जळगाव : प्रतिनिधी कोंबींग ऑपरेशन दरम्यान पोलीस रस्त्यावर कारवाईसाठी सज्ज होते. ईच्छादेवी चौफुलीकडून पाण्याच्या गळतीने डंपर धावत होता. हा प्रकार अजिंठा चौफुलीवर मोहिमेत कार्यरत पोलिसांच्या नजरानी हेरला. या वाहनात वाळू असल्याचा संशय येताच पोलिसांनी डंपर रोखला. वाहनाच्या तपासणीत विना परवाना चालक वाळुची चोरटी वाहतूक करत असल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शहरात समोर आला. गोपनीयरित्या कोंबींग ऑपरेशन राबविण्यासाठी शुक्रवारी पहाटे अचानक पोलीस शहरातील रस्त्यावर उतरले. या मोहिमेनुसार अजिंठा चौफुलीवर हॉटेलसमोर एमआयडीसी पोलीस कारवाईसाठी सज्ज होते. दरम्यान साडेपाच वाजेच्या सुमारास एका टाटा कंपनीचा हायवा डंपर ईच्छादेवी चौकाकडून एमआयडीसीच्या दिशेने महामार्गावरुन येत होता. डंपरच्या पुढे अथवा मागे परवाना पासिंग नंबर टाकलेला…
Author: editor desk
आजचे राशीभविष्य दि. १६ नोव्हेंबर २०२५ मेष राशी व्यावसायिकांनी आज चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवावेत, जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरेल. मित्रांसोबत गप्पा मारल्याने तुमचा मूड सुधारेल. आज तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही रस असेल. वृषभ राशी जर तुम्ही जमिनीशी संबंधित नवीन व्यवहार करणार असाल तर प्रथम त्याची पूर्णपणे चौकशी करा. आज अनोळखी लोकांशी बोलताना योग्य भाषेचा वापर करा. मिथुन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असेल. व्यवसायात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीत जन्मलेले लोक त्यांच्या जोडीदारासोबत घरी चित्रपट पाहण्याची योजना आखू शकतात. पूर्वी एखाद्याला उधार दिलेले पैसे आज परत मिळतील. कर्क राशी तुमची सर्व कामे घाईघाईने पूर्ण करताना तुम्हाला थोडासा…
मुंबई : वृत्तसंस्था बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेले विधान लक्षवेधी ठरले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेवर विजय मिळवणे शक्य होईल, असे ते म्हणाले. अलीकडेच त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रथमच एकाच व्यासपीठावर दिसले. त्यानंतर दोन्ही पक्षांत युती होण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. या चर्चेबाबत खैरे म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मोठा परिणाम दिसेल. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात येईल, हे कोणीही नाकारू शकत नाही.” त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब…
जळगाव : प्रतिनिधी पारोळा शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गु.र. नं. ३०७/२०२४ भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक आरोपीला अटक करून त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याचे लक्षात घेऊन मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मा. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी पोउनि. जितेंद्र वल्टे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. या पथकातील अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत. ते आम्हाला मतदान करत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच कारण नाही. जो जीता वही सिकंदर, असे ते म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सरकारने महिलांना वाटलेल्या प्रत्येकी 10 हजार रुपयांमुळेच एनडीचे बिहारमध्ये विजय झाल्याचा दावा केला. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात भाजपच्या बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयावर…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप, ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या महायुतीचा विजय झाल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचितने या प्रकरणी काँग्रेसला आपण मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेतून बाहेर येण्याचाही सल्ला दिला आहे. काँग्रेसने मोठ्या भावाच्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला भाऊ मानू, तुमच्याशी युतीही करू. पण तुम्ही मोठे राहिला नाहीत, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, असे वंचितने म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप – जदयु आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग 5 व्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सर्वच पक्षातील उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही सादर करता येणार आहेत. संगणक प्रणालीत अडचणी येत असल्याने आणि उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. निवडणूक आयोगाचे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर…
जळगाव : प्रतिनिधी शहरालगत गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर जिल्हा प्रशासनाने दि. १४ नोव्हेंबर रोजी कारवाई केली. खेडी खुर्द, धानोरा, दापोरा, निमखेडी, कांताई बंधारा परिसरात प्रशासनाच्या पथकांनी एकाच वेळी धाड टाकत जवळपास एक ते दीड किलोमीटर लांबीचा अवैध वाळू साठा जप्त केला. जप्त झालेल्या वाळूची अंदाजे किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचे प्राथमिक अंदाजात स्पष्ट झाले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या पथकाने केली आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या रेती उपशाच्या तक्रारी, नदीपात्राचा होत असलेला ऱ्हास आणि पर्यावरणीय धोके लक्षात घेऊन ही मोहिम राबवण्यात आली. अवैधपणे वाळू उपसा होत असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली…
जळगाव : प्रतिनिधी कंपनीतून रक्कम घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला मोबाइलवर बोलण्यासाठी थांबलेल्या कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लांबविली. ही घटना शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) सायंकाळी वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील रेमंड चौकाच्या पुढे बीएचआर पतसंस्थेच्या कार्यालयाजवळ घडली. सात याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसीतील तेलाच्या कंपनीतून सायंकाळी १० लाख रुपयांचे पेमेंट घेऊन एक कुरीयर बॉय जुने बसस्थानक परिसरात दुचाकीने जात होता. त्याच्या मालकाने त्याला कॉल केला व कुरीयर बॉय बोलण्यासाठी रस्त्याच्याकडेला थांबला. यावेळी दुचाकीवर दोन जण तेथे आले व त्यांनी…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाल येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने सोनेरी कोल्हा ठार झाल्याची घटना नुकतीच घडलेली असताना, पाल-खरगोन महामार्गावर पुन्हा एक कोल्हा ठार झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आठ दिवसांत घडलेली ही दुसरी घटना आहे. नर कोल्ह्याला भरधाव वाहनाची धडक बसल्याचा अंदाज आहे. स्थानिकांनी याबाबत वनविभागाला तत्काळ माहिती दिली. या घटनेमागे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. मध्यप्रदेशातून बकऱ्या आणि मेंढ्या ट्रकमधून आणल्या जातात. या प्रवासात गुदमरून मृत्यू झालेल्या बकऱ्या अनेकदा महामार्गालगत टाकल्या जातात. त्या खाण्यासाठी कोल्हे रस्त्याच्या दिशेने येतात आणि धावत्या वाहनांच्या धडकेत त्यांचे प्राण जात आहेत. महामार्गावर वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या वाढत्या घटना चिंताजनक असून प्रतिबंधात्मक…

