आजचे राशिभविष्य दि. २६ नोव्हेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आई घरात गोड पदार्थ बनवू शकते. घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी आज नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसाय वाढवण्यासाठी आखलेल्या योजनांचा फायदा होईल. मित्रांशी बोलण्यात तुमचा चांगला वेळ जाईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्ये साथ देतील. बँक कर्मचारी त्यांचे काम लवकर पूर्ण करतील. प्रेम संबंधांमध्ये असलेले लोक एकत्र चांगला वेळ घालवतील. कर्क राशी कर्क राशीच्या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था परळीतील प्रचारसभेत केलेल्या एका विधानामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे हे नव्या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची सभेत आठवण काढल्याचे त्यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. “आज एक व्यक्ती सोबत नाही, याची जाणीव होते,” असे त्यांनी म्हटल्याने त्यांच्या बोलण्याचा संदर्भ आणि उद्देश यावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. प्रकरणातील आरोपीचा सार्वजनिक सभेत उल्लेख योग्य होता का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला असून या वक्तव्याने प्रचारसभेपेक्षा वादाला अधिक उधाण आले आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंवर अत्यंत कठोर टीका केली. “असा माणूस जर कुणाला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भांडूप येथील त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर मोठे विधान केले आहे. राऊत यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडलेली असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवले आहे. मात्र, आज झालेल्या भेटीत राऊत यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले की, आता मी राऊतांना रोज फोन न करता त्यांच्या भावालाच त्यांची खबरबात घेण्यासाठी त्रास देतो. त्यांनी पुढे सांगितले की राऊत आता प्रकृतीच्या अडचणीतून सावरत असून त्यांचे पुनरागमन लवकरच होणार आहे. फक्त परत येणार नाहीत, तर पूर्वीपेक्षा…
ठाणे : वृत्तसंस्था शहरातील पोखरण रोड क्रमांक 2 परिसरातील मामुली वादाने दोन दिवसांतच मोठे रूप धारण करत शहरात तणावाची परिस्थिती निर्माण केली. गांधीनगर येथील अनिल वाईन्ससमोर रिक्षा लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादादरम्यान उत्तर प्रदेशातील रिक्षाचालक शैलेंद्र संतोष यादव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात अयोग्य, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर येताच मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात तणाव वाढला. मनसेकडून पोलिसांकडे तातडीने तक्रार करण्यात आली. पोलिसांनीही तत्परता दाखवत शैलेंद्र यादवला ताब्यात घेतले. मात्र पोलिस ठाण्यातच मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याची माहिती पुढे आली. स्वतः अविनाश…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. केंद्र सरकारतर्फे हजर असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारला अधिक माहिती गोळा करण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी नियोजित केली. या निर्णयामुळे आधीच लांबलेल्या आरक्षण प्रक्रियेत पुन्हा एकदा विलंब झाला असून, राज्यातील निवडणुकांवर अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. याचिकाकर्त्यांनी सुनावणीदरम्यान ठामपणे सांगितले की, अनेक नगरपरिषदांमध्ये 50 टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन होत आहे आणि निवडणूक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर वैदिक मंत्रांच्या गजरात आणि “जय श्री राम” च्या जयघोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मध्वजाचे ध्वजारोहण केले. यावेळी पंतप्रधानांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ध्वजारोहण समारंभात उपस्थित होते. यावेळी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी, “आज संपूर्ण जग राममय झाले आहे.” असे म्हटले. ध्वजारोहणानंतर अयोध्येत पंतप्रधान यांनी, “शतकांच्या वेदना आज अखेर संपत आहेत, शतकानुशतके झालेल्या जखमा बऱ्या होत आहेत. शतकानुशतके केलेला संकल्प पूर्ण होत आहेत. आज एका अशा यज्ञाचा अंतिम अर्पण आहे ज्याची आग ५०० वर्षे जळत होती. एक असा यज्ञ जो कधीही श्रद्धेत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका अगदी जवळ आल्या असून सर्वच पक्षांनी प्रचारयंत्रणेला वेग दिला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण ठळकपणे समोर येऊ लागले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना भाजपकडून दिलेला धक्का राजकीय चर्चेत भर टाकणारा ठरला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायत निवडणुकीला अवघे आठ दिवस शिल्लक असताना उद्धव ठाकरे गटातील मोठी घडामोड समोर आली आहे.ठाकरेसेनेच्या 16 पैकी तब्बल 11 उमेदवारांनी थेट निवडणुकीतून माघार घेतली असून स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या उमेदवारांनी “पक्षाकडून सहकार्य मिळत नाही” असा आरोप करत निषेध म्हणून स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना तटस्थ राहणार असल्याचे जाहीर…
जळगाव : प्रतिनिधी पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता पंधरा हजारांची लाच स्विकारतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे आरखेक वासूदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन मोहीत नगर, जळगाव रोड भुसावळ) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास केली. या कारवाईमुळे खळबळ माजून गेली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे याकरीता तक्रारदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात अर्ज दाखल केला होता. नाहरकत लवकरात लवकर मिळावी या करीता तक्रारदार व त्यांच्या मित्राने कार्यालयात वारंवार फेऱ्या मारीत होते. यावेळी कार्यालयातील आरेखक वासूदेव धोंडू पाथरवट यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता…
जळगाव : प्रतिनिधी भाऊ कामावर व आई बाहेर गेलेली असताना पल्लवी सुभाष सपकाळे (वय ३२, रा. खोटेनगर) या उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लवी सपकाळे ही तरुणी आई व भावासह खोटेनगर परिसरात राहत होती. तिचा भाऊ रेल्वेमध्ये नोकरीला असून, तो कामावर व आई बाहेर गेलेली असताना तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. आई घरी आली त्यावेळी तिला मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.
चोपडा : प्रतिनिधी चोपडा ते शिरपूर जुन्या रस्त्यावर दुचाकी आणि बसच्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ५:४५ वाजता घडली. यात, अन्य एक विद्यार्थी जखमी झाला आहे. जय प्रदीप महाजन (वय १५, रा. अकुलखेडा) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. अकुलखेडा (ता. चोपडा) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी जय प्रदीप महाजन आणि त्याचा मित्र नील हर्षल पाटील हे चोपडा येथे शिकवणीसाठी येत असताना ही घटना घडली. जय आणि नील हे दुचाकीने (क्रमांक एमएच १९ बीएल ०६०७) चोपड्याकडे येत होते. त्याचवेळी चोपड्याकडून गणपरला जाणारी बस क्रमांक एमएच २० बीएल २०८३) आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. या अपघातात जय…

