मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मालेगावमध्ये अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणानंतर शहरात निर्माण झालेला संताप शिगेला पोहोचला आहे. न्यायालय परिसरात जमावाने अचानक धाव घेत गेटकडे ढकलाढकली केली आणि कोर्टात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापले असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा जनतेचा उद्रेक आहे. आज तो गुन्हेगाराविरोधात आहे, पण उद्या हा उद्रेक थेट सरकारविरोधातही उसळू शकतो, अशा शब्दांत त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. वडेट्टीवार म्हणाले की, एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा देशभर दरारा होता. कठोर कारवाई, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता. परंतु गेल्या काही वर्षांत ही…
Author: editor desk
दुबई : वृत्तसंस्था दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस हे स्वदेशी लढाऊ विमान शुक्रवारी डेमो फ्लाइटदरम्यान कोसळले असून या भीषण अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. दुबई वेळेनुसार दुपारी २:१० वाजता, तर भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता हा हादसा झाला. वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, विमान जमिनीवर आदळताच त्याला भीषण आग लागली आणि परिसर काळ्या धुराने व्यापून गेला. भारतीय हवाई दलाने वैमानिकाच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करताच एअर शो परिसरात शोककळा पसरली. अपघातानंतर तातडीने बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनेचे कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने उच्चस्तरीय चौकशी न्यायालयाची स्थापना केली आहे. हवाई दलाच्या तेजस विमानासंबंधी ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी २०२४ मध्ये…
लखनऊ : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथून एक विलक्षण आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षांच्या एका बालकाच्या पाठीवर जन्मापासूनच शेपटीसारखी वाढ होत असल्याने कुटुंबाने त्याला हनुमानाचा अवतार मानून पूजा केली. मात्र त्यामागे गंभीर वैद्यकीय विकार असल्याचे उघड झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवले. सदर बालकाच्या पाठीवरील ही शेपटी 14 सेंटीमीटर लांब होती. मुलाला चालताना, झोपताना किंवा त्या भागाला स्पर्श झाल्यावर तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे पालकांनी अखेर लखनौच्या बलरामपूर रुग्णालयाचा आश्रय घेतला. डॉक्टरांनी तपासणीनंतर हे प्रकरण धार्मिक चमत्कार नसून स्पायना बिफिडा ऑक्लटा नावाच्या दुर्मिळ विकारामुळे शेपटीसारखा उभार वाढल्याचे स्पष्ट केले. रुग्णालयातील बालरोग शल्यचिकित्सक डॉ. अखिलेश कुमार…
जालना : वृत्तसंस्था शहरातील सीटीएमके गुजराती विद्यालयातील एका 13 वर्षीय विद्यार्थिनी शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही, पण विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेची गोष्ट ठरत आहे. सविस्तर वृत्त असे कि, जालन्याच्या सीटीएमके गुजराती विद्यालयातील एका 13 वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारत मृत्युला कवटाळले आहे. आरोही दीपक बिर्लान असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता आठवीत शिकत होती. आज सकाळी शाळेची प्रार्थना झाली. त्यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात जात होते. आरोही देखील आपल्या वर्गात गेली होती. त्यानंतर तिने अचानक उडी मारली. हा प्रकार घडला तेव्हा सर्व शिक्षक प्रार्थनेसाठी…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणारा तणाव हुतात्मा स्मारकावरील कार्यक्रमात स्पष्टपणे झळकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या काही अंतरावर उभे असतानाही नेहमी दिसणारी सहजता, संवाद आणि परस्परांतील जोड काही काळातच लोप पावल्याचे पाहायला मिळाले. दोघांची तणावपूर्ण देहबोली महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत देणारी ठरली. भाजपच्या प्रदेश नेतृत्वातील बदलांच्या चर्चेमुळे आणि शिंदे–रवींद्र चव्हाण यांच्यातील मतभेदाने महायुतीतील तणाव शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेतील घडामोडींवरून चव्हाण यांच्याकडे बोट दाखवले जात असताना, एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर