ संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यातील दोन आरोपी दरोडासह लुटीच्या गुन्ह्यात पोलिसांना आधीच हवे असल्याने त्यांना अटक करण्यात आली तर अन्य १३ आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक मुक्ताईनगर पोलिसांच्या माध्यमातून कोम्बिंग राबवण्यात आले. कमलेश्वर ज्ञानेश्वर पाटील (वय ४५) व दीपमाला कमलेश पाटील (३८, दोघेही रा. मधापुरी) यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसांत आधीच गुन्हा दाखल होता. ते फरार असल्याने त्यांना अटक करण्यात आली. तसेच १३…

Read More

आजचे राशिभविष्य दि. ९ नोव्हेंबर २०२५ मेष आजचा दिवस ऊर्जावान आहे. कामात गती येईल, जुनी अडचण सुटू शकते. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. संध्याकाळी आनंददायी भेटीगाठी होतील. शुभ रंग: लाल | शुभ अंक: ३ वृषभ कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. घरातील जबाबदारी वाढेल, परंतु त्यातून समाधानही मिळेल. नवीन गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही. शुभ रंग: पांढरा | शुभ अंक: ६ मिथुन नवीन ओळखी लाभदायक ठरतील. प्रवास योग संभवतो. मित्रांकडून सहकार्य मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने थोडा संयम ठेवा. शुभ रंग: हिरवा | शुभ अंक: ५ कर्क भावनिक निर्णय टाळा. वरिष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आरोग्याकडे लक्ष द्या, थकवा जाणवू शकतो.…

Read More

मुंबई : प्रतिनिधी महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार भूखंड प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “या प्रकरणात कुणालाही वाचवले जाणार नाही; जे दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल,” असे फडणवीस म्हणाले. या प्रकरणात आधीच काहींवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. भविष्यात कुणाचा सहभाग आढळल्यास त्यावरही कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी १,८०० कोटींची जमीन अवघ्या ३०० कोटींना घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल महिनाभरात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पक्षांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून स्टार प्रचारकांची मर्यादा २० वरून वाढवून ४० करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी ही मागणी केली होती. त्यांनी सांगितले की, राज्यभर होणाऱ्या निवडणुकांमध्ये विविध ठिकाणी प्रचार मोहीमा राबवाव्या लागतात, त्यामुळे फक्त २० प्रचारकांची मर्यादा अपुरी ठरत होती. अखेर आयोगाने महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह आदेश, २०२५ मधील परिच्छेद २६ नुसार ही वाढ मंजूर केली आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की प्रत्येक पक्षाने आपल्या…

Read More