जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जरांगे यांनी दावा केला आहे की त्यांच्या घातपाताच्या कटामागे धनंजय मुंडेच मुख्य सूत्रधार आहेत आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी स्वतःला देण्यात आलेले पोलिस संरक्षण नाकारण्याचा निर्णय घेत, ते तातडीने काढून घेण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यांच्या वतीने सहकारी किशोर मरकड यांनी आज जालना पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे अधिकृत अर्ज सादर केला. अर्जात जरांगे यांनी नमूद केले आहे की त्यांच्या जीवावर झालेल्या कटाचे सूत्रधार…
Author: editor desk
संकटमोचकांचा करिश्मा : जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन जामनेर : प्रतिनिधी राज्यात अनेक ठिकाणी भाजपकडून नगराध्यक्ष बिनविरोध होत असल्याच्या चर्चेला आता जळगाव जिल्ह्यातही अधिक बळ मिळाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जामनेर नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर साधनाताई गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड झाली असून, भाजपसाठी ही मोठी प्रतिष्ठेची कामगिरी मानली जात आहे. जामनेरमध्ये महाजन यांच्या प्रभावी राजकीय संघटनशक्तीची पुन्हा एकदा झलक दिसली. नगराध्यक्षपदासाठी कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने उमेदवारी दाखल न केल्याने साधनाताई महाजन यांची निवड घोषीत करण्यात आली. यानंतर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. यासोबतच संपूर्ण नगरपालिका बिनविरोध होण्याचीही चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात महायुतीत नाराजीची राज्यभर जोरदार चर्चा सुरु असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीला भेट देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा संदर्भ स्पष्ट होत नसतानाच विरोधकांनी या दौऱ्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या भेटीवर टिप्पणी करत उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याचे खरे कारण वेगळे असल्याचा आरोप केला. शिंदेंच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेत त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यांच्या मते, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे शॅडो मुख्यमंत्री आहेत, तर प्रत्यक्ष निर्णय दिल्लीतील नेतृत्वाकडून घेतले जातात. अमित…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेषतः रवींद्र चव्हाण हे मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून भाजपकडे वळवत असल्याची तक्रार शिंदेंनी केली असल्याचे सांगितले जाते. या सर्व घडामोडींवर आपले लक्ष असल्याचे आश्वासन अमित शहांनी शिंदेंना दिले. शिंदे आणि अमित शहा यांच्यात सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीत उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दलही शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. “माझी शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मानराज पार्क परिसरात बुधवारी सायंकाळी साधूच्या वेशात आलेल्या दोन भामट्यांनी बोलण्यात गुंतवून ठेवत एका वृद्धाच्या बोटातील सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. काही वेळातच सत्य लक्षात आल्यानंतर वृद्धाने त्या दोघांचा शोध घेऊन अंगठी परत मिळवली. संतप्त नागरिकांनी या दोघांना चोप देत रामानंद नगर पोलिसांच्या हवाली केले. मिळालेल्या माहितीनुसार, मानराज पार्कजवळ राहणाऱ्या वृद्धाला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन जण साधूच्या वेशात भेटले. त्यांनी धर्म, दानधर्माच्या नावाखाली वृद्धाला बोलण्यात गुंतवले आणि हातचलाखी करत बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली. थो़ड्याच वेळात अंगठी गायब असल्याचा प्रकार वृद्धाच्या लक्षात आला आणि त्यांनी नागरिकांच्या मदतीने त्या दोघांचा शोध घेतला. दोघे साधू सापडताच…
जळगाव : प्रतिनिधी फेसबुक पाहत असताना गुंतवणुकीची जाहिरात दिसली अन् तिला क्लिक करताच लिंक ओपन होऊन मोठ्या परताव्याचे अमिष दिसले. त्याला बळी पडून एका वकिलाची २१ लाख ५२ हजार ३६५ रुपयांमध्ये फसवणूक झाली. हा प्रकार १ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान घडला. भुसावळ येथील अॅड. विवेक पाटील (४९) हे १ ऑक्टोबरला फेसबुक पाहत असताना त्यांना गुंतवणुकीविषयी ही जाहिरात दिसली. सविस्तर वरुत असे की , कंपनीत जेवढी गोल्ड गुंतवणूक कराल त्याच्या दामदुप्पट फायदा होईल, असे अॅड. पाटील यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांनी त्यांचे नवीन टेलिग्राम खाते उघडले. त्यावर आलेल्या मेसेजनुसार पाटील हे माहिती देत गेले. हे सर्व झाल्यानंतर कंपनीचा सिनियर मॅनेजर…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सायगाव येथे उसाच्या जाळलेल्या पाचटची ठिणगी शेजारच्या शेतातील उसात पडली. त्यात लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही थरारक घटना सायगाव (ता. चाळीसगाव) परिसरातील शेतात बुधवारी दुपारी १२:३० ते एक वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा दत्तात्रेय माळी (४२, रा. सायगाव, ता. चाळीसगाव) असे या मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी रेखा माळी मजुरीसाठी शेतात गेल्या होत्या. या परिसरातील एका शेतातील ऊस कारखान्याकडे पाठविण्यात आल्यानंतर शिल्लक पाचट जाळले जात होते. त्यातीलच एक ठिणगी शेजारच्या शेतातील उसात उडाली. वाऱ्यामुळे उसाने पेट घेतला. त्याच वेळी रेखा माळी या याच उसाच्या शेतात काम करीत होत्या. या ठिणगीने रौद्ररूप धारण…
आजचे राशिभविष्य दि.20 नोव्हेंबर 2025 मेष राशी आज, तुम्हाला तुमच्या कामासाठी एक नवीन कल्पना सुचू शकते आणि तुम्ही लवकरच ते काम सुरू करू शकता. तुम्हाला मालमत्तेसाठी चांगला सौदा मिळू शकतो. वृषभ राशी आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या प्रियकराशी तुमचे संबंध चांगले असतील. मिथुन राशी तुम्ही इतरांसोबत वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे. कोणीतरी तुमची अधिकृत माहिती लीक करू शकते. तुमच्या कामात काळजी घेणे आवश्यक आहे. कर्क राशी तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुमच्यासाठी अनेक गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. ते दिल्लीमध्ये भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेऊन राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. शिवसेना शिंदे गटाने मंगळवारी भाजपवर पक्षातील पदाधिकारी फोडण्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर शिंदे गटातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदेंचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे गटाचे मंत्री गैरहजर राहिले. बैठकीनंतर शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना फटकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या तणावानंतर बुधवारी शिंदेंनी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागात दोन महिने बंद असलेल्या घरात घरफोडी करून संसारोपयोगी वस्तू चोरणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५२ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लक्ष्मी नगर भागात राहणारे फिर्यादी राजेंद्र दुसाने घरातील एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर, गॅस शेगडी, तांबे-पितळी भांडी यासह इतर संसारोपयोगी वस्तू चोरीला गेल्याचे १२ नोव्हेंबर रोजी निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके यांच्यासह अनुभवी अंमलदारांचे एक पथक नेमले. गोपनीय माहितीच्या आधारे…

