Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी आयकर विभागातील मनिष कुमार सिंग (वय ३७, रा. देवेंद्र नगर) हे कुटुंबासह बिहारला गेले असताना त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. २६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. मनिष सिंग हे जळगावला परतल्यानंतर त्यांनी दि. ८ डिसेंबर रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि ,  मूळचे बिहार राज्यातील पटणा येथील मनिष कुमार सिंग हे आयकर विभागात नोकरीस असून ते जळगावातील देवेंद्र नगरात कुटुंबियांसह वासतव्यास आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी ते कुटुंबियांसह आपल्या मूळ गावी पटणा येथे गेले होते. त्यांचे…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील काकोडा येथील सरपंच आणि शिपाई यांनी तक्रारदाराकडून तीन हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार यांना काकोडा येथे शासनाच्या योजनेतून घर बांधायचे आहे. त्यासाठी ते सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांना भेटले. त्यावेळी कांबळे यांनी तक्रारदार यांना दि. ३० ऑक्टोबर रोजी काकोडा येथील ग्रामसेवक यांच्या सहीचा नमुना क्रमांक आठचा उतारा दिला. सरपंच यांनी उतारा काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सरपंच कांबळे यांच्याविरोधात प्रतिबंधक विभाग…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१० डिसेंबर २०२५ मेष राशी व्यवसाय वाढेल पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला वरिष्ठांकडून आणि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुम्ही रिअल इस्टेटबाबत महत्त्वाचे निर्णय घ्याल. नवीन नोकरीमुळे अनेक बदल घडतील. वृषभ राशी आज तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तरच तुमचे उत्पन्न वाढेल. कठोर परिश्रमाने यश मिळेल, पण मन लावून मेहनत करा. आर्थिक निर्णय जपू घ्या, मोठे खर्च काही काळासाठी पुढे ढकला. स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. मिथुन राशी तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही एक छोटी सुट्टी घ्याल, फिरायला जाल. मुलं आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तुमच्यावर अवलंबून राहतील. पैसा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना सुळे यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘पैसा, दडपशाही आणि घराणेशाही’ यांचा वाढता प्रभाव तीव्र शब्दांत मांडला. “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकशाहीने उभे राहण्याची मुभा आहे, पण महाराष्ट्रातील भाजपच्या मंत्र्यांच्या पत्नी-आई यांच्या विरोधात उमेदवारी अर्जही भरू दिला जात नाही,” अशी संतप्त टीका त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील अनियमिततेकडे लक्ष वेधताना सुळे म्हणाल्या, “निवडणुकांमध्ये प्रामाणिकता आणि पारदर्शकता अत्यावश्यक आहे. मात्र महाराष्ट्रात २० ठिकाणी निवडणुका झाल्याच नाहीत आणि सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कार्यावर आधारित ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर 2’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस उतरले. धर्मवीर 2 मध्ये दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं दाखवण्यात आलं, मात्र त्यांच्या निधनाबाबत आजही विविध चर्चा सुरु असतात. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘धर्मवीर 3’वर महत्त्वपूर्ण वक्तव्य करत नवी चर्चा पेटवली आहे. एका कार्यक्रमात शिंदेंना धर्मवीर 3 चित्रपट येणार का? आणि त्याची स्क्रिप्ट कोण लिहिणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आनंद दिघे यांचं काम इतकं मोठं आहे की ते एक-दोन चित्रपटांत मांडता येणार नाही. पण धर्मवीर 3 चित्रपट आला तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, कारण…

Read More

बीड : वृत्तसंस्था  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले असताना, सरकारने आरोपींना एका वर्षात फाशी देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “या प्रकरणातील आरोपी सुटले, त्या दिवशी प्रथम जिल्हा आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद करू,” असा कडक इशारा त्यांनी दिला. गत वर्षी ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…

Read More

‘दृष्टीदाता’ म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील आमच्यासाठी कार्य करीत आहेत – उपस्थितांच्या भावना जळगाव : प्रतिनिधी  जेव्हा अंधार दूर करून प्रकाश देणारे हात समाजात पुढे येतात, तेव्हा देव माणसाच्या रूपात भेटतो…” रविवारचा दिवस पाळधीसाठी अगदी हाच अनुभव देऊन गेला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवार आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा अक्षरशः जनसागर उसळला. पहाटे उजेड पडायच्या आधीच आशेच्या प्रकाशासाठी नागरिकांनी शिबिरस्थळी गर्दी केली. सकाळी सातला नोंदणी सुरू होताच रांगा वाढतच गेल्या… एकूण ८१० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३० जणांना…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून महाविकास आघाडी (मविआ) आणि सत्ताधारी महायुतीत मोठ्या राजकीय पेचाची स्थिती निर्माण झाली आहे. मविआने विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेचे भास्कर जाधव आणि विधानपरिषदेसाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांची अधिकृतरित्या मागणी केली असतानाच, राजकीय वर्तुळात दोन नवी सरप्राइजिंग नावे समोर आली आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांची चर्चा अचानक सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहांसाठी मविआमध्ये जाधव आणि पाटील यांच्या नावांवर एकमत झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या दोन्ही नावे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्याकडे पत्राद्वारे…

Read More

जिल्हा प्रशासनाने केलेल्या मदत कार्याबद्दल भाविकांनी व्यक्त केले प्रशासनाचे आभार जळगाव : प्रतिनिधी अयोध्या–प्रयागराज महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या जळगाव, धुळे जिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले होते. या सर्व सुरक्षित भाविकांना स्वतंत्र रिझर्वेशन बोगीद्वारे परतीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला. आज सर्व भाविक लखनऊ ते एल टी टी, गाडी क्रमांक 01016 द्वारे जळगाव रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले. यावेळी सर्व भाविकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तात्काळ मदतीच्या सूचनांनुसार हे मदतकार्य युद्धपातळीवर आणि जलदगतीने पूर्ण करण्यात आले. जिल्हा प्रशासन, सुलतानपूर प्रशासन, लखनऊ व भुसावळ रेल्वे विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या समन्वयातून भाविकांसाठी…

Read More

नोकर भरती संस्थाचालकांच्या अंगलट येणार ? जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उघडकीस आलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतले आहे. प्रारंभी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर आता चौकशीचा फेरा संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांपर्यंत पोहोचला आहे. अमळनेर शहरातील अनेक शाळांमध्ये संशयास्पद भरती झाल्याचे संकेत मिळाल्याने विशेष तपास पथक (एसआयटी) कारवाईस सज्ज झाले आहे. तत्कालीन शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुरू झालेल्या चौकशीने आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्यापर्यंत मजल मारली आहे. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण बोगस आयडीच्या माध्यमातून झालेल्या नियुक्त्यांवर चौकशी होणार असल्याने संबंधित शिक्षकांमध्ये नोकरी गमावण्याची भीती वाढली आहे. लाखो रुपयांची देवाणघेवाण…

Read More