Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत नदीपलीकडील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकासाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक निर्णायक असल्याचा संदेश भाजपने रविवारी आयोजित सभेत दिला. प्रभाग क्रमांक १३ व १४ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या आश्वासनांना प्रतिसाद देत ‘द बेस्ट चाळीसगाव’ या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला. अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत या भागातील समस्यांवर उपाय करण्याचे वचन आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी यावेळी दिले. आमदार चव्हाण म्हणाले की, “नदीपलीकडील भागाने वर्षानुवर्षे एका पक्षावर विश्वास ठेवून मत दिले, मात्र मूलभूत सुविधांसाठीही नागरिकांना सतत संघर्ष करावा…

Read More

चोपडा : प्रतिनिधी आगामी नगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) युतीतर्फे शहरात भव्य रॅली आणि आढावा बैठक आयोजित करण्यात आली. उत्साह, ऊर्जा आणि मोठ्या प्रमाणावरील जनसहभागामुळे ही सभा विशेष ठरली. युतीच्या नेत्यांच्या मते, मिळत असलेल्या लोकसमर्थनामुळे विजय निश्चित असल्याची भावना अधिक दृढ झाली आहे. रॅलीदरम्यान शहरातील विविध प्रभागांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वातावरण प्राणवान केले. नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत स्थानिक परिस्थिती, निवडणूक व्यवस्थापन, प्रचाराची आगामी रूपरेषा आणि संघटन बळकटीवर विस्तृत चर्चा झाली. या कार्यक्रमाला भाजप प्रवक्ते अ‍ॅड. अनिकेत निकम, जीवन चौधरी, भाजप जळगाव पूर्व सरचिटणीस राकेश पाटील, तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे. नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी, राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे, घड्याळाच्या पाठीशी उभं राहिलात तर बारामती सारखा विकास तुमच्याकडे करील, असे विधान केले होते. या विधानाने विरोधकांनी सरकारवर थेट पक्ष निष्ठेच्या आधारे विकासाचे आश्वासन देत असल्याचा आरोप केला आहे. अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा संपूर्ण राज्यात होत असतानाच, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वक्तव्यावर कडक शब्दांत टीका केली. नाना पटोले म्हणाले की, राज्याची तिजोरी एखाद्या व्यक्तीची संपत्ती नसून संपूर्ण जनतेचा निधी आहे. संविधानाने कोणत्याही मंत्र्याला तिजोरी लुटण्याचा किंवा…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यभरात  शिक्षक पात्रता परीक्षा सुरू असतानाच, या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश मुरगूड पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाद्वारे केला आहे. या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरच्या टोळीची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून, मुरगूड पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत. आज राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी बसले आहेत आणि अनेक केंद्रांवर ही परीक्षा सुरू आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही समावेश आहे. या सर्व संशयित आरोपींना पोलिसांनी कागल तालुक्यातील सोनगे येथून ताब्यात…

Read More

पारोळा : प्रतिनिधी शहरातील धरणगाव रस्त्यावर २१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे की , येथील मोरफळ गल्लीत राहणार चेतन सुरेश भावसार (वय ३०) हा तरुण २१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या ताब्यातील दुचाकी एमएच – १९, डीएफ-५०३०) ने येत असताना पारोळा शहराजवळील धरणगाव रस्त्यालगत अज्ञात वाहनाने धडक त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुर्दैवाने चेतन भावसार यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भावेश वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगावातील अटक बोगस कॉल सेंटर हाताळणारे आदील सैयद निशार अहमद सैयद (३२, रा. ओशिवरा, मुंबई) व अकबर खान रौनक अली खान (४०, रा. मालाड पूर्व मकराणी पाडा, मुंबई) या दोघांना मुंबई येथून करण्यात आली आहे. दोघांच्या अटकेमुळे फसवणुकीची रक्कम कोणाच्या खात्यावर आली यासह अनेक बाबींचा उलगडा होऊन आंतरराष्ट्रीय रॅकेटही उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता १० झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील एल. के. फार्म हाऊस येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी छापा टाकला होता. यामध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल होऊन आठ जणांना अटक करण्यात आले होते. ते…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची दि. २९ मे २०२४ रोजी हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी गोलू ऊर्फ धरमसिंग रायसिंग पंडित (वय ३०) याला अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे की , पंडित हा भुसावळात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांना मिळाली. त्यांनी वाल्मीक नगर परिसरात सापळा रचत आरोपी पंडित याला ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे घटनेच्या रात्री राखुंडे आणि बारसे यांना जळगावहून भुसावळकडे कारने येत असताना मरिमाता मंदिरासमोरील पुलाजवळ हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोघांचा जागीच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेत जमीन विक्री असल्याचे सांगत जमीन मालक म्हणून दुसऱ्याच महिलेला उभी करून भगवान काशिनाथ सोनवणे (४२, रा. शिवाजीनगर) यांची सात लाख ७४ हजार ७८६ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. खरेदीवेळी हा प्रकार वेंडरच्या लक्षात आल्याने खरेदी-विक्रीचा व्यवहार फसला. हा प्रकार २० जानेवारी ते २८ एप्रिल यादरम्यान घडला. या प्रकरणी २१ नोव्हेंबर रोजी शहर पोलिसात फसवणूक करणाऱ्या राजपूत नाव सांगणारी महिला, असलम खान अशरफ खान (रा. गेंदालाल मिल), हुसेन मर्चट (रा. नंदुरबार), प्रभाकर सुभाष देशमुख (रा. धुळे) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमधील रहिवासी भगवान सोनवणे यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीतील असलम खान अशरफ…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील दोन भाऊ शिरसाळा येथे दर्शनासाठी जात असताना चुलत भाऊ दुचाकी अपघातात ठार झाले. वाडी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी घडलेली ही घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश समाधान माळी (१७) आणि शुभम भिका माळी (२१, दोघे रा. पाळधी ता. जामनेर) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघे चुलत भाऊ शनिवारी सकाळी चार वाजता शिरसाळा येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी पाळधी येथून निघाले. बोदवडकडे जात असताना मालदाभाडी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दोघे जण रस्त्याच्या कडेला खोल नाल्यात पडले. त्यांना गळा व डोक्याला जबर मार लागला. दोघेही गंभीर जखमी अवस्थेत…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२३ नोव्हेंबर २०२५ मेष राशी तुम्ही तुमच्या करिअरसाठी नवीन योजना बनवाल. तुम्ही तुमच्या गुरूकडून करिअर सल्ला घेऊ शकता. सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. विवाहीत जोडप्याल गुड न्यूज मिळेल. वृषभ राशी आज तुम्ही व्यवसायानिमित्त परदेशात प्रवास करू शकता. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना आज पदोन्नती मिळू शकते. जवळच्या नातेवाईकाच्या आगमनाने घरातील वातावरण उजळून जाईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. मिथुन राशी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. त्यांच्या मनात नवीन कल्पना येतील. आज तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. तुमचा व्यवसाय दुप्पट वाढण्याची शक्यता आहे. कर्क राशी तुम्ही मित्रांसोबत पिकनिकला जाऊ शकता. आर्किटेक्ट म्हणून…

Read More