जळगाव : विजय पाटील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून बहुपक्षीय लढतीची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. २०१८ च्या निवडणुकीत भाजपने चारही जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र आता भाजपसमोर गड राखण्याचे मोठे आव्हान उभे आहे. शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, एमआयएम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांकडून उमेदवार उभे राहणार असल्याने प्रभागात चुरशीची लढत रंगणार आहे. पक्षाकडून उमेदवार निश्चित झाल्यावर प्रचाराची व विजयाची रणनीती आखण्याची तयारीला आता सुरुवात झाली. या प्रभागावर पूर्वी सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व व दबदबा होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथे भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्रीपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत सक्रिय सहभाग घेत होते. मात्र शनिवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात आले. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच्या कामकाजात त्यांना सहभागी होता आले नाही. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन उदय…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच अंबरनाथ शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. अंबरनाथ पश्चिमेतील शंकर मंदिर परिसरात असलेले हे कार्यालय नेहमीच नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांच्या वर्दळीचे केंद्र मानले जाते. त्यामुळे भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार,…
यावळ : प्रतिनिधी ऑनलाइन अॅपवर घर (फ्लॅट) शोधण्याचा प्रयत्न चितोडा (ता. यावल) येथील तरुण महिलेला चांगलाच महागात पडल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ठगाने फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली २९ वर्षीय महिलेकडून तब्बल २ लाख ३८ हजार ३१९ रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोमवार, १५ डिसेंबर रोजी यावल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चितोडा गावात राहणाऱ्या कल्याणी नितीन महाजन (वय २९) यांनी ६ डिसेंबर रोजी ‘नो ब्रोकर’ या ऑनलाइन अॅपवर फ्लॅट शोधण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ‘रमाकांत कुमार’ असे नाव सांगणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधत फ्लॅट उपलब्ध असल्याचे सांगितले. आरोपीने…
जळगाव : प्रतिनिधी घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असतांना घटस्फोटाचे बनावट दस्ताऐवज दाखवित पतीने दुसरे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पहिल्या पत्न ीच्या फिर्यादीवरून पती स्वप्नील अरुण चौधरी, त्याची दुसरी पत्नी राजश्री रोहिदास कोळी उर्फ राजश्री स्वप्नील चौधरी हिच्यासह नऊ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवकॉलनीत राहणाऱ्या वैशाली स्वप्निल चौधरी (वय ३७) यांचा दि. १८ मे २०१३ रोजी धुळे येथील स्वप्नील अरुण चौधरी यांचे लग्न झाले. नंतर न्यायालयात घटस्फोटासंदर्भात दावा दाखल केलेला आहे. या दाव्याच्या कामकाजासाठी वैशाली चौधरी या न्यायालयात आल्या त्या वेळी त्यांची ओळख कविता किरण सपकाळे…
आजचे राशिभविष्य दि.१७ डिसेंबर २०२५ मेष राशी व्यवसाय करणाऱ्यांनी आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी इतरांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या योजनांमध्ये शेवटच्या क्षणी बदल देखील होऊ शकता. घरात जोडीदाराशी वाजू शकतं, रात्री बाहेर जेवायला जा, संवादाने प्रॉब्लेम्स सुटतील. वृषभ राशी आज तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. कपड्याच्या व्यवसायात असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या व्यवसायाचा नफा दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं. आर्थिक स्थिती सुधारल्याने निश्चिंत वाटेल. मिथुन राशी आज तुमचे मित्राशी मतभेद होऊ शकतात. इतरांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता खात्री करून घ्या मगच निर्णय घ्या. महिलांना आज अनपेक्षित आर्थिक…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावातून शाळेतून घरी परतत असताना रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह तब्बल चार दिवसांच्या शोधानंतर गावालगतच्या एका विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुमारे ६० ते ७० तास चाललेल्या शोधमोहिमेचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला. धनश्री शिंदे ही गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तातडीने शोध सुरू केला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी ती ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली होती. मात्र, त्यानंतर तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.…
चंद्रपूर : वृत्तसंस्था कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला सावकाराने चक्क स्वतःची किडनी विकण्यास भाग पाडल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांच्यावर हा अमानुष प्रकार घडला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्यात गेल्यानंतर त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये कर्ज घेतले. मात्र, दुर्दैवाने खरेदी केलेल्या दुधाळ गायी मरण पावल्याने कर्जाचा डोंगर वाढतच गेला. कर्ज फेडण्यासाठी कुडे यांनी दोन…
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांच्यात युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुढील एक ते दोन दिवसांत या युतीबाबत मोठी बातमी मिळेल, असा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत महापालिका निवडणुकीत युतीच्या…
भडगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात मंगळवारी (दि. १६) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारातील संरक्षण भिंतीवरून घसरून थेट शाळेलगतच्या नाल्यात पडल्याने दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे) अशी मृत बालकांची नावे आहेत. आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या नर्सरी वर्गात शिकणारी ही दोन्ही बालके शाळेच्या आवारात खेळत असताना वर्गाबाहेर गेली. खेळता खेळता ते संरक्षक भिंतीजवळ पोहोचले आणि अचानक तोल गेल्याने भिंतीवरून थेट नाल्यात पडले. नाल्याच्या पाण्यात बुडाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्यावर ही घटना…

