आजचे राशिभविष्य दि.२८ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. कुटुंबातील सदस्य एकत्र धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखतील. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीच्या संधी मिळतील. वृषभ राशी तुमच्या मुलाच्या यशामुळे घरात आनंदी वातावरण असेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुमची मुले आज त्यांच्या आईकडे काही महत्त्वाच्या कामासाठी मदत मागतील, ज्यामुळे त्यांना त्यांची कामे पूर्ण करण्यास मदत होईल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. अडकलेलं काम नक्कीच पूर्ण होईल. मिथुन राशी आज, मित्रांच्या मदतीने, तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल आणि तुम्ही…
Author: editor desk
सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीत राजकीय वातावरण तापले होते. अनेक वर्षांपासून या नगरपंचायतीवर राजन पाटील यांचे वर्चस्व होते. ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे दिसून आले. सत्ता कायम ठेवण्यासाठी विविध राजकीय हालचाली घडत होत्या. म्हणूनच 17 जागा बिनविरोध करून दाखवणाऱ्या पाटील यांची ताकद दाखवली. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतच नवा संघर्ष उभा राहिला. राजन पाटलांची सून उमेदवार असताना, अजित पवार गटाकडून उज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर गावात दडपशाही, धमकी यांसारख्या घडामोडी घडल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. उज्वला थिटे यांचा अर्ज तांत्रिक कारणावरून बाद केला गेला आणि या वादाची ठिणगी आणखी…
नवी दिल्ली :वृत्तसंस्था देशभरातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. त्याच संबधित एक बातमी समोर आली आहे. आजच्या काळात सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधार कार्डमध्ये बदल किंवा अपडेट करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. नाव, पत्ता किंवा जन्म तारीख बदलण्यासाठी आता कोणते कागदपत्र आवश्यक असतील, याबाबत UIDAI ने स्पष्ट माहिती दिली आहे. या नवीन यादीमुळे नागरिकांसाठी आधार अपडेट करणे आता अधिक सोपे होणार आहे. आधार कार्ड हे लहान-मोठ्या प्रत्येक कामासाठी अनिवार्य झाले आहे. रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी याची गरज भासते. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यभर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची धामधूम वाढत असताना राजकीय पटलावर मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथील निवासस्थानी आज सकाळी सुमारे ११.३० वाजता अनपेक्षित भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे कोणतीही टीम किंवा पक्षातील प्रमुख नेते न घेता एकटेच पोहोचले. त्यामुळे या भेटीचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. राजकीय वर्तुळात मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका, राज्यातील बदलते राजकीय वातावरण आणि संभाव्य राजकीय युती यांना केंद्रस्थानी ठेवून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात पुन्हा नवे समीकरण…
बीड : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मोठ्या घटना घडत असताना आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ बुधवारी रात्री शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री उशिराच्या सुमारास मांदगावजवळ नगर-सोलापूर महामार्गावर दहा ते पंधरा जणांच्या मुखवटा बांधलेल्या टोळक्याने त्यांची गाडी अडवून जोरदार हल्ला केला. दगडफेक, गाडीची तोडफोड आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करत हल्लेखोरांनी राम खाडे यांना गंभीर जखमी केले. त्यांच्यासोबत असलेले सहकारीही मारहाणीमुळे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर या घटनेत राजकीय कटकारस्थान असल्याची शंका अधिक तीव्र…
नांदेड : प्रतिनिधी वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील सभेत भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्यावर थेट आणि तीव्र शब्दांत निशाणा साधला. चव्हाण यांच्या कुटुंबाकडे असलेल्या विविध एजन्सी आणि आर्थिक सामर्थ्याचा संदर्भ देत शिरसाट यांनी विचारले “अशोकराव भाकरी खातात का नोटा?” नांदेड जिल्ह्यातील १३ नगर परिषदांच्या निवडणुकीचे रणांगण तापले असून, भोकर आणि मुदखेड या दोन नगरपालिकांत खा. चव्हाण यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यात खा. अशोक चव्हाण आणि खासदार चिखलीकर यांच्यातील वाकयुद्धाला आता बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या हल्ल्यांनी अधिक धार आली आहे. भोकर नगर परिषदेसाठी शिवसेनेने सुभाष…
एरंडोल : प्रतिनिधी आडगावकडून भरधाव येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत येथील कापसासह फळांचा व्यापार करणाऱ्या प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की , आडगाव येथील तरुण दुचाकी (एमएच- १५, केइ २९४९) ने भरधाव वेगाने आडगावकडून येत असताना त्याच्या दुचाकीने येथील अशोक भिका भोई (वय ५५) यांना जबर धडक दिली. एरंडोल ते कासोदा रस्त्यावर साई हॉस्पिटल समोर ही घटना घडली. या घटनेनंतर अशोक भोई यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथे दाखल करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. याबाबत उशिरापर्यंत कासोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती. मयत अशोक भोई हे कापसासह फळांचा व्यापार करत होते. त्यांच्या पश्चात…
जळगाव : प्रतिनिधी एकाच रात्री सहा दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर तेथून सहा लाखांची रोकड चोरुन नेली होती. ही धाडसी चोरी केल्यानंतर चोरट्यांनी वेशांतर केले आणि ते रिक्षाने बस स्थानकावर गेले. तेथून बसने शिरपूर पर्यंत आणि त्यानंतर खासगी वाहनाने ते मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका गावात गेल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यानुसार पोलिसांकडून या चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे. सविस्तर वृत्त असे की , शहरातील एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजारा शेजारी असलेल्या मार्केटमधील सहा दुकानांमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास दुकानांचे शटर उचकवून चोरट्यांनी सहा लाख रुपयांची रोकड व चांदीचे शिक्के चोरून नेले होते. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या १५ ते २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शंकर राठीया मेहता (१७, रा. शिरवेल, अंबागाव, मध्यप्रदेश, ह.मु. विटनेर, ता. जळगाव) या तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (२६ नोव्हेंबर) विटनेर शिवारातील जंगलात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिरवेल अंबागाव येथील शंकर मेहता हा आई, वडील व भावांसह वर्षभरापूर्वी मजुरीसाठी जळगावात आला होता. विटनेर शिवारातील एका शेतात ते शेतमजुरी करीत होते. शंकर अनेक वेळा घरातून कोणाला काहीही न सांगता निघून जात होता. मात्र पाच-सहा दिवसानंतर तो पुन्हा घरी परतत होता. आता १५ ते…
आजचे राशिभविष्य दि.२७ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस काही नवी गोष्टशिकण्याचा असेल. तुम्ही जुन्या मित्राला मदत कराल. दैवी पाठिंब्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात भरभराट कराल. तुमच्या विरोधकांपासून खूप सावध रहा. तुमचा स्टील व्यवसाय यशस्वी होईल आणि जास्त नफा मिळेल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नवीन बदल आणेल. आज तणाव जास्त असेल. प्रलंबित काम पुन्हा सुरू होईल. तुमच्या मैत्रीपूर्ण स्वभावाचा फायदा तुमच्या सहकाऱ्यांना होईल. वाईट संगत टाळा, कारण आज नुकसान होऊ शकते. मिथुन राशी आज नव्या ठिकाणी जाता येईल, प्रवासाचा योग असेल. तुमचे तणाव कमी होतील. तुम्ही परिश्रमपूर्वक काम कराल. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक संबंध अधिक सुसंवादी होतील…

