पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्रात शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय तणाव अनेकदा उघडपणे दिसला. दोन्ही बाजूंनी स्वतंत्र भूमिका घेत राज्यभर संघर्षाचे चित्र निर्माण होत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये मात्र अनपेक्षित घडामोड घडली आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एका उमेदवाराच्या मागे एकत्र उभे राहिल्याने संपूर्ण राज्यात याची चर्चा सुरु झाली आहे. चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या मनिषा गोरे यांनी अर्ज दाखल करताना, ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोघेही एकत्र उपस्थित होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही गटांनी घेतलेल्या सहकार्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संदर्भात आमदार…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी येथील येथील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज महायुतीतर्फे वैशाली विनय भावे यांनी शिवसेना, महाराष्ट्र जन आघाडी व अपक्ष असे तीन अर्ज दाखल केले तसेच राष्ट्रवादी तर्फे माजी नगराध्यक्ष पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन यांनी अर्ज दाखल केला. ज्योती विनोद माळी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला एकूण पाच अर्ज दाखल करण्यात आले. तसेच नगरसेवक पदासाठी आज ८१ अर्ज दाखल करण्यात आले. त्यात शुभांगी वासुदेव पवार, सुरेखा कन्हैया वाघरे, प्रकाश भगवान महाजन, सुरेखा कन्हैया वाघरे, प्रकाश भगवान महाजन, सुरेखा कन्हैया वाघरे, मंदाकिनी ललित येवले, देवयानी प्रकाश महाजन, राजू साहेबराव न्हायदे, विजया अशोक देशमुख, फिरोज खान आमिर खान, ललित बाळकृष्ण येवले, सुदर्शन सुरेश…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अक्सानगरमधील हमीदाबी जावेद कुरेशी (३०, रा. अक्सानगर) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१५ नोव्हेंबर) रात्री उघडकीस आली. रविवारी सकाळी माहेरची मंडळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचली. या सासरच्या ठिकाणी त्यांनी मंडळींविरुद्ध संताप व्यक्त करीत पैशांसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारल्याचा आरोप केला. हमीदाबी आत्महत्येचा प्रकार लक्षात आल्यानंतर विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मुलीने आत्महत्या केली नसून तिच्या पती आणि सासरच्या मंडळींनी मारहाण करून गळफास दिल्याचा आरोप विवाहितेची आई जरीनाबी शेख हुसेन, वडील शेख हुसेन शेख इब्राहिम, भाऊ शेख हसन शेख हुसेन…
भुसावळ : प्रतिनिधी शहरात शनिवारी दुपारी डायल ११२ या आपत्कालीन सेवेला एक खोटा कॉल प्राप्त झाला, ज्यामुळे पोलिसांची धांदल उडाली. शांतीनगर पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एन. के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात सुमारे १:१५ वाजता आलेल्या या कॉलमध्ये गंभीर माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने या माहितीला अत्यंत गंभीर मानून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मात्र, तपासाच्यावेळी हे सर्व दावे खोटे ठरले. कॉल करणारे नवलकिशोर पाटील (६२), रावेर तालुक्यातील मोरगाव बुद्रुक येथील रहिवासी, हे पोलिसांना सांगत होते की त्यांचा चुलत भाऊ मोबाइलद्वारे शरीरात बसवलेल्या कथित बॉम्बचे नियंत्रण करतो. पण पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या सर्व दाव्यांचा कोणताही आधार नाही, आणि…
आजचे राशिभविष्य दि. १७ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळेल. मालमत्तेच्या बाबतीत निर्णय तुमच्या बाजूने होतील. तुमचे विरोधकही तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील. वृषभ राशी जर तुम्ही सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस खूप चांगला आहे. या राशीखाली जन्मलेल्या वकिलांचा दिवस खूप चांगला जाईल. मिथुन राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. तुम्ही प्रत्येक परिस्थितीत भावनिक संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. जर कठीण परिस्थिती उद्भवली तर शांत राहण्याचा प्रयत्न करा. कर्क राशी आज, कोणतेही मोठे करार किंवा भागीदारी करण्यापूर्वी तुम्हाला काळजीपूर्वक पुढे जाण्याची आवश्यकता आहे.…
बीड : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची साथ सोडून थेट भाजपचा हात धरला आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. आता योगेश क्षीरसागर हे भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावरून बीड नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत. अजित पवारांच्या पक्षाची साथ सोडण्यामागील कारणे सांगताना योगेश क्षीरसागर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. “राष्ट्रवादी सोडण्यामागे काही कारणे होती, आता मात्र मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे,” असे…
चाळीसगाव : प्रतिनिधी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रचार वेग घेत असून, आज प्रभाग क्रमांक ६ मध्ये प्रचार दौरा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हनुमान मंदिर, नेताजी पालकर चौक येथून सुरुवात झालेल्या या प्रचार यात्रेत इंदिरानगर, स्नेह श्रीराम अपार्टमेंट, फुले कॉलनी, मिसाळ गल्ली, छायाप्रकाश स्टुडिओ परिसर, वसंत डेअरी निवासस्थान, कोयल कृपा, छत्रपती शिवाजी चौक, गणेश रोड, गणपती मंदिर, डॉ. सी. टी. पवार दवाखाना, उन्नती मंडळ आणि बलराम शाळा मैदान येथे कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा हा मंगेशदादांच्या सर्वसमावेशक विकासाच्या व्हिजनला बळ देणारा असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रभागातील नागरिकांनी…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी केली. या निर्णयाने मुंबईतील महाविकास आघाडीत त cracks तडे पडले असून, आता ठाकरेंची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हेच पक्ष आघाडीत उरले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. प्रदेश काँग्रेस तसेच मुंबई काँग्रेसमधील अनेक नेते—विशेषतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ—मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा सातत्याने आग्रह धरत होते. त्यानुसार पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला पक्षश्रेष्ठींनी अखेर हिरवा कंदील दिला असल्याचे चेन्नीथला यांनी जाहीर केले. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड…
धुळे : वृत्तसंस्था खान्देशातील धुळे जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पती व सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दिवाळीला माहेरी आल्यावरही हसतखेळत सामान्य दिसणाऱ्या गायत्री पाटील यांनी सासरी गेल्यानंतर सततच्या छळामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निकुंभे शिवार येथे रहाणारी गायत्री आनंदा पाटील (वय अंदाजे ३०) यांनी गुरुवारी रात्री आपल्या ५ वर्षांच्या दुर्गा आणि ३ वर्षांच्या दुर्गेश या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. रात्री साडेअकराच्या सुमारास घटनेचा उलगडा झाल्यानंतर ग्रामस्थांत शोककळा पसरली. आई व दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून…
चाळीसगाव : प्रतिनिधी रस्त्याच्या कडेला उभे राहून रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना अश्लिल हावभाव व इशारा करणऱ्या चार महिलांवर चाळीसगाव शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी २.५५ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईने खळबळ उडाली असून नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. अमितकुमार मनेळ यांना, शहरातील गुजरी पुलाजवळील भाजीपाला मार्केटजवळ रस्त्याच्या कडेला काहि महिला उभ्या राहून अशलिल हावभाव व इशारे करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश दिले. महिला पो.कॉ. स्नेहल मांडोळे, अनिता सुरवाडे, सबा शेख, म.पो.ना. मालती बच्छाव, हवालदार विनोद पाटील, पो.कॉ. रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर पाटोळे, कल्पेश पगारे यांच्या पथकाने तेथे…

