नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराचे बांधकाम आणि शिखर पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंदिरात भव्य सोहळा पार पडणार आहे. मंदिरात ध्वजारोहण समारंभाची तयारीदेखील सुरू आहे. मंदिरात २५ नोव्हेंबर रोजी हा भव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान,या सोहळ्याच्या दिवशी सामान्य भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी समारंभाच्या तारखेला सामान्य भाविक पहिल्या सत्रात रामलल्लाचे दर्शन घेऊ शकणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी परतल्यानंतर दुसऱ्या सत्रात दर्शनाच्या व्यवस्थेवर चर्चा केली जात आहे. खरं तर, २५ नोव्हेंबर हा विवाह पंचमी…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील शेतकरी गटातर्फे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानभरपाई व रब्बी हंगामपूर्व अनुदान तात्काळ वितरित करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार तथा कृषी अधिकारी, धरणगाव यांना प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बागायती आणि कोरडवाहू शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने एनडीआरएफ अंतर्गत दोन हेक्टरपर्यंत ₹18,500 आणि राज्य शासनाच्या जाहीर योजनेनुसार तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याची तरतूद केली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना केवळ अर्धीच रक्कम मिळाली असून प्रति गुंठा फक्त ₹40 इतकी मदत मिळत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये पिक आणेवारी तातडीने जाहीर करणे, पीकविमा मुदतवाढ देणे, रब्बी हंगामासाठी ₹10,000…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अभिनेते व अभिनेत्या नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असतात आता सध्या 90च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी आता अध्यात्माच्या वाटेवर चालत असून पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिच्या विधानाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. पण तिच्या विधानाने देशभरात खळबळ उडाली. उत्तर प्रदेशात असताना तिने दाऊद ईबराहीमबाबत असे काही स्टेटमेंट केले की प्रत्येकाच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. तिने बोलत बोलत दाऊद इब्राहीमला क्लीन चिट दिली. हे विधान सोशल मिडियावर व्हायरल होताच नव्या वादाला तोंड फुटले आहे. ममता म्हणते, ‘ दाऊद इब्राहीम आतंकवादी नव्हता. त्याने बॉम्ब ब्लास्ट केले नाहीत. तो आतंकवादी नाही. मुंबईत बॉम्बस्फोट कधी केले नाहीत.’ या विधानाच्या शेवटी तिने हे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू मैदानात उतरले आहे. तर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि अतिवृष्टी अनुदानावरून सरकारला इशारा देत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. आता, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटील नागपूरकडे रवाना झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, तिथल्या आंदोलकांना काय त्रास होतोय, शेतकरी सगळा नागपूरला बसला आहे आणि ज्यावेळेस अतिटतीची वेळ असते त्यावेळेस आपण आपल्या शेतकरी मायबापांसाठी सगळ्यांनी सहकार्य केले…
मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे तर दुसरीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. राज्यातील राजकीय वातावरणाला साजेशी अशी ही निवडणूक रंगतदार वळण घेत आहे. शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरू शकतो, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना अधिकच वेग आला आहे. दुसरीकडे, विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे, या निवडणुकीत राजकीय गोटांतील संघर्ष आणि…
जळगाव : प्रतिनिधी एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागातील महिला कर्मचारी वैशाली गायकवाड, दुसरा कर्मचारी आणि श्रीकृष्ण वखारमालक सुनील धोबी, अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, यापैकी गायकवाड व धोबी यांना अटक करण्यात आली आहे. सुनील धोबी याने तक्रारदाराची लिंबाची झाडे तोडून भरलेला ट्रक बेकायदेशीर लाकूड वाहतूक केल्यामुळे पकडला होता. तो ट्रक सोडवण्यासाठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये लाचेची रक्कम ठरली. याबाबत आरोपींनी तक्रारदारांसोबत तडजोड झालेली रक्कम मान्य असल्याची कबुली दिली. त्यावरून…
भुसावळ : प्रतिनिधि तालुक्यातील फेकरी येथील संस्कृती नगर परिसरात दोन घरफोडीच्या घटना घडून एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली व सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहिती नुसार, संस्कृती नगरात राहणारे संदीप अशोक वाघ हे रात्री ड्युटीवर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील सामानाची उधळण करून रोख २०,००० रुपये तसेच त्यांच्या आई उषाबाई वाघ यांची ५,००० रुपयांची रोकड असा एकूण २५,००० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. दरम्यान, शेजारी राहणारे सोपान कोळी हे त्या रात्री गावाला गेले असल्याने त्यांच्या घरातील नुकसानीचे प्रमाण…
मेष राशी या राशीच्या महिला कुटुंबाच्या पाठिंब्याने घरातून व्यवसाय सुरू करतील. आज तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत कराल, आनंदी व्हाल. तुमच्या जोडीदाराला आश्चर्यचकित करण्यासाठी तुम्ही दागिन्यांची खरेदी देखील करू शकता. वृषभ राशी आज, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडाल आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवनशैलीत बदल कराल. पूर्ण विचार केल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेणे टाळा. बँकिंग क्षेत्राशी निगडीत लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. मिथुन राशी या राशीत जन्मलेली मुले आज मेहनतीने अभ्यास करतील, ज्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळतील. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात काही वेळ घालवाल. कर्क राशी आज तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेदरम्यान, अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले. यानंतर राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेत पडताळणी सुरू केली आहे. याचदरम्यान आता लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार आता लाडक्या बहिणींना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. सर्व पात्र महिलांना ई केवायसी (e-KYC) करताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होते, मात्र आता लाडक्या बहिणींच्या ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा करण्यात आल्याने पुढील काही दिवसांत ई-केवायसी करण्याचे आवाहन मंत्री आदिती तटकरेंनी केलं आहे. तसेच ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना…
नाशिक : वृत्तसंस्था शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असलेल्या साईभक्तांच्या फॉर्च्युनर गाडीचा आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात येवला तालुक्यातील एरंडगाव रायते शिवार परिसरात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी सुरतवरून शिर्डीकडे जात होती. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनरने दोन ते तीन पलट्या मारल्या. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पुढील व मागील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र त्यापैकी एकाने मार्गातच प्राण सोडला. त्यामुळे मृतांची संख्या तीनवर…

