Author: editor desk

अंबरनाथ : वृत्तसंस्था शहरातील उड्डाणपुलावर शुक्रवारी संध्याकाळी  झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना उड्डाणपुलाशेजारील इमारतीवर बसवलेल्या सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६:४२ च्या सुमारास कार चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे नियंत्रण सुटलेली कार रस्त्यावरून भरधाव वेगाने पुढे धावत गेली आणि समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अचानक धडकेचा इतका जोर होता की कारने दोन दुचाकींना चिरडले, तर इतर तीन ते चार दुचाकींना धडक देत कार उलटली. सीसीटीव्ही दृश्यांमध्ये एक दुचाकीस्वार धक्क्याच्या जोराने हवेत दोन-तीन फूट उडून उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. युतीसाठी शिवसेना (उबाठा) शी चर्चा करण्याचा एकमताने घेण्यात निर्णय आला. भाजप सोडून इतरांसोबत युती करण्यास हरकत नाही. समाजवादी पक्ष किंवा मनसे सोबतदेखील युती करण्यास हरकत नसल्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली आहे. दरम्यान, महानगरपालिकेसाठी मनसेला सोबत घ्यायचे की नाही, याबाबत काँग्रेसमध्ये मतभेद दिसत आहेत. शरद पवार यांनी आपण आघाडीत लढलो पाहिजे ही भूमिका मांडल्याचे काँग्रेस नेते…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरातील घाटकोपर परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्रोळी पार्कसाईटमध्ये राहणारे आणि परिसरात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर यांना गुरुवारी सीजीएस कॉलनीत निर्घृणपणे ठार मारण्यात आले. केवळ धक्का लागल्याच्या कारणावरून सुरुवात झालेल्या वादाचे रुपांतर काही क्षणांतच भांडणात झाले आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात संताप व हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, पाचाडकर हे नियमितपणे घाटकोपर स्टेशन परिसरात फेरफटका मारण्यासाठी जात असत आणि त्या वेळीच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेत आरोपी अमन श्रीराम वर्मा (वय 19) याला घाटकोपर पोलिसांनी अवघ्या पाच…

Read More

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना आता धाराशिवमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात नळदुर्ग येथे देवदर्शनाला जाणाऱ्या 5 भाविकांचा बळी गेला. टायर फुटल्यामुळे भरधाव वेगातील जीप एका ट्रॅक्टरला धडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेत इतर 8 जण गंभीर जखमी झालेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील सोलापूर – हैदराबाद महामार्गावरून शनिवारी सकाळी एक क्रूझर जीप भरधाव वेगात जात होती. या गाडीतील प्रवाशी सोलापूरहून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी जात होते. ही क्रूझर धाराशिवच्या अणदूर परिसरात आली असताना अचानक तिचे टायर फुटले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून क्रूझर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही वर्षांपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू असून आता मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या गटाखाली दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या वैधतेबाबत दाखल याचिकेवर आज सविस्तर सुनावणी झाली. महाराष्ट्रासह सर्वच स्तरांवर या प्रश्नावर मोठी चर्चा सुरू असताना, न्यायालयातील आजची प्रक्रिया विशेष लक्षवेधी ठरली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सादर केलेल्या युक्तिवादांमुळे सुनावणी अधिकच गंभीर व महत्त्वाची बनली. आरक्षणाची आवश्यकता, मागासलेपणाचे निकष आणि मराठा समुदायाचे वास्तविक सामाजिक-आर्थिक स्थान यासंबंधी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले. सुमारे दीड तास चाललेल्या या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी विविध कायदेशीर कागदपत्रांचा संदर्भ…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था  शिक्षकी पेक्षाला काळिमा फासणारी ही घटना असून नांदेडमध्ये दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षांच्या‎ चिमुकलीवर शाळेतील शिक्षकानेच ‎अत्याचार केल्याची धक्कादायक घटना‎ उघडकीस आली आहे. मुलीने शाळेत‎ जाण्यास नकार दिल्यानंतर ही घटना‎समोर आली. याप्रकरणी भाग्यनगर‎ पोलिस ठाण्यात संशयित ईशांत लोखंडे‎ याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.‎ पीडित चिमुकली ही शहरातील एका‎ इंग्रजी माध्यमातील शाळेत दुसरीच्या‎ वर्गात शिकत होती. १९ नोव्हेंबरला ती‎ नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली. दुसऱ्या‎दिवशी आईने तिला सकाळी शाळेत ‎जाण्यासाठी झोपेतून उठवले, पण तिने‎ शाळेस जाण्यास नकार दिला. दोन ते तीन‎ वेळेस आई-वडील तिला शाळेत जा ‎म्हणत होते. तरीदेखील पीडितेने शाळेत‎ जाण्यास नकार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातून ६१ नग गॅस सिलेंडर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात चोरी करणारे दोन आरोपी त्यांच्या गुन्ह्यात वापरलेल्या आयशर वाहनासह जेरबंद करण्यात आले आहेत. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर रोजी भारत पेट्रोलियम जळगाव येथून रिफिलिंग केलेले ३४२ नग सिलेंडर एका ट्रक वाहनामध्ये भरून एमआयडीसी परिसरात पार्किंग केले होते. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सदर वाहन जागेवर दिसले नाही. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या या वाहनातून ६१ नग सिलेंडरची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी येथील पंचवार्षिक निवडणुकीी आज माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी ११ वार्डातील २३ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. येथे नगराध्य पदासाठी महायुतीचे महाराष्ट्र जन विकास आघाडीतर्फे वैशाली विनय भावे तर धरणगाव शहर विकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे लीलाबाई सुरेश चौधरी व अपक्ष सुनीता दिलीप महाले हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत महायुती विरोधात महाविकास आघाडीतच रंगण्याची चर्चा होत आहे. तसेच नगरसेवक पदासाठी ११ वार्डातून २३ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यात वार्ड १ धरणगाव शहर विकास आघाडी उषा वाघ, लक्ष्मण माळी, महाराष्ट्र जन विकास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलाला रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून संतोष माणिक चौधरी (६७, रा. निमखेडी शिवार) यांची १२ लाख ५० हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २१ फेब्रुवारी २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी २० नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, संतोष चौधरी यांचा मुलगा जगदीश चौधरी याला रेल्वेत नोकरी लावून देतो, असे संदीप वसंत भोळे, दीपाली संदीप भोळे (दोघे रा. जिल्हापेठ, जळगाव) व त्यांचे साथीदार धीरज पांडुरंग मुंगलमारे (रा. सिंदूरवाफा, जि. भंडारा), अण्णा नामदेवराव गोहत्रे (रा. नागपूर) यांनी सांगितले. त्यासाठी चौघांनी फिर्यादीकडून रोख व ऑनलाइन पद्धतीने…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२२ नोव्हेंबर २०२५ मेष राशी व्यवसायाचा विस्तार होईल, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे, आयुष्यात किरकोळ चढ-उतार होतील. तुम्हाला वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही प्रॉपर्टीबाबत महत्त्वाचे निर्णय घ्याल. वृषभ राशी गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेल्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात, परंतु परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. मिथुन राशी अनपेक्षित खर्चांमुळे आज आर्थिक बोजा वाढेल. आज ऑफिसमध्ये चांगला दिवस जाणार नाही. अस्वस्थ वाटेल. कोणी खास व्यक्ती आज तुमच्यासमोर विश्वासघात करू शकते, सावध रहा. कर्क राशी काम आणि कुटुंबाचा ताळमेळ साधाताना त्रेधातिरपीट उडू शकते, दमछाक होईल. मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या समस्यांवर…

Read More