Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था मुख्यमंत्री कोट्यातील शासकीय सदनिका गैरमार्गाने लाटल्याप्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळ्यात प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली असून कोकाटे बंधूंचे अपील फेटाळले आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोकाटेंचे मंत्रिपद काढून घेणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री कोट्यातून मिळालेल्या शासकीय सदनिकांसाठी बनावट कागदपत्रे सादर करून त्या बळकावल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना यापूर्वी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मथुरा येथील यमुना एक्सप्रेसवेवर दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला. बलदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माइलस्टोन क्रमांक १२७ येथे सात बस आणि तीन कार एकमेकांवर आदळल्या. या अपघातानंतर काही वाहनांना आग लागली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या भास्करच्या वार्ताहरांना काही बसमध्ये मानवी शरीराचे अवयव अडकलेले आढळले. एका तरुणाने बसमधून आठ ते नऊ मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले. जळालेले अवशेष १७ प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रुग्णालयात पाठवण्यात आले असून डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार आहे. या भीषण अपघातात किमान ६६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलाचे लग्नासाठी चाळीसगाव येथे गेलेल्या शरिफ मुराद खाटीक (वय ५२, रा. सुप्रिम कॉलनी) यांच्या बंद असलेल्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने असा एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. १३ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रिम कॉलनीत शरीफ मुराद खाटीक (वय ५२) हे वासतव्यास असून त्यांचा मोठा मुलगा अकील शरिफ खाटीक हा लहानपणापासून चाळीसगाव येथे त्याच्या मामाकडे राहतो. दि. १६ डिसेंबर रोजी त्याचे लग्न असल्यामुळे दि. १३ डिसेंबर रोजी खाटीक कुटुंबिय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नवीन वीजमिटर बसविण्यासाठी अगोदर चार हजार दिले. परंतू वीजमिटर न बसल्याने चौकशीसाठी गेलेल्या डॉक्टरकडून दोन हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे (वय ५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे डॉक्टर असून त्यांचा मुलाच्या नावे वीजमिटर घेण्याकरीता वायरमन लोंढे यांना भेटले. त्यांनी वीजमिटरसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची चौकशी केली असता, लोंढे यांनी चार हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार डॉक्टर यांनी चार हजार रुपये देखील दिले. परंतू आत्मारमा लोंढे यांनी वीजमिटरचे काम केले नव्हते. दरम्यान, तक्रारदार यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील निमखेडी येथील सागर साहेबराव सोनवणे (३०) या तरुणाचा अनैतिक संबंधाच्या वादातून खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर (दोघे रा. निमखेडी) या दोन जणांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, सागर सोनवणे याचे चार वर्षापासून एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याविषयी त्याला वारंवार समजावून महिलेशी संबंध तोडण्याविषयी सांगितले. मात्र तो कोणाचेही ऐकत नव्हता. महिलेच्या सोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या वादातून सागर व अनिल सखाराम नन्नवरे यांच्यात अनेक वेळा वाद झाले. रविवारी (१४ डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता पुन्ह अनिल नन्नवरे आणि संदीप बाविस्कर (दोघेही रा.…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१६ डिसेंबर २०२५ मेष राशी उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे, गुड न्यूज मिळेल. आज तुम्हाला तुमच्या धाकट्या भावाकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या जोडीदारासोबतचे झालेला वादमिटवा, घरात शांतता नांदेल. वृषभ राशी या राशीच्या आर्किटेक्टसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. शेतकऱ्यांना आज काही फायदे मिळू शकतात. त्यांना त्यांच्या पिकांच्या विक्रीसाठी जमीनदाराकडून इच्छित रक्कम मिळू शकते. मिथुन राशी आज तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल. त्यांचे आशीर्वाद संध्याकाळपर्यंत तुमच्या मनावर नक्कीच परिणाम करतील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांशी त्याबद्दल चर्चा करू शकता. कर्क राशी…

Read More

नागपूर : प्रतिनिधी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नागपूर महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. “माझ्या राजकीय आयुष्यात चांगले रस्ते मोठ्या प्रमाणात झाले आहेत. आता किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, किती जणांना सस्पेंड करतो, याचा रेकॉर्ड माझ्या नावावर व्हावा, यासाठी मी देशभर हात धुवून मागे लागलो आहे,” असा थेट इशारा गडकरी यांनी दिला. जनतेला चुकीसाठी शिक्षा होते, मात्र नियमानुसार वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे काय करायचे? असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर बोट ठेवले. विकासकामांमध्ये दिरंगाई, निष्काळजीपणा आणि नियमभंग सहन केला जाणार नसल्याचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या व मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने आज (१५ डिसेंबर) जाहीर केला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा केली. घोषणेनुसार, राज्यातील एकूण २९ पैकी २७ महानगरपालिकांची मुदत संपलेली असून, सर्व महापालिकांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित २९ महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन विकासकामे, घोषणा आणि निर्णयांवर तात्काळ निर्बंध आले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांच्या घोषणेमुळे राज्यातील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मतदार याद्यांमधील कथित घोळामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याच्या काही वेळ आधीच ही घटना घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांतील त्रुटींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी कळवा येथील आयोगाच्या कार्यालयात आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे कार्यकर्ते सकाळी ११ वाजल्यापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी मतदार यादीतील गंभीर…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद व महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घेणे बंधनकारक असल्याने, येत्या महिन्यात राज्यातील बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुका होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद जाहीर केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी व विरोधक दोन्ही बाजूंनी हालचालींना वेग आला आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून आता विरोधकांनी थेट निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले…

Read More