Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी निंभोरा येथील पाच वर्षांच्या चिमुकल्याला रात्री फिरायला नेण्याचा वडिलांचा निर्णय अखेर जीवघेणा ठरला. दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्य शंकोपाल याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे निंभोरा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निंभोरा येथे वास्तव्यास असलेले कैलास शंकर शंकोपाल हे मंगळवारी रात्री घराबाहेर फिरण्यासाठी निघाले होते. यावेळी पत्नीने थंडीच्या रात्री लहान मुलाला बाहेर नेऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून त्यांनी पाच वर्षांचा मुलगा लक्ष्य याला दुचाकीवर सोबत घेतले. भुसावळकडून निंभोऱ्याकडे येत असताना वरणगाव रोडवरील हॉटेल शेर-ए-पंजाबजवळ महामार्गावरील दुभाजकावर त्यांच्या दुचाकीचा जोरदार अपघात झाला. या अपघातात कैलास शंकोपाल यांना किरकोळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आई साखरपुड्याला गेलेली असतांना निलेश मिलींद पाटील (वय २५, रा. ओंकार नगर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याची आई गावाहून घरी परतल्यानंतर त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी एकच आक्रोश केला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि. शहरातील ओंकार नगरात निलेश पाटील हा तरुण आईसह वास्तव्यास होता. दि. १७रोजी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेलेली होती. त्यामुळे निलेश हा घरी एकटाच होता, त्याने घरी कोणीही नसतांना छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी निलेशची आई घरी आल्यानंतर त्यांना घराचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कंपनीतून घरी परतणाऱ्या उद्योजक संजय रामगोपाल तापडीया यांचा वाहनाचा पाठलाग करीत रिक्षातून आलेल्या टोळक्याने त्यांना थांबवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ घडली. या हल्ल्यात तापडीया यांच्या डोक्यावर टणक वस्तूने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि,  एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असलेले संजय तापडीया हे नेहमीप्रमाणे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास (एमएच-१९, ईपी-१८१०) क्रमांकाच्या कारने कंपनीतून घरी जात होते. यावेळी एका रिक्षाने त्यांच्या कारचा पाठलाग केला. काही अंतरावर रिक्षातील चार ते पाच…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जळगाव नाका परिसरात बुधवारी रात्री पानाच्या टपरीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या घटनेच्या पुढील तपासात भुसावळ पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत गुरुवारी पहाटेच्या सुमारास तीन संशयितांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हे तिघेही संशयित आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील चौथ्या संशयित आरोपीचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव नाका परिसरात लुटमारीच्या उद्देशाने पानाच्या टपरीवर आलेल्या चौघांपैकी एकाने विरोध करणाऱ्या उल्हास गणेश पाटील (वय ३९) याच्यावर थेट गोळीबार केला होता. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची घोषणा केली आहे. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या ‘निवडणूक प्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र जारी केले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या सलग यशामुळे आमदार राजूमामा भोळे यांचा प्रभाव आणि संघटन कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला अधिकाधिक जागांवर विजय मिळवून देण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे. प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत जळगाव महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१९ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुमच्या व्यवसाय योजनेत बदल करणे महत्वाचे आहे. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन तुमच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल आणि सध्या तुमचे उत्पन्न तेवढेच राहील. नोकरी करणाऱ्यांना लवकरच स्थलांतर करावे लागू शकते. वृषभ राशी आज तुमच्यावर कामाचा मोठा ताण असेल, त्यामुळे तुम्हाला आळस दूर करावा लागेल. अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी हानिकारक असू शकतो, ज्यामुळे तुमच्या कौटुंबिक नातेसंबंधांना धोका निर्माण होऊ शकतो. लोकांशी नीट वागा, नम्रतेने बोला. मिथुन राशी कुटुंबातील मालमत्तेशी संबंधित समस्या आज सोडवली जाऊ शकते आणि तुम्हाला वरिष्ठांकडूनही मदत मिळेल. आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढल्यामुळे ताण येऊ शकतो. कर्क राशी जर तुम्ही तुमचा व्यवसाय…

Read More

जळगाव मनपाच्या प्रभारीपदी आ.मंगेश चव्हाण जळगाव  : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषदेची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या पत्रानुसार आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जळगाव भाजपमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेत शतप्रतिशत भाजपची सत्ता आणण्याच्या उद्देशाने आमदार चव्हाण हे आतापासूनच ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. संघटन मजबूत करणे, पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढवणे आणि कार्यकर्त्यांना कामाला लावणे या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे. याआधी जळगाव जिल्ह्यातील विविध नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये महायुतीला योग्य न्याय देत…

Read More

धाराशिव : वृत्तसंस्था धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात कंडारी ते सोनारी रस्त्यावर झालेला संशयास्पद अपघात अखेर खुनाचा असल्याचे उघड झाले आहे. जुन्या भांडणाच्या रागातून दोन मित्रांनी आपल्याच ३५ वर्षीय मित्राच्या डोक्यात जड वस्तूने वार करून क्रूरपणे खून केल्याचा गंभीर आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी आंबी पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही संशयित आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मयत मोतीराम जाधव हे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कुटुंबासह घरी जेवण करत असताना त्यांचे मित्र विष्णु कालीदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे हे मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले. पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी असल्याचे सांगून त्यांनी मोतीराम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका भागात २८ वर्षीय महिलेचा हात पकडून अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, १७ डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरी एकटी असताना संशयित आरोपी अक्षय मिस्तरी (वय २५, रा. पिंप्राळा) याने तिचा हात पकडून जबरदस्तीने घरात ओढले. त्यानंतर आरोपीने अश्लील चाळे करत महिलेचा विनयभंग केला. या घटनेनंतर धक्क्यात सापडलेल्या महिलेने तात्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपी अक्षय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष उघड केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील “माणिक मोती गळाले” असा उल्लेख करत राऊतांनी मंत्रिमंडळावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टप्प्याटप्प्याने राजकीय खेळी खेळत असून अखेरीस त्याचा सर्वाधिक फटका शिंदे गटालाच बसेल, असा इशारा त्यांनी दिला. फडणवीस हे दीर्घ राजकीय खेळ खेळणारे नेते असून “अखेरचा घाव हा मिंध्यांवरच घालतील” असा खोचक टोला लगावत राऊतांनी शिंदे गटाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुढे शिंदेंचा पक्ष अस्तित्वात राहील का? असा थेट सवाल करत त्यांनी महायुतीतील दोन घटक पक्षांना सावध राहण्याचा इशारा…

Read More