Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणूक जाहीर झाली असून महायुतीची जोरदार तयारी असून आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि शिवसेना (उबाठा) यांनी सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका एकत्र लढण्याच्या तयारीसाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेकडुन युती करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीला अद्याप प्राप्त झालेला नाही, असे मित्रपक्षांनी स्पष्ट केले. मनसेसोबत हातमिळवणी करण्याबाबत महाविकास आघाडीसमोर अद्याप असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर असा प्रस्ताव आला तर आम्ही एकत्र बसून त्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, औपचारिक प्रस्ताव…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून, सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. संध्याकाळी लाल किल्ला क्रॉसिंगजवळ एका कारमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे २० जण जखमी झाले आहेत. काही वाहने जळून खाक झाली आहेत. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने घटनेची गंभीर दखल घेतली असून, देशभरातील सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात राज्य…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या अडचणीत आले होते आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार भूखंड घोटाळ्याप्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. तुम्हाला सिंचन घोटाळ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले. पण यावेळी तुम्हाला फडणवीसच नव्हे तर अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोडवू शकत नाहीत. मी तुम्हाला एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही याची खात्री बाळगा, असे त्यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटले आहे. यावेळी त्यांनी उद्या सकाळी 10 वा. मोठा गौप्यस्फोट करण्याचीही घोषणा केली. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील कथित भूखंड…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुप्रतीक्षित प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली. या सोडतीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुसऱ्या सभागृहात चिठ्ठीद्वारे पार पडला. व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी आणि नगर सचिव मनोज शर्मा आदी अधिकारी उपस्थित होते.जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत पार पडली असून, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागासवर्ग तसेच महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. खाली प्रत्येक प्रभागानुसार (अ, ब, क, ड)…

Read More

बँकेकडील गहाण मशिनरी गायब; माजी खासदारांसह चौघांवर आरोप चाळीसगाव : प्रतिनिधी  छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चौघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे चाळीसगाव व जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मित्रांसोबत व्हीडीओ काढतांना मध्ये येत असल्याने एका बाजूला व्हा असे म्हटल्याचा राग आल्याने चौघांनी प्रियांशूसिंग विद्यासागरसिंग राजपूत (वय २७, रा. हरिविठ्ठल नगर, आत्महत्या कॉलनी) यांना शिवीगाळ करीत डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केले. ही घटना दि. ७ रोजी दुपारी साडेतीन वाजता मेहरुण तलाव परिसरातील सुबोनिया चिडीया घरजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की , शहरातील हरिविठ्ठल नगरातील आत्महत्या कॉलनीत प्रियांशूसिंग राजपूत हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ७ रोजी दुपारच्या सुमारास मित्रांसोबत मेहरुण तलाव परिसरातील सुबोनिया चिडीया घर येथे व्हिडीओ काढत असतांना संशयित अभय गुजर हा व्हिडीओ मध्ये येत होता. यावेळी प्रियांशूसिंग…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शहरासह विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या शहादा तालुक्यातील दोघांना अमळनेर पोलिसांनी शिताफिने अटक करून त्यांच्याकडून १५ लाख ६३ हजारांच्या २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अमळनेर पोलिसांना या उत्तम कामासाठी विशेष बक्षीस देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमळनेर शहरासह विविध ठिकाणाहून दररोज दुचाकी चोरीस जात होत्या. यामुळे पोलिसांसह सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनात पो. नि. दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन मनोरे, उज्ज्वल पाटील, हितेश…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव खुर्द येथील पाण्याच्या टाकीजवळ काही जण जुगार खेळत होते. ही माहिती पो. नि. रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत १५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव खुर्द येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात दीपक भोई, शांताराम पाटील, सलीम मुसलमान, शेख जाबीर, शिवाजी पाटील, नितीन वराडे, शशिकांत पाटील, भागवत पाटील, अंकुश कोळी, सुभाष महाजन, साहेबराव साळुंखे, वासुदेव वराडे, रवींद्र पाटील, दिलीप वंजारी, सुनील पाटील हे १५ जण जुगार खेळत होते. ही माहिती पो.नि. रंगनाथ धारबळे…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील पळासखेडे खुर्द येथे ५२ वर्षीय शेतकऱ्याने कापसाच्या नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी पदार्थ सेवन केल्याची घटना ४ रोजी घडली होती. उपचारादरम्यान त्यांचा १० रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पळासखेडे खुर्द येथील प्रताप दौलत पाटील (वय ५२) हे आपल्या शेतात कापसाच्या पिकाला फवारणी करत होते. फवारणी करताना कापसाची अत्यंत खराब झालेली स्थिती तसेच खर्च केलेले पैसेही येणार नाहीत व कापसाला भावही नसल्याने कर्जाचा वाढणारा बोजा, याच नैराश्यातून त्यांनी फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर उपचारादरम्यान १० रोजी दुपारी २ वाजता प्रताप पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील पळासखेडे खुर्द येथे ५२ वर्षीय शेतकऱ्याने कापसाच्या नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी पदार्थ सेवन केल्याची घटना ४ रोजी घडली होती. उपचारादरम्यान त्यांचा १० रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पळासखेडे खुर्द येथील प्रताप दौलत पाटील (वय ५२) हे आपल्या शेतात कापसाच्या पिकाला फवारणी करत होते. फवारणी करताना कापसाची अत्यंत खराब झालेली स्थिती तसेच खर्च केलेले पैसेही येणार नाहीत व कापसाला भावही नसल्याने कर्जाचा वाढणारा बोजा, याच नैराश्यातून त्यांनी फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर उपचारादरम्यान १० रोजी दुपारी २ वाजता प्रताप पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

Read More