Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाने महिलेच्या विनयभंग प्रकरणात गेल्या नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस मुंबईतून अटक करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मेहुणबारे पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०१६ रोजी गु.र.क्र. ९७/२०१६ भादंवि कलम ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी युवराज नामदेव पवार (रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. महिलांविरुद्धच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलीसांसाठी प्राधान्याचे होते. दरम्यान, आरोपी मुंबईत असल्याची गोपनीय माहिती मिळताच प्रभारी अधिकारी तथा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गोरगरिबांची फसवणूक, मनी लॉड्रिंग व अतिरेक्यांना पैसे दिले तसेच पॉर्नोग्राफी व्हिडीओ बघत असल्याने गुन्हा दाखल असल्याचे सांगत ८६ वर्षीय सेवानिवृत्ताची आर्थिक फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांनी पोलिसांच्या वेशात धमकावत ८० लाख पाच हजार ४१६ रुपये निवृत्ताकडून उकळले. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  महावितरणचे सेवानिवृत्त सुकदेव पांडुरंग चौधरी (८६, रा. भुसावळ) यांना २७ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कॉल आला व डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगितले. आपल्या नावे बरेच बनावट फोन क्रमांक असून त्याद्वारे अनेकांची फसवणूक होत असल्याचे सांगितले. याबाबत फसवणूकप्रकरणी कुलाबा पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. २८ ऑक्टोबर रोजी…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१३ डिसेंबर २०२५ मेष राशी हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आज चांगला नफा मिळेल. आज भरपूर कमाई होईल. चा दिवस जास्त नफा मिळवण्याचा आहे. तुम्हाला आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या वडिलांकडून पाठिंबा मिळेल. वृषभ राशी आजचा दिवस तुमचे नियोजित काम करण्यासाठी आणि तुमच्या योजना पूर्ण करण्यासाठी चांगला आहे. नशिबाची साथ मिळेल, अडकलेली सगळी कामं आज पूर्ण होतील. मिथुन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सोनेरी असणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा येईल. या राशीच्या व्यावसायिकांना आज आराम मिळेल. मित्रांसोबत ट्रीपचा प्लान ठरेल. कर्क राशी आज तुम्हाला नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. तुमचा दिवस नव्या उत्साहाने सुरू होईल. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी तब्बल ११ हजार ७१८ कोटी रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच डिजीटल जनगणना होणार आहे. यासाठी तब्बल ३० लाख कर्मचाऱ्यांना कामाला लावलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत २०२७ मध्ये देशात जनगणना होणार असल्याचं जाहीर केलं. ही जनगणना दोन टप्प्यात होणार असल्याचं रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात हाऊसिंग लिस्ट आणि हाऊसिंग जनगणना होणार आहे. ही जनगणना २०२६ मध्ये एप्रिल ते डिसेंबर पर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होणार आहे. ही लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव शहराला वाढत्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी शहराबाह्य रिंग रोड विकसित करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्या संदर्भातील पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. खासदार वाघ यांनी नमूद केले आहे की, शहराच्या मुख्य मार्गांवर वाढत चाललेला ट्रॅफिक, अपघातांचा धोका आणि प्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क व कृषी व्यापाराला मोठी चालना मिळण्यासाठी रिंग रोडची उभारणी अत्यावश्यक झाली आहे.रिंग रोड झाल्यास शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच शहरात येणाऱ्या बाह्य वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.या महत्त्वपूर्ण…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबर रोजी संपणार असून त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, १५ डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणूक जाहीर होताच राज्यभर आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू होईल. विशेष म्हणजे, १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमांनंतर तत्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.महापालिका निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठे आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोनदा मोर्चा धडकला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत यासाठी राज्य सरकारने राज्यात कुणबी नोंदणींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. तर हैदराबाद गॅझेटिअरसह सातारा आणि इतर गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक जिल्ह्यात कुणबी नोंदी आढळल्या. कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे जातीचे दाखल देण्याचे काम सुरू झाले. मराठावाड्यातील आठ जिल्ह्यात यानंतर मराठा समाजातील अर्जदाराला कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाचं काम सुरू झालं आहे. इतक्या लोकांना त्याचा फायदा झाला. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर २ सप्टेंबर…

Read More

लातूर : वृत्तसंस्था   कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकताच निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक वर्ष त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे काम केले. पक्षानी दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पार पाडली. लातूरच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल कळताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली. अर्ध आयुष्य त्यांनी कॉंग्रेस पक्षाला दिले. 35 ते 40 वर्ष त्यांनी खासदार म्हणून काम केले. लातूर जिल्ह्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे राजकीय वलय होते. आपल्या जिल्ह्याचा विकास जास्तीत जास्त कसा होईल, याकरिता ते आग्रही असायचे. त्याप्रमाणे ते काम करत. मोठी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लाखो नागरिकांचे बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांमध्ये पडून असलेले १ लाख कोटी रुपयांहून अधिक ‘दावा न केलेले’ पैसे त्यांच्या कायदेशीर मालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ‘तुमचा पैसा, तुमचा अधिकार’ या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ केला आहे. या उपक्रमाची सुरुवात ऑक्टोबर २०२५ मध्ये झाली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही संधी म्हणजे आपली विसरलेली संपत्ती परत मिळवण्याची एक संधी आहे. त्यांनी लोकांना ‘तुमचा पैसा, तुमचा अधिकार’ या चळवळीचा भाग होण्याचे आवाहन केले आहे. बँक ठेवी, विमा, लाभांश, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि पेन्शनसह लावारिस (दावा न केलेल्या) पडलेल्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या तरसोद फाट्याकडून भुसावळकडे जात असलेल्या रस्त्यावर दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता इंडिकेटर न देता अचानक वळण घेत दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी भोजना येथील आकाश राजेश पाटील (वय २९) हे दि. २४ रोजी सायंकाळी आई वडीलांसह जात होते. यावेळी (एमएच १९, डीझेड ५३४७) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने जात होता. यावेळी त्याने इंडिकेटर न देता तो अचानक वळण घेत त्याने तरुणाच्या (एमएच १९, डीसी ७७३९) क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह त्याचे आईवडील गंभीर…

Read More