Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील लोणी येथे गोवंश कत्तलीच्या माहितीवरून गेलेल्या काही तरुणांवर स्थानिक कसाई लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामनेर येथील कृष्णा भिल (वय १८) आणि योगेश महाराज कोळी (वय ३५ रा. जळगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा भील याला माहिती मिळाली की, चोपडा तालुक्यातील लोणी गावात गोवंश कत्तल सुरू आहे त्यावरून कृष्णा भिल, योगेश महाराज कोळी आणि आणखी तीन ते चार जण हे लोणी गावात…

Read More

धुळे : प्रतिनिधी तालुक्यातील फागणे गावानजीक गुरुवारी सायंकाळी दुचाकीने धुळ्याहून जळगावकडे जाणाऱ्या दोघांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत झालेले दोघेही जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याकडून जळगावकडे जात असताना फागणे गावापुढे भरधाव अज्ञात वाहनाने एमएच १९ सीई १७१९ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दीपक मोतीलाल भामरे (वय ४५) व पन्नालाल भगवान वर्मा (दोघे रा. जळगाव) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी तातडीने धाव घेत दोघांनाही शवविच्छेदनासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात हलवले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१२ डिसेंबर २०२५  मेष राशी आज, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलताना थोडे सौम्यपणे बोला, संयम ठेवल्यास तुमचं नाते वाचेल. नियमित योगासने तुमचे आरोग्य सुधारतील. आज काही कामांमध्ये जास्त वेळ लागू शकतो. ताण घेणं टाळा. वृषभ राशी नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रकल्प मिळू शकतो. या प्रकल्पामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कठोर परिश्रम करून ते त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवतील. मिथुन राशी आज तुम्हाला बालपणीच्या मित्राचा फोन येऊ शकतो. या संभाषणामुळे काही जुन्या आठवणी जाग्या होतील. अपूर्ण व्यवसाय पूर्ण होईल. नवीन व्यवसाय करार होऊ शकतात. तुमची संपत्ती वाढवण्याच्या तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. व्यवसाय वाढेल. सगळं…

Read More

जळगांव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी आज केंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील लाखो केळी उत्पादक शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. देशातील सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगावचा गौरव असला तरी गेल्या काही वर्षांत अत्यंत अनिश्चित हवामान, अनियमित पाऊस, ओलावृष्टि, सलग उच्च आर्द्रता आणि अचानक होणारे वातावरणीय बदल यामुळे केळी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. या नुकसानाला सध्याच्या फळस्वर-हवामान आधारित विमा योजनेत पुरेसा कव्हरेज नसल्याची बाब स्मिताताईंनी ठामपणे समोर आणली. सध्या विमा योजनेनुसार ओलावृष्टि जोखीम कालावधी १ जानेवारी – ३० एप्रिल असा निश्चित आहे. परंतु प्रत्यक्षात मे महिन्याच्या…

Read More

यशाचा मंत्र… शालेय गुणांसमवेत जीवनमूल्येही महत्वाची – मिनल करनवाल जळगाव :  प्रतिनिधी यशाची संकल्पना जास्तीत जास्त शालेय गुण मिळविणे हिच नाही तर त्यासोबत सकारात्मकता आणि जीवनमूल्ये देखील अत्यंत महत्त्वाची असतात. ती स्पर्धेच्या युगात मोलाची ठरतात. थॉमस एडिसन ने बल्बचा शोध लावला त्या आधी तो हजार वेळा अपयशी झाला होता, मात्र प्रयत्न करीत राहिल्याने तो यशस्वी झाला. विद्यार्थ्यानी प्रयत्न करत रहावे म्हणजे यशाने जीवन उजळून निघेल, असा मोलाचा सल्ला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उपस्थितांना दिला. अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता आणि तंत्रज्ञानातुन व्यवसायीक मुल्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली. “आर्टिफिशियल तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी मानवी…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यातील नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी आज सरकारला मनमानी करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाचा टाईम बदलत असतो. प्रत्येकाची वेळ सारखी नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकरणात मनमानी करू नका, असे ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना बचतीचा सल्ला दिला. जयंत पाटील यांनी आज चालू आर्थिक वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेतला. त्यात त्यांनी कन्सलटन्ट नेमण्याच्या पद्धतीवरून सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, ई गव्हर्नस 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रोजेक्ट राबवण्यासाठी आयटी कन्सलटन्ट नेमण्याचे पेव…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यातील नागपुर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, आजचा अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. हे अधिवेशन विविध प्रश्नांमुळे वादळी होताना दिसत आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य प्रश्नावर सभागृहात बोलताना आक्रमक होत आहेत. अशातच एक मोठी घडामोड घडली असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नुकेतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेले सोडचिठ्ठी दिलेले प्रकाश महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी नागपुरात रामगिरी या बंगल्यावर दाखल झाले असून, त्यांनी भेटीअगोदर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंविषयी मोठं वक्तव्य केले असून, भाजपात जाण्याविषयी सूचक वक्तव्य केले आहे. मनसेचे पहिल्या फळीतील प्रकाश महाजन हे नेते होते. त्यांनी राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  चोपडा बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत ६९ वर्षीय वृद्धाच्या पॅन्टच्या खिशातून ५० हजार रुपये चोरणारा पोलीस रेकॉर्डवरील सराईत पाकीटमार नाजिम कदिर पटवे उर्फ नाजिम तरकारी (रा. गेंदालाल मिल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत जेरबंद केले. सविस्तर वृत्तानुसार, धरणगाव येथील मोहम्मद सिद्दीकी नूर मोहम्मद मोमीन हे चोपडा–धरणगाव बसमध्ये चढत असताना गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून ५० हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासादरम्यान ही चोरी कुख्यात पाकीटमार नाजिम तरकारीने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल वंजारी,…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी लग्न केल्याचे नाटक करून लग्नाच्या बदल्यात अडीच लाख रुपये उकळून तोतया नवरीने अंगावरील दागिन्यांसह लग्नानंतर चौथ्या दिवशी पळ काढल्याचा प्रकार वाघळी येथे घडला आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या नवरीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वाघळी येथील ३० वर्षीय तरुणाच्या विवाहासाठी त्याचे कुटुंबीय मुलीच्या शोधात होते. वाघळीतील एका महिलेशी फसवणूक झालेल्या तरुणाच्या कुटुंबाची ओळख झाली. महिलेने एक गरीब कुटुंबातील मुलगी शोधून देते; पण त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, असे सांगितले. तरुणाच्या कुटुंबाने पैसे देण्यास होकार दर्शविल्यानंतर त्या महिलेने तुमच्यासाठी अकोला येथे मुलगी बघितली आहे, तिच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे, असे सांगून अडीच लाखांची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसीमधील साई किसान या ठिबक नळ्या तयार करणाऱ्या कंपनीला मोठी आग लागून ती आजूबाजूच्या दोन कंपन्यापर्यंत पोहोचली. या आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले असून रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम अग्निशामन दलाच्या वतीने सुरू होते. मंगळवारीच या कंपनीमधील ट्रांसफार्मर व कट आउट बदलविण्यात आले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी परिसरातील के सेक्टरमध्ये जगन्नाथ जाधव यांच्या मालकीची साई किसान नावाची ठिबक नळी तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीमध्ये नियमित काम सुरू असताना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीमधील २० ते २५ कर्मचारी तत्काळ बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने…

Read More