Author: editor desk

आजचे राशिभविष्य दि.१३ नोव्हेंबर २०२५ मेष राशी तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांसोबत शेअर कराल. घराबाहेर शिक्षण घेणाऱ्यांची आज पालकांशी भेट होऊ शकते, सुखद सरप्राईज मिळेल. वृषभ राशी तुमची मुले आज तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांना प्रोत्साहित करावे लागेल. आज तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळतील. मिथुन राशी तुमच्या कामातील डेडिकेशनमुळे तुम्हाला लवकरच यश मिळेल.. आज तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सहवासात असाल, ज्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. आज एखादे खास काम पूर्ण केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. कर्क राशी आज तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे तुमची सकारात्मकता वाढेल. तुमचा आदर वाढेल. आज काही चांगली…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संवाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अजित पवार आणि त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मध्य प्रदेशातील बुरहानपूर (कोतवाली) पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. २०२/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे रिक्षात प्रवाशी बसवून त्यांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या प्रकरणाचा तपास करत असताना हा गुन्हा जळगावातील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, या गुन्ह्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व अंमलदारांना तत्काळ तपास व कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय चौकशी व गुप्त बातमीदारांच्या मदतीने या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेतला. अखेर पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम कय्युम खाटीक (वय ३३, रा. मास्टर कॉलनी,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील असंख्य शेतकाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता लवकरच जारी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या २ ऑगस्ट २०२५ रोजी २० वा हप्ता जाहीर करण्यात आला होता, ज्यामध्ये २०,५०० कोटी रुपयांची रक्कम देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली होती. यानंतर नोव्हेंबर महिन्यात २१ वा हप्ता जमा होणार असल्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारकडून याबाबत तयारी सुरू असून देशभरातील पात्र शेतकऱ्यांना हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी महानगरी एक्सप्रेस या रेल्वेत ‘बॉम्ब’ असल्याचा संशयास्पद संदेश आढळल्याने भुसावळ रेल्वे स्थानकावर बुधवारी रात्री मोठी खळबळ उडाली. “पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद, गाडीत बॉम्ब आहे” असा संदेश रेल्वेच्या एका डब्याच्या शौचालयात लिहिल्याचे आढळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (RPF), लोहमार्ग पोलीस (GRP) आणि स्थानिक पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. गाडी भुसावळ स्थानकावर पोहोचताच श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण रेल्वेची तपासणी करण्यात आली. प्रत्येक डब्याची सखोल झडती घेऊन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना तात्पुरते सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक साहित्य आढळून आले नाही, असे रेल्वे सुरक्षा दलाने स्पष्ट केले. त्यामुळे प्रवाशांनी दिलासा घेतला…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरू असताना आता तुळजापूर शहरात झालेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींना थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झाला, त्यामुळे विरोधकांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे अत्यंत चिंताजनक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षात स्थान देणे म्हणजे समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन…

Read More

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. मंगळवार रात्री गोविंदा अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना घरीच प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रात्री १ वाजता त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती त्यांचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी दिली. रुग्णालयातील डॉक्टर डॉ. नामजोशी यांनी सांगितले की, “गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर आहे. तो आपल्या रूममध्ये विश्रांती घेत आहे. त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या सुरू असून अहवाल आल्यानंतर पुढील उपचार ठरवले जातील. काळजी करण्यासारखी कोणतीही बाब नाही.”…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर भोरस गावाजवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चाळीसगाव तालुक्यातील पिराचे बोरखेडा येथील भागवत पाटील या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने (एचआर ७४-बीओ ४५०) दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकून अक्षरशः चिरडली गेली. अपघात इतका भीषण होता, की भागवत पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर काहीवेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. अपघाताचा पुढील तपास…

Read More

चोपडा : प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी समर्थक आणि पदाधिकाऱ्यांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मुंबई येथे मंगळवारी पार पडलेल्या या भव्य प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार कैलास पाटील, सूरज चव्हाण, आनंद परांजपे, प्रतिभा शिंदे, तसेच जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे आणि संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रवेशावेळी चोपडा तालुक्यातील अनेक नामांकित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील अजित…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१२ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला तुमची हरवलेली जुनी वस्तू परत मिळेल. तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफाही दिसेल. या राशीत जन्मलेल्यांना आज त्यांच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा वाढेल. आज इतरांचे दृष्टिकोन चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशी अ़डकलेली कामं आज पूर्ण होतील. या राशीखाली जन्मलेले लोक त्यांच्या जोडीदाराला धार्मिक स्थळी घेऊन जाऊ शकतात. नवविवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. अनेक महत्त्वाच्या कामांमध्येही बदल होतील. मिथुन राशी आज, तुमच्या प्रकल्पात तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल, जो यश मिळविण्यात उपयुक्त ठरेल. ऑफिसच्या कामात सल्ला घेण्याचे टाळा. एखाद्या प्रिय व्यक्तीची मदत घेणे चांगले राहील,…

Read More