मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या वादामुळे निवडणुकीचे भवितव्य अनिश्चिततेत अडकले आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू केल्यानंतर अनेक शहरांमध्ये एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेपलीकडे गेल्याच्या तक्रारीवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठाने सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. “50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिल्यास आम्ही निवडणूक प्रक्रियाच थांबवू,” असा ठणकावता इशारा न्यायालयाने दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, पूर्वीच्या आदेशानुसार बांठिया आयोगाचा अहवाल लागू करण्यापूर्वीची स्थिती कायम ठेवूनच निवडणुका घ्याव्यात, म्हणजेच ओबीसी आरक्षण नसलेल्या आराखड्याने निवडणूक प्रक्रिया…
Author: editor desk
धुळे : प्रतिनिधी पिंपळनेर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री २.५५ वाजेच्या -सुमारास उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निशा राया वाळवी (वय १८, रा. अस्तंबा, जि. नंदुरबार) या विद्यार्थिनीने १७ नोव्हेंबर रोजी रात्री २.५५ वाजता वस्तीगृहाच्या दुसऱ्या इमारतीतील शौचालयाच्या खिडकीत ओढणी बांधून आत्महत्या केली. वॉचमन सुनीता पावरा यांनी तातडीने गृहपाल विमल जाधव यांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत विद्यार्थ्यांनीस पहाटे ४ वाजता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांनी विद्यार्थिनीस तपासून मृत घोषित केले. याबाबत पिंपळनेर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थिनीकडे कुठल्याही…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील दिनकर नगरातील रहिवासी हर्षल प्रदीप भावसार (वय ३१) या तरुणाचा मृतदेह रविवारी मध्यरात्री दीड वाजता जळगाव ते भादली रेल्वे रुळावर आढळून आला. तर तरुणाची दुचाकी का.ऊ. कोल्हे शाळेजवळ मिळून आली. तरुणाच्या कुटुंबियांनी तरुणासोबत घातपात झाल्याचा आरोप केला. तरुणाला मारुन त्याचा मृतदेह रुळावर टाकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील दीनकर नगरात हर्षल भावसार हा तरुण वास्तव्यास होता. एमआयडीसीतील एका कंपनीत काम करुन कुटुंबाला हातभार लावित होता. रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास त्याने घरी आईला भाजी आणून दिली व स्वयंपाक करून ठेव असे सांगून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील देवीदास कॉलनीतील रहिवासी महेश भास्करराव सावदेकर (वय ५२) यांनी सोमवार दि.१७नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देवीदास कॉलनीतील रहिवासी महेश सावदेकर हे एका महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कामाला होते. सोमवारी दुपारी त्यांच्या पत्नी यशोधरा सावदेकर या कामावर, तर मुलगा क्लासला गेलेला असतांना त्यांनी विषारी द्रव सेवन केले. शेजाऱ्यांनी याबाबत त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ अविनाश सावदेकर यांना माहिती दिली. ते तत्काळ घरी पोहचले व भावाला जीएमसीत दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यांना सेवेत कायम न करता दीड महिन्यांपूर्वी काढून टाकले गेल्याने ते तणावात होते. त्यामुळे त्यांनी…
आजचे राशिभविष्य दि.१८ नोव्हेंबर २०२५ मेष राशी देवाचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील आणि तुम्ही चांगल्या कामांमध्ये सहभागी व्हाल. आज तुमचे मन भावनिकदृष्ट्या मजबूत असेल. तुम्ही दिवस धर्मादाय कार्यात घालवू शकता. आज तुम्ही एखाद्या सहकाऱ्याला किंवा मित्राला मदत करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल. वृषभ राशी तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला वाद आज संपुष्टात येऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटू शकते. तुम्ही स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, नाहीतर आजारपण सतावेल. