आजचे राशिभविष्य दि.२५ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज, तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल, दिवस आनंदात जाईल. उच्च शिक्षणासाठी तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळू शकेल. तुम्ही एखाद्या कौटुंबिक शुभ प्रसंगी पैसे खर्च कराल. जमिनीशी संबंधित प्रकल्प तुम्हाला नफा मिळवून देतील अशी शक्यता आहे. वृषभ राशी तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामानिमित्ताने संबंधित प्रवास करण्याची शक्यता आहे. या प्रवासातून चांगला नफा मिळेल. आज तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. मिथुन राशी व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही फक्त तुमच्या प्रियजनांचा आणि कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्याल. आज कोणत्याही आर्थिक व्यवहारात तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून दोन्ही आरोपी जेरबंद करण्यात आले असून चोरीस गेलेल्या सोन्याचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्या नगरतील एक महिला दुचाकीने घरी पोहोचत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 849/2025 भा.दं.वि. 2023 चे कलम 309(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने…
जळगाव : लाइव महाराष्ट्र न्यूज पारोळा नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात करण बाळासाहेब पवार यांनी केलेली कामे आजही जनतेच्या मनात घर करून राहिलेले आहे. मात्र प्रशासकाच्या काळात पारोळा शहराची पूर्णपणे वाट लागली व शिवसेना शिंदेने जे आहे ते सुद्धा सांभाळले नाही म्हणून निष्क्रिय ठरताना दिसत आहे करण पवार यांची लोकप्रियता वाढल्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली करण पवार यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. पदानी कितीही मोठा झाला माणूस पण शेवटी निष्क्रिय जर राहिला तर तो यशस्वी होऊ शकत नाही याची प्रचिती पारोळेकरांना सध्या होताना दिसत आहे. पैशाने मोठा होता येते परंतु कामाची झलक ही रक्तात असावी लागते.…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते आणि हिंदी सिनेमातील “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. वृत्तसंस्था IANS यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने १२ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. घरच्या घरी उपचार सुरू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते. पुढील महिन्यात, ८ डिसेंबरला, ते ९० वा वाढदिवस साजरा करणार होते. त्यांच्या वाढदिवसासाठी कुटुंबीयांनी विशेष तयारीदेखील केली होती. परंतु त्याआधीच त्यांचे निधन होणे ही मोठी धक्कादायक बाब आहे. या…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात २८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) उघडकीस आली. साखरपुडा झालेल्या तरुणीशी मृत तरुणाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दोन सख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या वातावरणात घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव विशाल गणेशगीर गोसावी (वय २८, रा. जिजाऊनगर, मुक्ताईनगर) असे आहे. गेल्या दोन दिवसांपासून विशाल बेपत्ता होता. रविवारी सायंकाळी हॉटेल वृंदावनसमोरील प्लॉटिंग भागात स्थानिक नागरिकांना एका मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह आढळला. देहावर चाकूने भोसकून केलेल्या हल्ल्याचे स्पष्ट चिन्हे दिसल्याने खुनाचा संशय बळावला.…
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांना पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गर्जे रविवारी मध्यरात्री सुमारास वरळी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. आज त्यांना न्यायालयात उभे करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी वरळी येथील फ्लॅटमध्ये गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे–गर्जे यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. अनंत गर्जे आणि गौरी यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र या कालावधीत अनंत गर्जे यांचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती गौरी यांना मिळाल्याचे सांगितले जाते. या मानसिक त्रासातूनच गौरी यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. गौरीच्या…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे तसेच आसपासच्या शेतशिवारात सुरू असलेल्या रात्रीच्या भारनियमनामुळे शेतकरी वर्गाचे हाल वाढले आहेत. दिवसा शेतीची कामे करून रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाण्याची वेळ आल्याने बळीराजा अक्षरशः हैराण झाला आहे. दिवसा चार दिवस वीजपुरवठा असला, तरी उर्वरित तीन दिवस रात्री वीज देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस रात्रपाळी करावी लागत आहे. सध्या कडाक्याच्या थंडीचा जोर असून अशा परिस्थितीत रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाणे शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरत आहे. यंदा रब्बी हंगामात मका, गहू, हरभरा, ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पाटाचे आवर्तन अद्याप सुरू नसल्याने विहिरसिंचनावरच शेतकऱ्यांचा आधार आहे. मात्र कमी–जास्त दाबाच्या विजेमुळे…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शिरूड गावातील २४ वर्षीय तरुणाचा आंघोळ करताना अकस्मात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २० नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयूर नरेंद्र पाटील (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर सकाळी अंदाजे १० वाजता आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता तो आतमधे कोसळलेल्या अवस्थेत आढळला. तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरूड ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र राजाराम पाटील यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अभ्यासू, नम्र व मनमिळाऊ स्वभावामुळे गावात त्याची चांगली ओळख होती. अवघ्या…
जळगाव : प्रतिनिधी राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी पाचोराहून जळगावात आलेले शिक्षक संदीप प्रल्हाद पवार (४२, मूळ रा. बिल्दी, ता. पाचोरा) यांचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी मू.जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथील जि.प. प्राथमिक शाळेत संदीप पवार हे कार्यरत होते. दुचाकीने आल्यावर परीक्षेसाठी आत जाण्यापूर्वी ते महाविद्यालयासमोरील दुकानावर झेरॉक्स काढण्यासाठी गेले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. पवार यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. ते जुनी पेन्शन संघटनेचे विश्वस्त तसेच शिक्षक सेनेचे पाचोरा…
आजचे राशीभविष्य दि. २४ नोव्हेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम आनंदाचा आणि उत्साहाचा असेल. ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांकडून, विशेषत: मुलांकडून किंवा जवळच्या व्यक्तींकडून, तुम्हाला एक चांगली आणि आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला आर्थिक व्यवहारांमध्ये बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. कोणताही मोठा निर्णय घाईने घेऊ नका. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले सरकारी काम पूर्ण होण्याचे योग आहेत. तसेच, मुलांचे आरोग्य सुधारेल. सरकारी योजनांचा किंवा मदतीचा तुम्हाला पूर्ण फायदा होईल. ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धार्मिक कार्य आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. तुमच्या चांगल्या कार्यामुळे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे समाजात…

