नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या नौगाम पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री ११.२० वाजता भीषण स्फोट होऊन परिसर हादरला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून २७ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी बहुसंख्यजण पोलिस कर्मचारी असून त्यांच्यावर ९२ आर्मी बेस हॉस्पिटल आणि एसकेआयएमएस सौरा येथे उपचार सुरू आहेत. हा स्फोट व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल प्रकरणातील जप्त स्फोटकांचे नमुने तपासत असताना झाला. हरियाणातील फरीदाबाद येथे अटक केलेल्या डॉ. मुझम्मिल गनई यांच्या भाड्याच्या घरातून सुमारे ३६० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. त्यातील एक भाग नौगाम पोलिस स्टेशनमध्ये तपासासाठी ठेवण्यात आला होता. मात्र…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.१५ नोव्हेंबर २०२५ मेष राशी ऑफिसमध्ये तुमच्या कामाबद्दल तुमचे कौतुक होईल. या राशीच्या नवविवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. सर्जनशील कामामुळे आर्थिक लाभ होईल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी तुमचे वैवाहिक जीवन गोड असेल. तुम्हाला नवीन कामे हाती घेण्यासाठी काही चांगल्या संधी मिळतील. आज कोणतीही समस्या शांतपणे सोडवा, गडबडीत निर्णय घेऊ नका. आज तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याची योजना आखाल. मिथुन राशी कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे उत्तम ठरेल, त्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर नुकसान होईल. आज तुम्ही तुमची कामे संयमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बाहेर जेवायला जायचा प्लान ठरू शकतो. कर्क…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणी प्रक्रियेला वेग आला असून, सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने स्पष्टपणे दिसत आहेत. दुपारपर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीएला २०० जागांवर आघाडी मिळाली असून, त्यांची वाटचाल बहुमताच्या पलीकडे असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, महागठबंधन अवघ्या ३९ जागांवर आघाडीवर असून, त्यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्याच्या आशेने उतरलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट)ला मात्र अपेक्षेपेक्षा मोठा फटका बसला आहे. पक्षाच्या एकाही उमेदवाराला दखलपात्र कामगिरी करता आलेली नाही आणि डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने देशभरात मजबूत पाया रचला होता. मात्र,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिरूर कासार न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या प्रकरणात न्यायालयाने हे वॉरंट जारी केले असल्याची माहिती मेहबूब शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिली आहे. चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेहबूब शेख यांनी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवून देखील चित्रा वाघ हजर झाल्या नाहीत. त्यामुळे आता न्यायालयाने आज त्यांच्या विरोधात वॉरंट काढला असल्याची माहिती अंकुश…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव एमआयडीसी परिसरातील आर. एल. चौफुलीजवळील एन सेक्टरमधील ‘आर्यव्रत’ केमिकल कंपनीला आज सकाळी सुमारे ११ वाजता भीषण आग लागली. आग लागल्यानंतर काही मिनिटांतच तिने रौद्ररूप धारण केले असून कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य व अन्य मालमत्ता जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतरावरूनही ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आग आटोक्यात आल्यानंतरच यासंबंधीची माहिती मिळेल, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध ठिकाणांहून अग्निशामक…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावरून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. साधेपणाने विवाहसोहळे करावेत असा नेहमी संदेश देणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला, अशी टीका काही नेटिझन्सनी केली. या टीकेत वैयक्तिक पातळीवरून उलटसुलट बोलणे सुरू झाल्याने इंदुरीकर महाराज मानसिक तणावात असल्याचे दिसून आले. अखेर एका कीर्तनात त्यांनी या प्रकरणाबद्दल मनातील वेदना व्यक्त करत कीर्तन सोडण्याचा विचार जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील…
जळगाव : प्रतिनिधी अंगावर गरम पाणी पडल्यामुळे गंभीररित्या भाजल्या गेलेल्या चेतन जितेंद्र पाटील (वय ४, रा. वाटीका आश्रम) या चिमुकल्याचा उपचार सुरु असतांना दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाटीका आश्रम परिसरात जितेंद्र पाटील हे वास्तव्यास असून ते एसटी वर्कशॉपमध्ये नोकरीस आहे. आठ दिवसांपुर्वी त्यांचा चार वर्षांचा मुलगा चेतन हा घरात खेळत होता. खेळत असतांना त्याने आईकडे पोहे खाण्यासाठी हट्ट धरला. त्याची आई पोहे तयार करण्यासाठी कांदे कापत असताना, चेतन खेळत असताना अचानक बाथरुममध्ये गेला तेथे बादलीत ठेवलेले गरम पाणी चुकून त्याच्या अंगावर पडले.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये रालोआची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे झाली आहे. ताज्या ट्रेंडनुसार, राज्यात पुन्हा एकदा रालोआचे सरकार स्थापन होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे आणि एनडीएने बहुमताचा आकडा सहज ओलांडला आहे. आता भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष झाल्यास मुख्यमंत्री पदावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशातच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणूक आकडेवारीनुसार, दुपारी १२ वाजेपर्यंत, भाजप ८६ , जेडीयू ७८ , आरजेडी ३१ , एलजेपी रामविलास २१ , सीपीआयएमएल ६ आणि काँग्रेस ५ जागांसह आघाडीवर आहेत.…
पुणे : वृत्तसंस्था पिंपरी-चिंचवडमधील चारोळीतील अलंकारपुरम 90 फूट रोडवर बुधवारी सायंकाळी झालेल्या थरारक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. ओळखीतील दोघांनी व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले (38, रा. वडमुखवाडी, चहोली) यांना फॉर्च्युनर कारमध्ये बसवून डोक्यात गोळी झाडत ठार केले. आरोपींनी मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून गाडी घेऊन पसार झाल्याची घटना संपूर्ण सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही घटना सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली. जमीन व्यवहार आणि हॉटेल व्यवसाय करणारे नितीन गिलबिले हे दोन ओळखीच्या व्यक्तींंसोबत कारमध्ये बोलत होते. काही वेळ कारबाहेर चर्चा झाल्यानंतर नितीन परत पुढच्या सीटवर बसताच आरोपींपैकी एकाने अचानक त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. जागीच मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी निपचित पडलेला मृतदेह कारमधून…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर पोलिसांनी आज (दि. १४) पहाटे ४ ते ७ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून विविध गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील १०४ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहर, एमआयडीसी, शनिपेठ आणि रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या निर्णयानुसार ही मोहिम राबविण्यात आली. पहाटे सर्व पोलिस पथकांनी एकाच वेळी गुन्हेगारांची वस्त्या, घरे आणि लपण्याची ठिकाणे याठिकाणी छापे घातले आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत LCB चे पोलीस निरीक्षक…

