Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेची जवळपास सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, आज दुपारी 4 वाजता आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या तारखा, मतदानाचा कालावधी तसेच निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता तात्काळ लागू होईल. त्यामुळे संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये नवीन घोषणा, निर्णय आणि विकासकामांवर निर्बंध येणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन आणि राजकीय पक्षांची हालचाल वाढणार असून, निवडणूक प्रचाराला वेग येईल. राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, आगामी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे वचन पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली असून, कर्जमाफीचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच मिळावा यावर सरकारचा ठाम भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. कर्जमाफी योजनेसंदर्भातील अधिकृत घोषणा १ जुलैपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात सिंचनाचा एकूण १३ लाख ८३ हजार हेक्टरचा अनुशेष होता. त्यापैकी १३ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राचा अनुशेष पूर्ण करण्यात आला असून, आता अकोला, बुलडाणा व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील केवळ ४९ हजार हेक्टरचा अनुशेष शिल्लक आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात दुष्काळ हा भूतकाळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या नागरिकाची हातचालाखीने फसवणूक केल्याची घटना जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत घडली आहे. पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी तरुणांनी १३ हजार रुपये लांबविल्याचा प्रकार २८ नोव्हेंबर रोजी घडला असून, याप्रकरणी १३ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर कॉलनीतील रहिवासी सतीश दशरथ चौधरी (वय ५७) हे त्यांच्या मित्राच्या मुलीला ५० हजार रुपये पाठविण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत गेले होते. बँकेत स्लिप भरत असताना शेजारी बसलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. त्यानंतर चौधरी यांनी खिशातून ५० हजार रुपयांची रोकड काढली असता, दोघांनी ‘आम्ही पैसे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लग्न सोहळ्यावरून परतून रिक्षाने घरी जात असताना प्रभावती चुडामण वडीलकर (५९, रा. न्यू पार्वती काळेनगर) यांच्या पर्समधून दोन सहप्रवासी महिलांनी ९८ हजार रुपयांचे दागिने लांबविले. ही घटना ६ डिसेंबर रोजी रेल्वे स्थानक ते न्यू पार्वती काळे नगरदरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथे नातेवाइकांकडे लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या प्रभावती वडीलकर या ६ डिसेंबर रोजी रेल्वेने जळगावला आल्या. रेल्वे स्थानकावरून त्या रिक्षाने (क्र. एमएच १९, सीडब्ल्यू ३७७१) घरी जात असताना थोड्या अंतरावरून दोन महिला रिक्षात बसल्या व बसस्थानकाजवळ उतरल्या. वडीलकर या घरी गेल्या व त्यांनी पर्समध्ये ठेवलेले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून नजीक असलेल्या निमखेडी येथील सागर साहेबराव सोनवणे या तरुणाच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (१४ डिसेंबर) रोजी घडली. या खूनप्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. रविवारी रात्री मारेकऱ्यांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केले आणि त्याला जखमी अवस्थेत निमखेडी गावात फेकून दिले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांसह ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी सागरला मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१५ डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आणि उत्साहाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व दिसून येईल. लोकांकडून चांगली मदत मिळेल. भागीदारीत काम केल्यास मोठा फायदा होईल. घरात आनंदी आणि सुसंवादी वातावरण राहील. तुमचा आत्मविश्वास उच्च असेल. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना आज जास्त मेहनत करावी लागेल, पण तुमच्या कामाचे नक्कीच चांगले फळ मिळेल. नोकरीत सुधारणा दिसेल. वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. पैशाच्या बाबतीत स्थिरता राहील. पण मोठा धोका असलेले व्यवहार टाळा. कामाच्या ताणामुळे आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांना आज चांगल्या संधी येतील आणि नवीन मार्गांनी पैसे मिळतील. शिक्षण…

Read More

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; ग्रामीण युवकांना रोजगाराची नवी दिशा जळगाव : प्रतिनिधी “प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही ग्रामीण युवक, महिला व शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. प्रत्येक गावात असे प्रक्रिया उद्योग उभे राहिले, तर स्थानिक रोजगार निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल. या योजनेंतर्गत पिंप्री येथे स्वामी कुल्फी उद्योग केंद्रामुळे १५ ते २० स्थानिक नागरिकांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लघुउद्योगांना चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पिंप्री खुर्द येथे आज स्वामी कुल्फी या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग केंद्राचा भव्य व उत्साहपूर्ण शुभारंभ पालकमंत्री तथा स्वच्छता…

Read More

विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्यूज जळगाव महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्व प्रमुख पक्षांकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यासोबतच मुलाखतींचा टप्पा सुरू झाल्याने निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. शिवसेना उबाठा गटाने आजपासूनच १९ प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. या मुलाखतींमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून प्रत्येक प्रभागातून उमेदवार निवडीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या मुलाखती होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने देखील उमेदवार निवडीसाठी आपली तयारी पूर्ण केली आहे. सोमवार, दि. १५ पासून मंडळी व प्रभागनिहाय वेळापत्रकानुसार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातले आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील,” असा दावा आंबेडकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होणाऱ्या मेगा भरतीमुळे शिंदे गटाची कोंडी झाली होती. या नाराजीतून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. यानंतर शिंदेंनी तडकाफडकी दिल्ली गाठून…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील सुनसगाव येथे विटांचे ट्रॅक्टर आल्याचे खोटे सांगून एका दाम्पत्याकडून ५० हजार रुपये लुबाडल्याची धक्कादायक घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी घडली. विशेष म्हणजे ही फसवणूक भर वस्तीतील मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या करण्यात आली असून संबंधित अज्ञात भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुनसगाव येथील सुपडू बोराळे (वय ४५, मजुरी) व पल्लवी बोराळे (वय ४०, अंगणवाडी सेविका) हे आपल्या कुटुंबासह गावातील मुख्य रस्त्यालगत वास्तव्यास आहेत. दुपारी सुमारे २ वाजता एक अनोळखी इसम मोटारसायकलवर त्यांच्या घराजवळ आला. ‘विटांचे ट्रॅक्टर आले असून रस्ता दाखवा,’…

Read More