नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात घट करण्यात आली आहे. 1 डिसेंबरपासून दिल्लीसह मुंबई, कोलकाता, पुणे, चेन्नई आदी महानगरांमध्ये सिलेंडरचे दर १० ते १०.५ रुपयांनी कमी झाले असून, हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट्स आणि फूड इंडस्ट्रीसाठी हा दिलासा मानला जात आहे. IOCL च्या आकडेवारीनुसार नवे दर पुढीलप्रमाणे आहेत— दिल्ली : ₹1,580.50 | मुंबई/पुणे : ₹1,531.50 | कोलकाता : ₹1,684 | चेन्नई : ₹1,739.50 तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे व नैसर्गिक गॅसचे दर कमी असूनही रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे मोठी कपात करता आली नाही. येत्या काळात रुपया मजबूत झाला तर अधिक घट होण्याची शक्यता आहे.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी किराणा सामान खरेदी करण्यासाठी एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची कार्ड अदलाबदल करून २५ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की , चंदूआण्णा नगर येथे राहणारे रमेश हरचंद मोरे (वय ६६) हे सेवानिवृत्त पोलिस अंमलदार आहेत. दि. २९ रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते दैनंदिन किराणा खरेदीसाठी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्य शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी प्रवेश केला. मशीनने पैसे न दिल्याने त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ‘मदत’ करण्याच्या बहाण्याने मोरे यांना…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील नवनाथ नगर येथील घरी कोणीही नसतांना सुभाष मोतीराम पाटील (वय ५३ ) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठल नगरात सुभाष पाटील हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास होते. सर्वजण नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास कामावर निघून गेले होते. त्यामुळे सुभाष पाटील हे घरी एकटेच होते. दुपारच्या सुमारास घरी कोणीही नसतांना त्यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी त्यांचा मुलगा घरी आला असता, त्याला वडील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.…
जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा परिसरातील सुतारवाडा भागात बंद घर टार्गेट करून, अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवार २९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील रहिवासी प्रमिलाबाई साहेबराव चौधरी (वय ६५) या आपल्या मुलीकडे सोनगीर येथे गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. त्यामुळे चोरट्यांनी कडी कोयंडा तोडत घरातून सोन्याचे दागिने आणि ८ हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घर उघडलेले दिसल्याने, शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती प्रमिला चौधरी यांना दिली. या…
आजचे राशिभविष्य दि.१ डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या गडबडीत आरोग्याकडे लक्ष द्या. बाहेरचे खाणे पचनक्रिया बिघडवू शकते. व्यावसायिक प्रतिस्पर्धकांपासून सावध राहा. पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबातील वातावरण हलके होईल. लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सकाळी चांगली बातमी मिळाल्याने तुम्ही उत्साही राहाल. इतरांच्या नकारात्मक टिप्पण्यांमुळे मनःस्थिती बिघडू देऊ नका. व्यवसायात अडथळे येतील, पण योग्य लोकांच्या मदतीने ते दूर होतील. लग्नाच्या चर्चा पुढे सरकण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या पालकांसोबत एखाद्या शुभ समारंभाला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनी आज इतरांना मदत केल्याने फायदा होईल. स्पर्धा परीक्षांची…
पुणे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील चाकण परिसरात पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना टळली. तळेगाव–चाकण रस्त्यावरील खराबवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला अचानक आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या कंटेनरमध्ये तब्बल 40 नवीन इलेक्ट्रिक दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. काही क्षणातच कंटेनरला भडका उडाल्याने सर्व बाइक्स जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. NL-01AE-7346 क्रमांकाचा हा कंटेनर डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आला होता. चालकाने मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना अचानक कंटेनरमधून धूर येऊ लागल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकाने त्याला सांगितले. चालकाने लगेच मागील दरवाजा उघडताच आतून प्रचंड ज्वाळा बाहेर पडल्या. आग इतक्या वेगाने पसरली की कामगारांनी जीव वाचवण्यासाठी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना एक मोठी बातमी समोर आली. राज्य निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. अशातच आता मंगळवेढा नगरपरिषद, धाराशिव नगरपालिका आणि यवतमाळ नगपरिषद याबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. मंगळवेढा नगरपरिषद : मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नगरपरिषदेची निवडणूक नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांमुळे अडकलेली होती. अखेर यावर निर्णय झाला असून आता 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या असून, राज्य निवडणूक आयोगाने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजच्या काळात अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण अनेकदा पैशांची कमतरतेमुळे अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर, देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. यापैकीच एक आहे उद्योगिनी योजना. ही काही नवीन योजना नाही, तर केंद्र आणि अनेक राज्य सरकारे बऱ्याच काळापासून ही योजना चालवत आहेत. व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना कोणत्याही गॅरंटीशिवाय सहज कर्ज उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. उद्योगिनी योजना काय आहे? उद्योगिनी योजनेची सुरुवात सर्वात आधी कर्नाटक सरकारने केली होती, पण आज ती अनेक राज्यांच्या आणि केंद्राच्या मदतीने देशभरातील महिलांना लाभ देत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १ लाख ते…
चाळीसगाव : प्रतिनिधी कन्नडहून मित्राला भेटण्यासाठी चाळीसगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वार व त्याचा साथीदार अशा दोघांना रिक्षातून आलेल्या तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून खिशातील रोकडसह मोबाईल असा १६ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून पळ काढल्याची घटना २८ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास धुळे ते सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटाखालील अभिनंदन हॉटेलसमोर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील हतनूर येथील मंगेश बंडू आल्हाट हा २८ रोजी रात्री निवृत्ती भडंग व विशाल केवट या दोन्ही मित्रांसोबत दुचाकीने चाळीसगाव येथील मित्राला भेटण्यासाठी कन्नड येथून येत होता. दरम्यान, कन्नड घाटाच्या पायथ्याशी उतरून चाळीसगावकडे जात असताना महामार्गाला लागून असलेल्या हॉटेल अभिनंदनसमोरून जात असताना लघुशंकेसाठी त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील तीन सुवर्ण पेढ्यांमधून चार लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या लांबविणाऱ्या लकी शिवशक्ती शर्मा (३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) हिला शनिपेठ पोलिसांनी बरेली येथून अटक केली. इंटरनेटवर विविध व्हिडीओ बघून चोरीची पद्धत तिने पाहिली. तसेच चोरीसाठी ती गुगल मॅपचा वापर करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जावून तेथे अंगठी बघताना हातचालाखी करीत आर.सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या सुवर्ण पेढ्यांमधून चार लाख ७० हजार रुपयांच्या अंगठ्या चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी जिल्हापेठ व शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी करताना एक महिला सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांकडून…

