जळगाव : प्रतिनिधी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. विना परवाना गावठी पिस्तुलसह कोयता घेवून दहशत माजविणारा हद्दपार आरोपी तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचननगर), खुशाल पितांबर सोनार (वय २१) व चेतन पितांबर सोनार (वय २३, दोघ रा. पार्वताबाई ओक नगर) यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई दि. २५ रोजी रात्री नेहरु नगरात केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातून हद्दपार असलेला तेजस सोनवणे याच्यासाह खुशाल सोनार व चेतन सोनार हे तिघे शहरातील नेहरु नगरातील संदीपनी बॉईज हॉस्टेजवळ गावठी पिस्तुल व कोयता घेवून दहशत माजवित होते. याबाबतची…
Author: editor desk
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील उंदिरखेडे गावात एका होतकरू अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सचिन गणेश चांदवडे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो ‘जमतारा २’ आणि ‘असुरवन’ या वेब सीरिजमध्ये झळकणार होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने उंदिरखेडे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन चांदवडे हा स्वप्नाळू आणि होतकरू अभिनेता म्हणून ओळखला जात होता. अभिनयाची आवड जोपासत असतानाच तो पुण्यातील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत होता. कामाच्या व्यापातही तो अभिनय क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी झटत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला दोन वेगवेगळ्या वेब सीरिजमध्ये भूमिका मिळाली होती, ज्यामुळे त्याच्या मित्रपरिवारात आणि गावात…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर येथील कार्यालयात चक्क लावणीचा कार्यक्रम घेण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, त्यात एक महिला कार्यकर्ती लावणी सादर करताना दिसून येत आहे. याविषयी समाज माध्यमांत उलटसुलट चर्चा रंगली आहे. अजित पवारांनी दोन महिन्यांपूर्वी नागपुरातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. राष्ट्रवादीच्या नागपूर शहराध्यक्षांनी नुकताच या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने 2 गाण्यांवर लावणी सादर केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला त्यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित…
मुंबई : वृत्तसंस्था यंदा श्री. क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक- प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातुन एसटी महामंडळ तब्बल ११५० जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली. पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या ‘ चंद्रभागा ‘ या यात्रा बसस्थानकावरून दिनांक २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे. या बसस्थानकावर १७ फलाट असून सुमारे १००० बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे. तसेच सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय देखील या बसस्थानकामध्ये करण्यात आली आहे. प्रत्यक्ष यात्रे…
मुंबई : वृत्तसंस्था मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मुसळधार पावसामुळे राज्यातील बळीराजा कोलमडला आहे. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. यातच आता पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भावर अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. हे सावट पुढचे चार-पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणासह राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.…
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी दांपत्य सहभागी होत असते, मात्र आता या महापूजेमध्ये जिल्हा परिषदेचा एक विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश करण्याची मागणी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. या मागणीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले असले तरी, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा मूळ अधिकार हा शासनाकडेच असणार आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असल्याने, शिक्षण मंत्र्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी केलेली जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या समावेशाची मागणी एक नवीन परंपरा सुरू करू शकते. यावर वारकरी संप्रदायाची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी 1997…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका चित्रपटगृहातील शौचालयामध्ये गेलेल्या तरुणीचे शेजारील शौचालयातून अर्धनग्न चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शाहूनगरनजीक एका मॉलमधील चित्रपटगृहात घडली. याप्रकरणी १७वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ठाणे येथील १९ वर्षीय तरुणी दिवाळीनिमित्त जळगावात तिच्या मामाकडे आली होती. २४ ऑक्टोबर रोजी ती तिच्या आई व मावशीसह चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. संध्याकाळी चित्रपट संपल्यानंतर सदर तरुणी शौचालयात गेली. त्यावेळी शेजारील शौचालयातून एक मुलगा मोबाइलमध्ये तिचे चित्रीकरण करीत असल्याचे तिला दिसले. त्यावेळी तरुणी घाबरलेली असल्याने तिने तक्रार दिली नाही. मात्र याप्रकरणी तिने २४ ऑक्टोबर रोजी शहर…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण गंभीर झाले. त्यात एक सहा वर्षीय बालिकेचा पाय निकामी झाला, तर दुसऱ्या अपघातात साठ वर्षीय महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. २५ रोजी रात्रीच्या सुमारास पाऊस सुरू होता. यावेळी बोदवडहून दुचाकीने साळशिंगीकडे जाताना पुढे चालणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने दुचाकी व डम्परमध्ये धडक झाली. त्यात मामाच्या घरी भाऊबीजेनिमित्त आलेली मृणाली गोकुळ हिवाळे (वय ६, रा. मोहाडी, जळगाव) या बालिकेच्या डाव्या पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर सोबतचे दोन जण जखमी झाले. दुसऱ्या घटनेत २६ रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जामनेरहून मुक्ताईनगरकडे जाणारी चारचाकी बोदवडच्या बरडीया शाळेसमोर उलटली. त्यात कमलबाई जीवनगीर…
आजचे राशिभविष्य दि.२७ ऑक्टोबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. हा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने अधिक फलदायी ठरेल. कामात आज तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्यातील उत्तम बोलण्याची कला आणि आर्थिक व्यवस्थापन क्षमता याचाही तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत अविस्मरणीय क्षण घालवू शकाल. शिक्षण क्षेत्रात आज विद्यार्थ्यांना यश मिळेल. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायक ठरणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात कोणतीही मोठी डील मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी वेळ घालवाल. तुम्हाला नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते. संध्याकाळी तुमच्या घरी एखादा मित्र…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी “मी 10 वर्ष नगरसेवक होतो. आता चार टर्मचा आमदार आहे. झाले तेवढे पुरे, आता थांबले पाहिजे” असे वक्तव्य करून आपल्या समर्थकांना ऐन दिवाळीतच धक्का दिला आहे. संजय शिरसाट यांनी या वक्तव्यामुळे राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले की, कुटुंबातील नव्या पिढीला पुढे आणण्यासाठीची ही भूमिका आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय शिरसाट यांचे हे वक्तव्य रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर समोर आले आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या 5 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांनी रान पेटवले आहे. आज त्यांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा…

