धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथून जवळच असलेल्या मुसळी गावाजवळ गुरुवारी पहाटे चौघांनी पांढऱ्या रंगाची हुंडाई कार रस्त्यात आडवी लावून नंदुबार येथील शंकर बामणी व धनंजय पाटील व इतर कामगारांना गाडीतून बाहेर ओढून मारहाण केली. तसेच त्यांच्या ताब्यातील ३० हजार रुपये घेवून पोबारा केला होता. धरणगाव पोलिसांनी या प्रकरणात केवळ चारच तासात चारही संशयितांसह गाडी व मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथून कन्स्ट्रक्शनच काम आटोपून नंदुरबारकडे जाणारे ठेकेदार शंकर बामणी यांच्यासोबत फिर्यादी धनंजय शंकर पाटील (रा. खोंडामळी, जि. नंदुरबार) हे त्यांच्या वाहन (एमपी १३, झेडयू- ९४४०) ने जात असताना मुसळी फाट्यावर १२ नोव्हेंबरला ते जेवणासाठी अर्जुना हॉटेलला थांबले. जेवण…
Author: editor desk
रावेर : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाने एका कारमधून २ लाख ५६ हजार रूपयांची रोकड जप्त केली. गुरुवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई सावदा रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर करण्यात आली. न.पा. निवडणुकीच्या अनुषंगाने बन्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर सावद्याकडून येणाऱ्या वाहनांची शासकीय नवीन विश्रामगृहासमोर स्थापन करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून तपासणी गुरुवारी सुरू होती भुसावळहून बन्हाणपूरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्र. (एम एच-१९ /सी. एफ. – २३८५) पथकाने तपासणी केली असता त्यात वरील रक्कम आढळून आली. व्यापारी कुशल सुनील अग्रवाल (रा. वरणगाव रोड, भुसावळ) यांनी ही रक्कम घेऊन ब-हाणपूर येथील व्यापाऱ्याकडे सोयाबीन खरेदीसाठी जात असल्याचे पथकाला…
आजचे राशिभविष्य दि.१४ नोव्हेंबर २०२५ मेष राशी तुमच्या भावंडांसोबत असलेले मतभेद आज दूर होतील. तुम्ही भूतकाळातील चुकीबद्दल समेट करण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमचा व्यवसाय वाढेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. वृषभ राशी आजच्या दिवसाची मनासारखी सुरूवात न झाल्यामुळे चिडचिड होणार, तो राग जोडीदारावर काढू नका नाहीतर ब्रेकअप होऊ शकतं, विकेट पडू शकते. सावध रहा, रागावर नियंत्रण ठेवा. आज आर्थिक स्थिती मजबूत होईल. मिथुन राशी आज तुम्ही मित्रांसोबत सहलीची योजना आखाल. पण ऑफिसचे महत्वाचे काम आल्यामुळे प्लान कॅन्सल होऊ शकतो. बदलीची इच्छा असणाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदलीची चांगली बातमी मिळेल. कर्क राशी…
धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव नगरपरिषदेतील निवडणुकीचा उत्साह दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दि. १० नोव्हेंबरपासून नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी अर्ज विक्रीस सुरुवात करण्यात आली. आज तिसऱ्या दिवशी अर्ज विक्रीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असून, नगरसेवक पदाच्या २३ जागांसाठी तब्बल १८८ अर्जांची विक्री झाली आहे. दरम्यान, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत १३ अर्ज विक्री झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. धरणगावमध्ये प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी वाढली असून प्रचारयंत्रणा सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनाही या निवडणुकीत सक्रिय होण्यास सुरुवात झाली असून, येत्या काही…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मुसळी फाट्यानजीक मध्यरात्री रस्त्याच्या वळणावर चार अज्ञात इसमांनी एक ठेकेदार व त्याच्या सहकामगारांना मारहाण करून थकबाकी रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना घडली असून पीडितांनी ही तक्रार स्थानिक सम पोलीस स्टेशन येथे नोंदवली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, धनंजय शंकर पाटील हे त्यांचे ठेकेदार श्री शंकर नरसिंग बामनिया व सहकारी मनिष रतनसिंग परमार हे 12 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11.00–11.15 वाजेच्या सुमारास खामगाव (बुलढाणा) येथून बडवाणी प्लांटकडे जात होते. त्यांच्या कंपनीची ई-युसुजु कॅम्पर (नंबर MP-13-ZU-9420) मुसळी फाटा जवळील Arjuna Hotel पासून सुमारे 500 मीटर पुढे असलेल्या वळणावर गेले असता, मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या Hyundai Aura (नंबर MH-14-LX-8515) या…
