चाळीसगाव : प्रतिनिधी घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकुलूप तोडून कपाटातील रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा १ लाख २२ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील वामननगर भागात उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू दामोदर खैरनार (वामननगर, चाळीसगाव) दि. ८ रोजी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास कामाला जाण्यासाठी पत्नीसह घराबाहेर पडले. ते घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप दिसले नाही तर घराचा दरवाजा उघडा होता. घरात जावून पाहिले तर बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडे दिसले. कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने दिसून आले नाही. अज्ञात इसमाने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.११ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुम्ही तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक राहा. इतरांवर जास्त अवलंबून राहू नका , तुमचं काम तु्म्हीच करा. नाहीतर फसाल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. जीवन अधिक आरामदायी आणि सोपे वाटेल. कामात इतरांना मागे टाकण्याची तुमची इच्छा तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढवेल. मिथुन राशी जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा वाढवण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस खूप अनुकूल असेल. प्रॉपर्टी व्यवसाय फायदेशीर राहतील. विचार करून निर्णय घ्या. कर्क राशी तुम्ही समस्यांकडे सकारात्मकतेने पाहिले तर ते उपाय नक्की सापडेल, टेन्शन मिटेल. तुमच्यामध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांमुळे तुमचे कुटुंब…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेहरू नगर परिसरातील एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १० रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर परिसरात शुभम रविंद्र मराठे (वय २५) हा तरुण आई, वडील, भाऊ, बहीण यांच्अया सोबत वास्सातव्यास होता. शुभमचे वडील रविंद्र हे मोहाडी रोडवर हॉटेल चालवून उदरनिर्वाह करतात. तर मुलगा शुभम हा हॉटेलवर वडिलांना मदत करीत होता. तसेच एका फायनान्स कंपनीत देखील जॉबला आहे. दरम्यान, बुधवारी शुभमच्या घरी कोणी नव्हते. तेव्हा दुपारी २ वाजेच्या सुमारास शुभमने गळफास घेऊन…
हिवाळा सुरू झाला की आहारात बदल करणे गरजेचे ठरते. या दिवसांत गहू, मका, बाजरी असे मोटे धान्य बाजारात मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यापैकी बाजरी ही हिवाळ्यातील सर्वात पौष्टिक आणि फायदेशीर धान्य मानली जाते. बाजरीच्या भाकरीत फाइबर, लोह आणि प्रथिने भरपूर असल्याने ती आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. पचन सुधारण्यापासून डायबिटीजपर्यंत अनेक त्रासांवर बाजरीची भाकरी मदत करते. बाजरीची भाकरी का खावी? हिवाळ्यात जर तुम्ही भाकरी खाण्याची सवय ठेवत असाल, तर गव्हासोबत बाजरीची भाकरीही जरूर खा. याचे मुख्य फायदे, पचन सुधारते – फाइबर जास्त असल्याने आतडी स्वच्छ राहतात आणि बद्धकोष्ठता कमी होते. डायबिटीज रुग्णांसाठी उत्तम – बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत…
जळगाव : प्रतिनिधी जळगावच्या अजिंठा चौफुली परिसरात बसमध्ये चढताना यावलच्या शेतकऱ्याच्या खिशातील १५ हजार रुपये चोरून नेणाऱ्या खिसेकापरांना गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अल्पावधीतच गजाआड करत पूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. सविस्तर वृत्त असे कि, अजिंठा चौफुली परिसरात बसमध्ये चढत असताना शेतकरी प्रवाशाच्या खिशातील १५ हजार रुपये लंपास करणारे तीन खिसेकापरे जळगाव पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहेत. गुन्हे शोध पथकाने गुप्त माहिती व सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. दि. 01 डिसेंबर 2025 रोजी यावल येथील शेख कलीम शेख इसाक (वय 50) हे पत्नीचे मेडीसीन घेऊन जळगावहून घरी परतण्यासाठी बसमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी राज्य सरकारकडून ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वीच केली असतानाही, नशिराबाद येथील शेतकऱ्यांवर युनियन बँकेकडून सक्तीची कर्जवसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या गैरप्रकाराविरोधात माजी सरपंच पंकज शामकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टी, नापिकी, जमीनधूप आणि पिकांचे प्रचंड नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जफेड अशक्य झालेल्या या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. तसेच, कर्जमाफी लागू होईपर्यंत कोणत्याही बँकेने वसुलीची सक्ती करू नये, अशा स्पष्ट सूचना देखील दिल्या आहेत. तथापि, नशिराबादमधील युनियन…
नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष अपेक्षित असताना महाविकास आघाडीच्या तंबूतच खुर्चीवरून वाद सुरू आहे. विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये खटके उडाले. हा वाद इतका वाढला की, काँग्रेस आमदारांनी थेट विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. यानंतर ठाकरे गटाच्या पुढच्या रांगेतील दोन जाग कमी करून काँग्रेसला देण्यात आल्या. सभागृहातील पहिल्या काही रांगांमध्ये बसण्यासाठी दोन्ही गटांमध्ये वाद झाला. सभागृहामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या २० आमदारांपैकी १४ आमदारांना पुढील रांगेत बसण्याची व्यवस्था आहे. तुलनेत काँग्रेसच्या १६ आमदारांपैकी फक्त ४ आमदारांना पुढे जागा दिली आहे. यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांना ठाकरे गटाच्या नवीन आमदारांच्या मागे बसावे लागत होते.…
धाराशिव : वृत्तसंस्था सोलापूर आणि बीडनंतर आता धाराशिवमध्ये नर्तिकेशी प्रेमसंबंधातून वाद झाल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. अश्रुबा अंकुश कांबळे (25, रुई ढोकी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील साई कला केंद्रात नृत्य करणाऱ्या महिलेबरोबर अश्रुबाचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघे काल शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. परतत असताना मृत अश्रुबाच्या पत्नीचा फोन आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वाद चिघळताच अश्रुबाने आत्महत्या करण्याची धमकी देऊन तेथून निघून गेला. नर्तिकेने ही धमकी गांभीर्याने घेतली नाही. मात्र काहीच वेळात अश्रुबाने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी…
सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून महाविकास आघाडीत मनसे येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता असून, या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. अशातच ही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. ज्याची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे. महाविकास आघाडीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत एन्ट्री झाली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा जोर धरून होती, अखेर सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी मनसे महाविकास आघाडीत अधिकृतरित्या सहभागी झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढणार आहे. माजी खासदार शिवसेना…
जळगाव : प्रतिनिधी रावेर पोलिस ठाण्याच्या गु.र.नं. ४९५/२०२५ मधील तक्रार चौकशी नोंदवू नये म्हणून २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस हवालदार सुरेश पवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तक्रारदारांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की , तक्रारदार हे शेतकऱ्यांकडून १ लाख २७ हजार रुपयांचा केळीचा माल घेऊन दिल्लीतील व्यापाऱ्यांना विक्री करणारे होते. परंतु त्याबदलात शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने संबंधित शेतकऱ्यांनी तक्रारदाराविरोधात लेखी तक्रार केली. ही चौकशी निंभोरा पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. चौकशीदरम्यान पोलिस हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदाराकडील प्रकरण गुन्ह्यात रूपांतरित होऊ नये यासाठी…

