जळगाव : प्रतिनिधी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई टाळण्यासाठी आणि दारूचा अवैध धंदा विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह त्याच्या खासगी चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल व उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या वडिलांवर यापूर्वी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अन्वये कारवाई न करण्यासाठी तसेच तक्रारदाराचा दारूचा धंदा यापुढेही सुरळीत चालू ठेवण्यासाठी दुय्यम निरीक्षक विजय भास्कर पाटील याने लाचेची मागणी केली होती. पाटील याने प्रति महिना १,५०० रुपये याप्रमाणे १२…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचेही वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे ज्या १४ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा स्थिर आहे, त्या ठिकाणच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून, येत्या २१ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या प्रक्रियेनंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांत, म्हणजेच २३ ते ३० डिसेंबरदरम्यान, आरक्षणाची मर्यादा स्थिर असलेल्या १४ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.…
जळगाव : विजय पाटील महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून विविध पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व त्याच्याकडून अर्ज भरून घेत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पार्टी कडून सर्वात जास्त इच्छुक उमेदवार असून महायुती झाल्यास भाजप व शिवसेना शिंदे गट हे दोन्ही मित्र पक्ष जागेचा तिढा कसा सोडवणार याकडे देखील लक्ष लागून असणार आहे. तर शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यातील काडीमोड झाल्याने व एम आय एम पक्ष देखील ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याने या प्रभागात निवडणुकीची चांगलीच रंगतदार लढती पहावयास मिळणार आहे. गेल्या वेळी २०१८ च्या पंचवार्षिक निवडणुकीत चारही जागांवर भाजपचे उमेदवार येथे विजयी झाले…
भुसावळ : प्रतिनिधी जळगाव नाका परिसरात बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गोळीबार झाला. यात उल्हास गणेश पाटील (वय ३९) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरु आहेत. हा प्रकार व्यापारी संकुलाजवळील पानाच्या टपरीवर लुटमारीच्या प्रयत्नातून झाल्याचे समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खळवाडी पुलाच्या बाजूला असलेल्या संकुलाजवळ असलेल्या पानाच्या टपरीवर बुधवारी रात्री चार अज्ञात तरुण आले. त्यांनी टपरीवर गोंधळ घातला. त्यातील एकाने रोकड हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उल्हास गणेश पाटील याने त्यास विरोध करत हटकले. त्याचवेळी चौघांपैकी एकाने बंदूक काढून पाटील यांच्यावर गोळी चालवली. ती गोळी उजव्या खांद्याला लागली. गोळीबारानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले. नागरिकांनी तत्काळ जखमी…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे चोरट्यांना आता सोने चांदी, रोकड मिळाली नाही तर ते घरातील पीठ आणि हिवाळ्यात बनविल्या जाणाऱ्या मेथीच्या लाडूंवरही डल्ला मारत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे एकाच रात्री सात घरफोड्या झालेल्या मनूर येथे यामुळे संतापासह थोडी गंमतही केली जात आहे. १४ ऑक्टोबर रोजी नाडगाव येथे चार घरे फोडून चोरट्यांनी तब्बल २५ तोळे सोने लांबविले. त्यानंतर ३० ऑक्टोबरला पुन्हा नाडगावात चार घरे फोडत दोन लाख रुपयांची रोकड व पाच तोळे सोने चोरले. पाच नोव्हेंबरला सोनोटी-नाडगाव शेतशिवारातून ११ शेतकऱ्यांच्या सुमारे हजार मीटर केबल चोरीस गेल्या. ३ डिसेंबरला…
आजचे राशिभविष्य दि.१८ डिसेंबर २०२५ मेष राशी आज, तुम्हाला लोकांकडून जे मनवून घ्यायचं आहे, तसंच होईल. पण तुमच्या अधिकार गाजवण्याच्या तुमच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवा; त्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लोकांना आज जवळच्या व्यक्तीकडून काही चांगली बातमी मिळू शकते. वृषभ राशी आज डोक्याने नाही मनाने निर्णय घ्याल, पण ते फक्त आर्थिक बाबींमध्येच फायदेशीर ठरतील. जर तुम्ही आज येणाऱ्या सर्व आव्हानांना धैर्याने तोंड दिले तर तुम्हाला यश मिळेल. तथापि, तुमचे भविष्य सुधारण्यासाठी तुम्हाला यावेळी आळस सोडावा लागेल मिथुन राशी नोकरीसंदर्भात चांगली बातमी मिळेल. तुम्हाला एखाद्या कंपनीत मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाऊ शकते. या राशीच्या इच्छुक लेखकांचा आजचा दिवस चांगला जाऊ…
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास आज मान्यता दिली. या सुधारणीनुसार उमेदवारी अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार असून, त्याविरोधात जिल्हा न्यायालयात अपील करता येणार नाही. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत व कालबद्ध पद्धतीने पार पाडता याव्यात, यासाठी ही सुधारणा करण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत…
नाशिक : वृत्तसंस्था भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कडक कारवाई केली असून, नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील ‘लोकनेते आर.डी. (अप्पा) क्षीरसागर सहकारी बँक लिमिटेड’ वर १६ डिसेंबरपासून सहा महिन्यांसाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. आरबीआयच्या आदेशानुसार, बँकेला कोणतेही नवीन कर्ज वाटप करता येणार नाही, तसेच नवीन ठेवी स्वीकारणे, गुंतवणूक करणे किंवा मालमत्ता विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय बचत व चालू खात्यातून रक्कम काढण्यावरही तात्पुरती बंदी घालण्यात आली असून, याचा थेट फटका ठेवीदारांना बसला आहे. मात्र, बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाल्यासंबंधी केलेल्या विधानाचा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे. काँग्रेस नेत्याचे विधान देशभक्ती नव्हे तर देशद्रोह आहे. त्यांच्या विधानाच्या पाकिस्तानात हेडलाईन्स झाल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताचा पराभव केल्याचा धक्कादायक दावा केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमाने पाडण्यात आली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यासह…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे क्रीडामंत्री तथा निफाडचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून, अखेर त्यांच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायमूर्ती रुपाली नरवडीया यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या आदेशामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप याचिकाकर्त्या ॲड. अंजली दिघोळे-राठोड यांनी कोकाटे यांच्या अटकेसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी घेत न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. १९९५ साली मुख्यमंत्री कोट्यातून मिळणाऱ्या घरांच्या योजनेत गैरप्रकार करत माणिकराव कोकाटे व त्यांच्या भावांनी एकूण चार सदनिका लाटल्याचा आरोप आहे. या…