वडीगोद्री : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व आमदार धनंजय मुंडें यांना चौकशीला आणा, नसता महागात पडेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला. अंतरवाली सराटी येथे पञकारांशी बोलताना आ. धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याच्या भूमिकेवरून जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही थेट लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले की, तुम्ही किती दिवस पदराआड लपवणार, तो आमचा घात करायला निघाला, त्याला ओबाळीता, चोबळता का? मला यात राजकारण आणावयाचे नाही. हे पाप तुमच्यासाठी चांगले नाही. हे प्रकरण खूप मोठं आहे, हा लहान विषय नाही. चेष्टेवर घेण्याचा विषय नाही. सामूहिक कट रचला गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी पाणी पुरी विक्रेत्याने पैसे देण्याास नकार दिल्याने देविदास गोवर्धन चितळे (वय ५४, रा. वाघनगर) यांच्यासह त्यांचा मुलावर चॉपरने वार केले. यामध्ये देविदास चितळे जखमी झाल्याची घटना रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला मायादेवी मंदिराजवळ घडली. याप्रकरणी संशयित गणेश बुधा सोनवणे (रा. समता नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की , शहरातील वाघ नगरात राहणारे देविदास चितळे यांची महाबह रोडवरील माया देवी मंदिराजवळ पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. दि. ११ रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या गाडीवर गणेश सोनवणे नामक तरुण आला. त्याने मला पाणीपुरी लवकर लाव असे म्हणाला. चितळे यांनी त्याला थांब म्हटले असता, तो…
यावल : प्रतिनिधी साकळी येथील डॉ. आंबेडकर नगरातील रहिवाशी एका ११ वर्षीय बालकाला शिरसाड येथील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी आपल्या सोबत बसवून नेले व त्याला दारू पाजली. त्यामुळे हा बालक अस्वस्थ झाल्याने ट्रॅक्टर चालकांनी त्याला सोडून पळ काढला. बालकाला नागरिकांनी त्याच्या घरी पोहोचवले दरम्यान हा बालक बेशुद्ध पडल्यामुळे कुटुंबाकडून त्याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याबाबत बालकाच्या पालकांनी यावल पोलिसात तक्रार दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, साकळी ता. यावल या गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात बालक बुधवारी सकाळी होता. आपल्या घराच्या बाहेर खेळत दरम्यान शिरसाड या गावातील वाळू वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टर चालकांनी या बालकाला आपल्यासोबत…
जळगाव : प्रतिनिधी अवैध धंदे चालकांकडून एकापाठोपाठ करण्यात आलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांनंतर उपद्रवींवर कारवाई करण्यासाठी पोलिस दलातर्फे विशेष ऑपरेशन राबविण्यात आले. तसेच दिल्लीतील स्फोटानंतर दक्षता म्हणून उपाययोजना करण्यात आल्या. जळगाव उपविभागातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्री ठिकठिकाणी कारवाया करण्यात आल्या. यात २५ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक, मोटार वाहन कायद्यांतर्गत तसेच अवैध मद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. शांतताभंग करणाऱ्यांसह संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. अवैध दारू अड्यांवर गोळीबाराच्या दोन घटना घडल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी मोठ्या बंदोबस्तात तपासणी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील खडका चौफुली ते इदगाह मैदान या रस्त्यावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान बुधवारी सकाळी एका खडीने भरलेला डंपर कलंडला आहे. रस्त्याच्या एका बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, दुसऱ्या बाजूचे काम सुरू आहे. याच भागात खडी टाकण्यासाठी डंपर आणण्यात आला होता. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या सांडपाण्याच्या नाल्यामुळे डंपर कलंडला आणि त्याची एक बाजू कलंडल्याने वाहन अडकले. या घटनेनंतर क्रेनच्या साहाय्याने डंपर बाजूला करण्यात आले. सुदैवाने घटनेत हानी झाली नाही.

