जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करून तब्बल ८ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडे आहे. सविस्तर वृत्त असे की , १५ नोव्हेंबर २०२५ रोजी विलास मधुकर जाधव (वय ६७, रा. जुनी जोशी कॉलनी, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ८४१/२०२५, भा.न.सं. कलम ३०९(४) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हा उलगडण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापत असताना महाविकास आघाडीचे नेते प्रचारात सक्रिय दिसत नसल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार टीका केली. “लोकशाहीत घरी बसून राजकारण करता येत नाही. लोक आम्हाला मतदान करतील, हा भ्रम चुकीचा आहे. जनतेत जाऊन मतांचा जोगवा मागावाच लागतो,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोधकांना सज्जड सुनावले. फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीचे नेते प्रचारात का नाहीत, याची मला कल्पना नाही. निवडणुकांत लोकांमध्ये जाणे हेच लोकशाहीचे खरे स्वरूप आहे. ज्याला मतदारांमध्ये जायचे आहे तो जातो, ज्याला वाटत नाही तो जात नाही. मला त्याबाबत काही म्हणायचे नाही.” त्यांच्या वक्तव्यामुळे मविआच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळाचे मत…
नाशिक : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यात तिजोरीच्या चाव्यावरून राजकारण तापले असताना आता यासंदर्भात सुरुवातीला एका जाहीर सभेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाला भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दादांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होती. अशातच आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर सभेतून अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नाशिकमधील सभेत संबोधित करताना शिवसेनेचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. अजित पवारांनी मला विचारले विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी भगूरला जाऊ का? मी सांगितले जा आणि पाणीपुरवठा योजनेचे घोषणा…
पुणे : वृत्तसंस्था राज्य सरकारच्या ‘कृषी समृद्धी योजने’अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, योजनेअंतर्गत राज्यातील 2,778 शेतकरी सुविधा केंद्रे गाव पातळीवर स्थापन करण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे. या संदर्भात जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करून त्यांच्या बैठका तातडीने आयोजित करण्याच्या सूचना कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) संचालक सुनील बोरकर यांनी दिल्या आहेत. बोरकर यांनी स्पष्ट केले की, निधी उपलब्ध झाल्यानंतर शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) यांना कामासाठी पूर्वसंमती देण्यात यावी. योजनेचा उद्देश शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटांच्या सहभागातून शेतीसाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे तसेच शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्याचा आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय…
मुंबई : वृत्तसंस्था आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये घेतलेल्या सभेत महत्त्वपूर्ण विधान केले. अंबाजोगाई येथील सभेत जीभ घसरून वापरलेल्या ‘भिकारपणा’ या शब्दामुळे निर्माण झालेल्या वादावर त्यांनी सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सभेत बोलताना पवार म्हणाले, “एखादा शब्द चुकीचा निघू शकतो, पण त्या शब्दाने भावना दुखावल्या असतील तर माफी मागणे माझे कर्तव्य आहे.” त्यांनी स्पष्ट केले की अंबाजोगाईतील अस्वच्छतेवर टीका करताना चुकीचा शब्द वापरला गेला. “तो शब्द माझ्याकडून निघायला नको होता. ती माझी चूक होती,” असे म्हणत त्यांनी जाहीर माफी मागितली. त्यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असताना आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या अलीकडील वक्तव्यावर जोरदार टीका करत केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. जितेंद्र सिंग यांनी मुंबईतील आयआयटी कार्यक्रमात “IIT Bombay चं नाव बदलून IIT Mumbai न केल्यानं चांगलं झालं” असं विधान केलं होतं. या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी फेसबुकवरून थेट प्रहार केला. राज ठाकरे म्हणतात, “हे विधान एखाद्या व्यक्तीचं नसून सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे.” त्यांच्या मते, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न दशकांपूर्वीही झाला होता;…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक भाविक चारधाम यात्रा करत असतात, आता उत्तराखंडमधील चमोली येथे असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होताच या वर्षाची चारधाम यात्राही पूर्ण झाली आहे. या वर्षी 50 लाखांहून अधिक भाविक चारधाम यात्रेला आले. ही यात्रा अक्षय तृतीयेच्या दिवशी, म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे उघडल्याने सुरू झाली होती. संपूर्ण 6 महिने उत्तराखंडच्या दऱ्या ‘जय बद्री-विशाल’ आणि ‘हर-हर महादेव’ च्या गजराने भरलेल्या होत्या. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली. जिथे 2024 मध्ये केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये दर्शन घेणाऱ्यांनी विक्रम केले होते, तिथे 2025 ने हा विक्रमही मोडला. राज्य आपत्कालीन परिचालन केंद्राच्या माहितीनुसार,…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ३० लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणात वाहन चालक किरण भास्कर नांदरे (४३, रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनी येथील एकमुखी दत्त मंदिराजवळ एमएच १९ सीएक्स ६६३४ क्रमांकाचे मालवाहू वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ कालसिंग बारेला, प्रवीण जगदाळे व विनोद सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला…
जळगाव : प्रतिनिधी पती कामावर तर पत्नी मंदिरात गेलेली असताना अवघ्या अर्धा तास बंद असलेल्या घरातून चोरट्यांनी ६७ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी तिवारी नगरमध्ये घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, खासगी नोकरीला असलेले विलास दत्तात्रय सैतवाल (५६, रा. तिवारी नगर) हे २४ रोजी सकाळी कामावर निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नी नीलिमा या सकाळी ११ वाजता घराला कुलूप लावून मंदिरात गेल्या. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील ६० हजार रुपये किमतीची सोनपोत, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, दोन हजार रुपये किमतीची चांदीची मूर्ती…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर–जामनेर मार्गावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मंगळवारी रात्री सुमारे दहा ते साडेदहाच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकी व अवजड वाहनातील धडकेत जामनेरातील तीन आणि पहूरमधील एक तरुण जागीच ठार झाले. तर अवजड वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे, अजय, तिघे रा. जामनेर आणि रवींद्र सुनील लोंढे (रा. पहूर) यांचा समावेश आहे. सर्व मृतांचे वय २२ ते २४ दरम्यान आहे. अपघातग्रस्त वाहनात जनावरांची हाडे आढळून आली असून ही हाडे कोठून कोठे नेली जात होती, याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती. तसेच जखमी चालकाचे नावही समजू…

