कराड : वृत्तसंस्था कोकण सहलीवरून नाशिकला परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला मंगळवारी पहाटे पुणे–बंगळुरू महामार्गावर अपघात झाला. बस 20 फूट खोल दरीत कोसळली असून 30 ते 35 विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. यापैकी 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त बस नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील लेट बी पी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सची आहे. विद्यार्थ्यांची कोकण शैक्षणिक सहल आटोपून बस नाशिककडे रवाना झाली होती. कराडजवळील वाठार गावाच्या परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याचा एक भाग दबला होता. हा दबलेला भाग न लक्षात आल्याने बस घसरली आणि रस्त्यालगतच्या 20 फूट खोल दरीत कोसळली. अपघातानंतर बसमध्ये…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील २२६ नगर परिषदा आणि ३८ नगर पंचायतींसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली असून सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा नगरपरिषदेसाठी मतदान सुरू आहे. या दरम्यान नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला. तर मालवण नगरपरिषद निवडणुकीत लग्न सोहळा असताना वधूने मतदानाचा हक्क बजावल्याचे पाहायला मिळाले. मालवण भंडारी स्कूल येथे दोन वधूंनी मतदान केले. निवडणुकीत एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपालिका व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार…
जळगाव : प्रतिनिधी विना परवाना वाळूची अवैधरित्या वाहतुक करणारे ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्या राजू कडू बाहे (वय ५३) या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच शिवीगाळ करीत टॉमीने त्यांच्यावर हल्ला करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवार दि. १ रोजी दुपारी साडेतीन वाजता खंडेराव नगरात घडली. याप्रकरणी वाळू माफिया मनोज रमेश भालेराव, फैजल खान आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि , शहरातील पिंप्राळ्याचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून नियुक्तीस असलेले राजू बाहे हे खंडेराव नगराकडून तलाठी कार्यालयाकडे जात होते. यावेळी गणपती मंदिराजवळून त्यांना विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूचा उपसा होत असल्याचे…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमीयुगुलाने झाडाला एकाच दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी देवगाव-देवळी (ता. अमळनेर) येथे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दिनेश बद्री पावरा (२२, रा. हिंगोणे जळोद, ता. अमळनेर) आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी यांचा आत्महत्या करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. दिनेश हा जळोद येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर काम करत होता तर मुलगी ही मजुरी करत होती. देवळी येथील आयटीआयच्या मागे असलेल्या निंबाच्या झाडावर त्यांचे मृतदेह आढळले. डीवायएसपी विनायक कोते, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, हेकॉ. संतोष नागरे, उदय बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे…
आजचे राशिभविष्य दि.२ डिसेंबर २०२५ मेष राशी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल आणि पूर्ण समर्पणाने काम कराल. आज तुम्हाला नवीन अनुभव मिळतील. मानसिक समस्या दूर होतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमचे सामाजिक वर्तुळ आणि आदर देखील वाढेल. तुम्ही मित्रांची मदत घ्याल. वृषभ राशी तुमच्या ऑटोमोबाईल व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल. नवीन धार्मिक स्थळाला भेट देण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. तुम्ही मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत सहलीला जाल. प्रशासकीय सेवेतील लोकांकडून तुम्हाला फायदा होईल. जवळच्या नातेवाईकांशी तुमचा संवाद वाढेल. मिथुन राशी आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे एक आनंददायी वातावरण निर्माण होईल. तुम्हाला आरोग्याच्या सततच्या समस्यांपासून काही प्रमाणात आराम मिळेल आणि तुम्ही उत्साही…
अहिल्यानगर : वृत्तसंस्था जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचंड तापलेल्या वातावरणात सोमवारी एक नाट्यमय घटना घडली. प्रचारासाठी शहरात दाखल झालेल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक निदर्शने करत गोंधळ निर्माण केला. हातात पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. आमदार रोहित पवार व विधान परिषद आमदार राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपनेही जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु केले आहे. फडणवीस प्रचारासाठी पोहोचताच ठाकरे गटाने हल्लाबोल केला. आंदोलकांनी दाखवलेल्या पोस्टर्सवर जामखेडच्या विकासकामांबाबत खोचक सवालांची मालिकाच झळकली. पोस्टर्सवर विचारण्यात आले — जामखेडची MIDC कुणी रोखली? अध्यात्मिक स्थळांचा निधी आणि शहराचा विकास निधी कुणी अडवला? CCTV प्रकल्प…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील कोकणात भाजप व शिंदे सेनेमध्ये मोठा वाद सुरु होता. भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नीतेश व नीलेश या दोन्ही मुलांमध्ये भाऊबंदकीचा कथित वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या दोन्ही भावांना भाजपचा डाव ओळखून आपसातील वाद मिटवण्याचा सल्ला दिला आहे. राणे बंधूंनी भाजपचा खरा चेहरा ओळखून आपसातील वाद न वाढवता त्यावर पडदा टाकावा, असे ते म्हणालेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी मालवण येथील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर अनपेक्षित धाड टाकली होती. त्यात त्यांनी पैशाने भरलेली…
भंडारा : वृत्तसंस्था राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असताना भंडाऱ्यातून एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. भाजपच्या एका महिला उमेदवाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भाजपची टोपी आणि गळ्यात कमळाचा गमच्छा घातल्याचा संतापजनक प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “छत्रपती शिवाजी महाराज आमच्याच पक्षात आहेत, हे दाखवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रकार आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. भंडारा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार मतदारांच्या संपर्कात व्यस्त आहेत. शहराच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तरुण नेते युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘आत्याबाई’ म्हणून दिलेला जोरदार डान्स आणि खेळलेली फुगडी सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाली असून त्यांच्या या वेगळ्याच रुपाची प्रचंड चर्चा सुरू आहे. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह ३० नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वांद्रे–कुर्ला संकुलातील जिओ सेंटरमध्ये संपन्न झाला. भव्य सजावट आणि मराठमोळ्या जल्लोषामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता पवार कुटुंबातील सर्वांनी हजेरी लावली. सुनेत्रा पवार यांनीही उपस्थिती दर्शवली. युगेंद्र पवार यांची वरात पोहोचताच सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील महिलांनी…
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे सेनेच्या माजी आमदारांच्या संपर्क कार्यालयावरही स्थानिक गुन्हे शाखेने छापे टाकल्याची बातमी सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिंदेसेनेत टोकाचा तणाव निर्माण झाला आहे. यातूनच चार दिवसांपूर्वी हिंगोलीतील शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या घरावर १०० पोलिसांनी छापा टाकला, असा खळबळजनक आरोप केला होता. याच पक्षाचे दुसरे आमदार हेमंत पाटील यांनीही या प्रकरणाची थेट विधानसभा अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली होती. यापाठोपाठ आता शिंदेसेनेचे निकटवर्तीय नेते, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयावरही स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी छापे टाकल्यामुळे खळबळ उडाली…

