आजचे राशिभविष्य दि. २९ नोव्हेंबर २०२५ मेष राशी नोकरी करणाऱ्यांना त्यांना नेमून दिलेली कामे आजच पूर्ण करावी लागतील, नाहीतर अडचण वाढेल. आज वरिष्ठांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. व्यवसाय वाढविण्यासाठी व्यावसायिक नवीन योजना राबवतील. आर्थिक फायदा होईल. वृषभ राशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि भविष्यातील समस्या टाळण्यासाठी पैसे कसे वाचवायचे ते शिकाल. आज तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील सोपवल्या जातील. मिथुन राशी आज, मित्रांच्या मदतीने, तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल आणि तुम्ही आयुष्य पूर्णतः जगाल. विद्यार्थ्यांना आज मोठं यश मिळेल. कर्क राशी हवामानातील बदलांमुळे तुमच्या आरोग्यात…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या धमकीवजा वक्तव्याने नवे वादळ उठवले आहे. “मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापून काढू,” असे शब्द देशमुख यांनी सार्वजनिक व्यासपीठावर उच्चारले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत देशमुखांच्या भाषेचा तीव्र निषेध केला. “ही भाषा नक्षलवाद्यांची नव्हे, तर सत्ताधारी भाजप आमदारांची आहे. विरोधकांना कापून टाकण्याची मानसिकता लोकशाहीसाठी घातक आहे,” अशी टीका त्यांनी केली. रोहित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही थेट सवाल उपस्थित केला.…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दीड महिन्यापासून माध्यमांपासून दूर असलेले प्रकृतीच्या कारणांमुळे शिवसेनेचे खासदार आणि पक्षाचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत पुढील आठवड्यात पुन्हा सक्रिय होणार आहेत. येत्या सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती पुढारी न्यूजचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी दिली. संजय राऊत हे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे महत्त्वाचे चेहरे असून, २०१९ मधील महाविकास आघाडी सरकारपासून त्यांनी दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून ते आरोग्य कारणास्तव या दिनचर्येपासून दूर होते. त्यांच्या उपचारांचा कालावधी आता संपत आल्याची माहिती मिळत आहे. राऊत यांनी या काळात माध्यमांशी प्रत्यक्ष संवाद साधला नसला तरी ‘सामना’च्या माध्यमातून ते…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या ५० टक्के आरक्षणाच्या आक्षेपावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. मात्र, ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण असलेल्या ४० नगरपरिषदा आणि १७ नगर पंचायतींचा अशा एकूण ५७ संस्था अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल, अशी माहिती कोर्टाने दिली आहे. या निवडणुकांबाबतचे प्रकरण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रथम तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवण्याचे…
सोलापूर : वृत्तसंस्था कुर्डूवाडी येथील नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे दोन्ही पक्ष एकत्र लढत असून, या एकीमुळे भविष्यातील मोठ्या राजकीय बदलांची सुरूवात होऊ शकते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी केले. गांधी चौकातील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व दोन्ही पक्षांचे उमेदवार उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नंतर जिल्ह्यात मोठे नेतृत्व निर्माण झालेले नाही. काही जण जिल्ह्यातील नेतृत्वालाही घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. कुर्डूवाडीच्या विकासाच्या प्रश्नांना आपण नेहमीच प्राधान्य दिले असून, शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे…
जळगाव : प्रतिनिधी हॉटेल विक्रीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचा गंभीर परिणाम म्हणून के पी. प्राईड हॉटेलचे मालक खुबचंद प्रेमचंद साहित्या (६०, रा. मोहाडी रोड) यांना चार अनोळखी इसमांनी रुममध्ये घुसून बेदम मारहाण केली. बेल्टने तसेच लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाकिटातील २० ते २५ हजारांची रोकड जबरीने काढून आरोपी पसार झाले. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलच्या रुम क्रमांक २०७ मध्ये घडली. शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खुबचंद साहित्या यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलगा नितीन साहित्या यांनी काही वर्षांपूर्वी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी घरात शिरुन झोपलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला. ही घटना दि. २६ रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका गावात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटूंबासह वास्तव्यास आहे. संशयित स्वप्नील दत्त सपकाळे हा तरूण ती शाळेत जाताना तिचा पाठलाग करायचा. हा प्रकार मुलीच्या कुटूंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर त्याने २६ रोजी पहाटे ४ वाजता अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून ती झोपलेली असतांना तिच्यासोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग…
जळगाव : प्रतिनिधी सावखेडा शिवारातील वर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम, गुरुकुल किड्ससह चार शाळांना टार्गेट करत चोरट्यांनी तब्बल १ लाख ९४ हजारांची रोकड लांबवली. २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही चोरी घडली असून तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली असून फुटेजमध्ये तरुण मुलींचा सहभाग दिसून आल्याने पोलिसांसमोर नवे धागेदोरे मिळाले आहेत. फिर्यादी आशिष चंद्रकांत अजमेरा (५३, रा. हरेश्वर नगर), मुख्याध्यापक — वर्धमान सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल — यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या फी आणि शिष्यवृत्ती परीक्षेची एकूण १ लाख ३५ हजारांची रक्कम चोरीस गेली आहे. शहरापासून दूर आणि पूर्णपणे शेतशिवारात असलेल्या या शाळांना…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील नाडगाव येथे ग्राम दक्षता पथकाच्या तरुणांनी राखवालदार राधेश्याम किशोर पावरा (वय २०) यांच्या हिंमतीने चार संशयितांना पकडले, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नकली नोटा सापडल्या. यावेळी काही वेळातच गावकरी धावून आल्याने मारहाणीत दोन आरोपी हे जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात सर्वाधिक चोऱ्या नाडगावमध्ये झाल्या आहेत. चोरीवर आळा बसविण्यासाठी बोदवड पोलिसांनी ग्राम दक्षता समिती स्थापन केली. समितीचे सदस्य रात्री गावात गस्त घालत असताना गुरवारी पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान नाडगाव येथील कोल्हाडी रस्त्यावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात काही संशयित दरोडेखोर दडून बसले होते. असा संशय रखवालदाराला आला. रखवालदाराने शेतात…
भुसावळ : प्रतिनिधी निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालत असलेल्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दरोडा टाकण्यासाठी एकत्र जमलेल्या टोळीवर मोठी कारवाई करत तिघांना रंगेहाथ पकडले. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केट भागात घडली. पथकाने गावठी पिस्तूल, चॉपर, मिरची स्प्रे, तीन विनानंबर मोटारसायकली, मोबाइल फोन यांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले. पाच जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते; मात्र गुरुवारी सकाळी आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी रात्री सुमारे १० वाजता पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्यासह पो.हे.कॉ. विजय नेरकर, कांतीलाल केदारे, रमण सुरळकर, प्रमोद तायडे, सोपान पाटील, पो.कॉ.…