नाराजीचा सविस्तर पाढा मांडल्याचे समजते. मात्र शाह यांनी परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगितले, पण ठोस…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग ६ च्या भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम हडपण्यासाठी एका ५८ वर्षीय महिलेने नावाचे साम्य साधून बनावट कागदपत्र सादर करत शासनाची १६ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित पुष्पा देवराम जावळे (वय ५८, रा. अंबिका सोसायटी धुळे) महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील गट नं. २२०६ मध्ये मूळ मालक पुष्पा देवराम जावळे (वय ७०, रा. भुसावळ) यांच्या मालकीच्या ४८८ चौ.मी. जमिनीचे २०११ आणि २०१३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन झाले होते. या…
धरणगाव : प्रतिनिधी एरंडोल मॉर्निंग वॉक करणाऱ्या धरणगाव तहसील कार्यालयातील लिपिक शिवाजी रघुनाथ महाजन (४२, मूळ पारोळा, ह. मु. एरंडोल) यांना वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग हॉलसमोर गुरुवारी सकाळी घडली. क्रमांक ६वर येथील बैठक हॉलसमोर गुरुवारी सकाळी घडली. शिवाजी महाजन हे धरणगाव तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. ते एरंडोलहून धरणगावला ये-जा करायचे. ते त्यांच्या मित्रांसोबत दररोज सकाळी पायी फिरायला जात असत नेहमीप्रमाणे ते एरंडोल-पारोळा महामार्गावर फिरायला गेले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने (एचआर३८/एडी४१३६) जागीच कोसळले. चालक डंपर त्यांना धडक दिल्याने ते सोडून पळून गेला.
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ येथील दीपनगर महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता भानुदास पुंडलिक लांडवंजारी (वय ५७, रा. नेहरुनगर, जळगाव) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदाराचे मोठे विद्युत बिल दुरुस्त करून वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी लांडवंजारी यांनी ही लाच मागितली होती. अभियंता लांडवंजारी यांच्या अखत्यारीत तक्रारदाराचे वीज बिल दुरुस्त करण्याचे काम होते. त्यांनी २ लाख ५९४ रुपये देयके दुरुस्त करण्याच्या मोबदल्यात बिलाच्या ५ टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने बुधवारी (१९ नोव्हेंबर) एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर, आज गुरुवारी (२० नोव्हेंबर) एसीबीने दीपनगर येथील महावितरणच्या कार्यालयात सापळा…
आजचे राशिभविष्य दि.२१ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, यामुळे तुमचे काम सोपे होईल. तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून काही सल्ला मिळेल. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटून आनंदी व्हाल. वृषभ राशी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा विचार कराल. आज तुमची आवड आध्यात्मिक ज्ञानात असेल. व्यवसाय आणि कुटुंबात संतुलन राखले जाईल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेल्या कामाचा होईल श्रीगणेशा, मागचे शुक्लकाष्ठ संपेल , कामात यशही मिळेल. मिथुन राशी आज, इतरांमध्ये हस्तक्षेप केल्याने बदनामी होऊ शकते. तुमचे मैत्रीपूर्ण वर्तन तुम्हाला लोकांना आवडेल. तुमचे विरोधक तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतात, सतर्क रहा. कर्क राशी आज ऑफिसच्या कामामुळे तुम्हाला अचानक प्रवास करावा…
हिवाळ्यात शेंगदाणे हा सर्वांचा आवडता नाश्ता असतो. अनेक वर्षांपासून आजी-आजोबा थंडीत शेंगदाणे खाण्याचा सल्ला देत आले आहेत. योग्य प्रमाणात शेंगदाणेचे सेवन शरीरासाठी अत्यंत हितकारक मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, शेंगदाण्यात प्रोटीन, चांगले फॅट, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर आणि व्हिटॅमिन ई असे अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे शेंगदाणे पौष्टिकतेचा उत्तम स्रोत मानले जाते. सर्दीत शेंगदाणे खाण्याचे प्रमुख फायदे 1. हाडे मजबूत होतात हेल्थ एक्स्पर्ट्स सांगतात की शेंगदाण्याचे नियमित सेवन हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे. हिवाळ्यात हाडांच्या तक्रारी वाढू नयेत, यासाठी रोज एक मूठ शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते. 2. सर्दी-खोकल्यापासून दिलासा मिळतो शेंगदाणे शरीराला उष्णता देते. त्यामुळे सर्दी, खोकलापासून आराम…

