Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. १५ जानेवारीला 29 महानगर पालिकांसाठी मतदान पार पडणार आहे तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. सध्या सगळ्यांचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागले आहे. या ठिकाणी ठाकरेंसमोर गड राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे तर भाजप आणि शिंदेंची शिवसेना सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत. एकीकडे महायुतीची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मनरेगाचे नाव “विकास भारत जी-राम जी” असे बदलण्यावरून विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या विधेयकावरून सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, मोदी सरकारने मनरेगा उध्वस्त करून गरिबांच्या हितावर हल्ला केला आहे. त्याला काळा कायदा म्हणत काँग्रेस नेत्याने त्याविरुद्ध लढण्याची तयारी दर्शविली’. सोनिया गांधी म्हणाल्या, “मला अजूनही आठवते की २० वर्षांपूर्वी, जेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा संसदेत मनरेगा कायदा एकमताने मंजूर झाला होता. हे एक क्रांतिकारी पाऊल होते ज्यामुळे लाखो ग्रामीण कुटुंबांना, विशेषतः वंचित, शोषित, गरीब आणि अत्यंत गरीबांना फायदा झाला. यामुळे त्यांच्या मायदेशी, गावे आणि घरे…

Read More

जळगाव  : विजय पाटील  भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात युती होणार की नाही या बाबत अजून अस्पष्ट आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत अजूनही ट्विस्ट असला तरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये प्रभागात कोणाला उमेदवारी मिळेल? यावरून निवडणूक रंगतदार होणार आहे. यात प्रामुख्याने भाजप व शिवसेना या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये जास्त रस्सीखेच आहे. २०१८च्या निवडणुकीत भाजपने या प्रभागात वर्चस्व राखत चारही जागा जिंकल्या होत्या. मात्र, अडीच वर्षांत महानगरपालिकेत सत्तांतर नाट्य रंगल्याने चारही नगरसेवक शिवसेनेत गेले होते. त्यानंतर पुन्हा शिवसेना फुटीनंतर तीन माजी नगरसेवक भाजपत आले, तर एक नगरसेवक शिवसेनेत आहे. त्यामुळे प्रभागात कोणाला उमेदवारी मिळेल? यावरून निवडणूक रंगतदार होणार आहे. भाजपकडून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करून घराकडे परतणाऱ्या एका मजुरावर काळाने झडप घातली आहे. जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिमेंट वाहून नेणारा ट्रॅक्टर आणि एका मालवाहू पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टरवरील कामगाराचा जागीच मृत्यू झाला. संजय नामदेव सोनवणे (वय ४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे या दुर्दैवी मजुराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय सोनवणे हे जळगाव येथील मालधक्क्यावर सिमेंटच्या गोण्या भरण्याचे व उतरवण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे इतर सहकाऱ्यांसह सिमेंट भरलेला ट्रॅक्टर (क्र. MH 19 BG 6078) घेऊन चिंचोली गावाकडे गेले होते. तिथे सिमेंट खाली करून…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील केऱ्हाळे बु. येथे पत्र्याच्या शेडवर काम करत असताना खाली पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केऱ्हाळे बु. येथील एकता नगर परिसरात शिवम बाजीराव पाटील यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडवर काम सुरू असताना विजय दत्तात्रय पाटील (वय ४५, रा. केऱ्हाळे बु., ता. रावेर) हे अचानक शेडवरून खाली कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्युम्न महाजन यांनी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले. ही घटना गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२० डिसेंबर २०२५ मेष राशी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवाद राखण्यात यशस्वी व्हाल. आज मनोरंजनावर पैसे खर्च होऊ शकतात. वृषभ राशी आज नवीन व्यवसायात पैसे गुंतवल्याने तुमचा नफा दुप्पट होऊ शकतो. तुमच्या सकारात्मक विचारांनी खूश होऊन, तुमचा बॉस तुम्हाला एखादी उपयुक्त वस्तू भेट देऊ शकतो. मिथुन राशी जर तुम्ही नवीन जमीन घेण्याचा विचार करत असाल तर आजच ते करा, चांगला दिवस आहे. याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क राशी तुम्ही तुमच्या कुटुंबासह बाहेर जेवायला जाऊ शकता. आज तुमच्या मनात नवीन कल्पना…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून, शुक्रवारी (दि. १९) मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जुन्या वादातून हा थरारक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून, एका तरुणावर सलग दोन राऊंड फायर करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत रोहिदास कोळी  हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. मध्यरात्री स्टेशन परिसरात शुकशुकाट असताना अज्ञात हल्लेखोरांनी रोहिदासला गाठून कोणतीही पूर्वसूचना न देता त्याच्यावर दोन वेळा गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत रोहिदासला तात्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या…

Read More

बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून या सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते. बीड न्यायालयात आज सकाळी 11 वाजता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली असून, सरकारी पक्षाच्या वतीने वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीचा युक्तिवाद मांडला. मात्र त्यानंतर वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे कारण देत त्यांना या खटल्यातून बाजूला करावे, असा अर्ज न्यायालयात सादर केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संतोष देशमुख हत्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था घराची वाटणी करून देण्यात यावी, या कारणावरून जन्मदात्या आई-वडिलांवर खुरपं, दगड व काठीने हल्ला करून, हाताची नस काचेने कापत अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हुपरी शहरात घडली. शहरातील महावीर नगर येथील अल्फालाईन गल्लीमध्ये आज (दि. १९) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत विजयमाला नारायण भोसले (वय ७०) आणि नारायण गणपतराव भोसले (वय ७८) या वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुलगा सुनील नारायण भोसले (वय ४८) याने खून केल्यानंतर स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार सांगितला आहे. नारायण भोसले हे पत्नी विजयमाला व मुलगा सुनील…

Read More

जामनेर : प्रतिनिधी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील घनदाट जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या किरकोळ वादातून या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले असून, एमआयडीसी पोलिसांनी गुजरात राज्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि,  जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय २७) हा तरुण १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता. निलेशचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. दरम्यान, रामदेववाडी परिसरात त्याची दुचाकी आढळून आल्यानंतर एमआयडीसी…

Read More