पारोळा : प्रतिनिधी शहरातील आर्थिक व्यवहारातील एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ३५ वर्षीय महिला घरात आपल्या मुलीसह एकटी होती. या वेळी तुषार नरवाळे याच्याशी असलेल्या मागील आर्थिक व्यवहार संपूर्णतः मिटलेला असताना बळजबरीने त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यास पैशां बाबत स्पष्ट शब्दात नकार दिला असता त्याने बळाचा वापर करत महिलेला विनयभंग केला. या प्रकरणी पारोळा पोलिसांत विनयभंग व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडे दरम्यान शनिवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास भुसावळहून जामनेरकडे येणाऱ्या प्रवासी रिक्षाला समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिली. यात आई आणि महिन्यावर लग्न असलेली लेक यांच्यासह ३ जण ठार, तर पाचजण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सरला गोपाळ निंबाळकर (वय ४२) आणि त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (२०, दोन्ही रा. चिंचखेडे बुद्रुक, ता. जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (३२, रा. तळेगाव, ता. जामनेर) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये जयेश निंबाळकर (वय १६), योगेश गायकवाड (४५, रिक्षाचालक, रा. विवेकानंद नगर, जामनेर), सुरेखा विलास कापडे (५०) संगीता सुभाष…
आजचे राशिभविष्य दि.१४ डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. एकूणच अंतर्गत समृद्धी आणि आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही आजूबाजूच्या लोकांशी अधिक चांगले नाते निर्माण कराल आणि स्वतःला सकारात्मक आणि यशस्वी वाटेल. तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकाल, ज्यामुळे नाती अधिक दृढ होतील. जोडीदारासोबत संवाद गोड आणि मनापासून होईल. सामाजिक जीवनातही हा काळ अनुकूल असून नवीन मित्र मिळू शकतात तसेच जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. खुले मन ठेवा आणि भावना व्यक्त करा. वृषभ राशी आजचा दिवस थोडा कठीण असू शकतो. आध्यात्मिक आणि वैयक्तिक प्रगतीत काही अडथळे येऊ शकतात. आत्मपरीक्षणाचा हा काळ आहे. नात्यांमध्ये चढ-उतार संभवतात आणि…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारला महत्वाची ठरलेली लाडकी बहिण योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्याची केवळ एकदाच संधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. योजनेच्या बहुतांश लाभार्थी या ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिला आहेत. ई-केवायसी करताना त्यांच्याकडून काही त्रुटी होणे नैसर्गिक असल्याने, अशा चुका सुधारण्याबाबत विभागाकडे अनेक विनंत्या आल्या होत्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली जात असल्याने, झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी देणे आवश्यक असल्याचे मत मंत्री तटकरे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर, ज्या लाभार्थींचे पती किंवा वडील…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शहरात सातत्याने घडत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठी कारवाई करत एका आंतरराज्यीय अट्टल चोरट्याला अटक करून शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. जळगाव शहरात वाढलेल्या घरफोडी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील कुक्षी तालुक्यातील…
मुंबई : वृत्तसंस्था एखाद्या कलाकारासाठी सर्वात मोठी कमाई कोणती असेल, तर ती त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारे चाहतेच असतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी हीच संपत्ती आजही तितकीच जिवंत आहे. अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेले बिग बी आजही आपल्या चाहत्यांच्या प्रेमाने भारावून जातात. दर रविवारी अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर त्यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते गर्दी करतात. चाहत्यांना निराश न करता बिग बी स्वतः बाहेर येऊन त्यांना अभिवादन करतात, संवाद साधतात आणि कधी कधी भेटवस्तूही देतात. या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियासोबतच अमिताभ…
आ.मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकाराने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रलंबित मागण्या केल्या मान्य चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 84 लाख महिला उमेद (महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान) अंतर्गत जोडल्या गेल्या असून, या अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभागाचा दर्जा आणि कंत्राटी अधिकारी-कर्मचारी, तसेच सर्व महिला CRP व केडर यांच्या प्रलंबित मागण्यांच्या मंजुरीसाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हजारो कर्मचारी कडाक्याच्या थंडीत बेमुदत धरणे आंदोलन करीत होते. काल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला आणि त्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांना ठाम पाठिंबा दर्शविला. यानंतर मंगेश दादा चव्हाण यांनी तातडीने पुढाकार घेऊन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाचे अधिकारी,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातून गेल्या काही दिवसांपासून लहान मुलं आणि मुली पळवण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रकरणांमध्ये अपहरण झालेल्या मुलांचा अजूनही शोध लागलेला नसल्याचे चित्र आहे. ही समस्या गेल्या काही वर्षांपासून वाढत असतानाही राज्य सरकार किंवा पोलिस प्रशासनाकडून ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्याचे दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. बालकांच्या सुरक्षेसारखा अत्यंत संवेदनशील मुद्दा दुर्लक्षित राहणे हे राज्यासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. राज ठाकरे यांनी हिवाळी…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील गांधली येथून १० रोजी बेपत्ता झालेल्या १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह दोन दिवसांनी गावातीलच एका शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गांधली येथील जयश्री संजय संदानशिव (वय १८) ही बारावीचे शिक्षण घेणारी तरुणी १० रोजी दुपारी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला, मात्र तिचा काहीही थांगपत्ता लागला नव्हता. दरम्यान, १२ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता जयश्रीच्या वडिलांना सुनील पाटील यांचा फोन आला. त्यांनी गांधली येथील धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली.…
पाचोरा : प्रतिनिधी मुंबईत पोलीस दलात कार्यरत असलेल्या मावस काकाने अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी तिचा गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित काका फरार झाला आहे. तर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावात आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मुंबई येथे पोलीस दलात असलेल्या तिच्या मावस काकाने मे व जून २०२५ मध्ये अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची कुणालाही वाच्यता केल्यास ‘तुला पोलिस होऊ देणार नाही’ अशी धमकीही त्याने दिल्याचे…