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये हेलपाटे पडतील आणि खर्च वाढेल. मिथुन राशी तुम्ही बऱ्याच काळापासून तुमच्या कामाबद्दल चिंतेत होता, जर तुम्ही सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात कोणतेही काम केले तर तुम्हाला…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच आज शहरात शक्तीप्रदर्शनाच्या जोरदार वातावरणात भव्य रॅली व जाहीर सभा पार पडली. तसेच नगराध्यक्ष पदासह नगरपरिषदेसाठीच्या ३६ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर आयोजित या सभेला माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह भाजपचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातून निघालेल्या ढोल-ताशांच्या गजरातील रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. दरम्यान, प्रतिभा चव्हाण यांनी नामांकनापूर्वी शिवनेरी निवासस्थानी कुलदैवताचे दर्शन घेऊन आशिर्वाद प्राप्त केले.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राजकारण चांगलेच तापले असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे भरपाईचे पॅकेज आणि कर्जमाफीची मागणी, या सर्वांवर विरोधक सरकारला घेरत असतानाच फडणवीस यांनी कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. मराठवाड्यात मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली आणि अनेक भागामध्ये शेतजमिनी, पिके, गुरेढोरे वाहून गेली. या अनपेक्षित आपत्तीमुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले. राज्य सरकारने नुकसानभरपाईसाठी पॅकेज जाहीर केले असले तरी…
जळगाव : विजय पाटील राजकारणात एखाद्या गोष्टीचे लागलेले घाव किती माणूस जवळ आला तरी विसरू शकत नाही काही बाबतीत विसरतो परंतु प्रसंगी वेळ आली की बरोबर दाखवतो रंग असाच हिचा काहीसा पुढे आलेला आहे. सर्वपक्षीय होऊ पाहत असलेले भुसावळचे विजू भाऊ यांना भाजपाकडून यावल व भुसावळ मध्ये उमेदवारी पाहिजे होती यावलमध्ये मुलीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष व मुलासाठी भुसावळमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारी पाहिजे होती. परंतु जिल्हा बँक निवडणुकीत एका कागदाने संकट मोचकांचे सर्व राजकारण फेल झाले होते आणि ही जखम विसरून भाजपात संबंधित भुसावळचे भाऊ दाखल झाले परंतु जुने घाव मात्र संकटमोचक विसरू शकले नाही असे या राजकीय घडामोडी वरून दिसते असो…
जळगाव : विजय पाटील वरणगावपाटोपाठ मुक्ताईनगर नगरपालिकेत देखील मोठी राजकीय खेडी खेळली गेली आमदाराला रोखण्यासाठी मुक्ताईनगरच्या फार्म हाऊस वरून सूत्र हालले आणि तुतारी ऐवजी कमळ या चिन्हावर सर्व उमेदवार देण्याच्या निर्णय झाला आता मुक्ताईनगर मध्ये तुतारी नसून कमळ फुलणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर शहरात तुतारीने 828 मतांनी आघाडी घेतली होती आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर शहरात मागे होते असे असताना तुतारीचे वजन नाही संघटन नाही म्हणून राजकीय खेळी खेळून तुतारी ऐवजी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सर्व सूत्रे हे सुनेकडे सोपवले गेले. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या राजकीय ठेकेदाराच्या मुलीचे नाव पुढे केले गेले तोही फार्म हाऊसचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सौदी अरेबियात आज पहाटे भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. झालेल्या भीषण रस्ते अपघातात किमान ४२ भारतीय उमराह यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज मक्काहून मदीनाला जाणारी एक प्रवासी बसची डिझेल टँकरला जोराची धडक झाली. या दुर्दैवी अपघातात ४२ भारतीय उमराह यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या प्राथमिक वृत्तानुसार, ही घटना भारतीय वेळेनुसार पहाटे १:३० वाजता मुफ्रीहाट याठिकाणी घडली. सुरुवातीच्या वृत्तांनुसार, धडक इतकी भीषण होती की अनेक लोक जागीच मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झाले. स्थानिक अधिकारी आणि आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि…

