Author: editor desk

आजचे राशिभविष्य दि.२२ डिसेंबर २०२५ मेष राशी तुम्हाला नवीन टेंडर मिळू शकतात किंवा रखडलेले जुने टेंडरही पुन्हा तुम्हालाच मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांचा सल्ला ऐकणं आज खूप फायदेशीर ठरेल. सर्वांशी विचारपूर्वक बोला आणि अनावश्यक वाद टाळा. वृषभ राशी आज तुम्ही सुरू केलेले कोणतेही काम सहज पूर्ण होईल. या राशीखाली जन्मलेल्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. त्यांना पदोन्नती देखील मिळू शकते. मिथुन राशी करिअरमध्ये प्रगतीचा आज उत्तम योग आहे, पण आज तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात शिक्षकांचा पाठिंबा मिळेल आणि यशस्वी होतील. आज तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा. कर्क राशी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, नगरपालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर शिवसेना, अपक्ष तसेच इतर पक्षांनाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे पाटील योगेश नारायण (पिंटू शेठ) यांची निवड झाली आहे. नगरसेवक पदासाठी एकूण २१ सदस्य निवडून आले असून, भाजपचे अनेक उमेदवार विजयी झाल्याने पक्षाचे नगरपालिकेवर वर्चस्व निर्माण झाले आहे.  या निवडणुकीत शिवसेनेनेही दमदार कामगिरी करत अनेक प्रभागांत विजय मिळवला आहे. तसेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि अपक्ष उमेदवारांनीही आपले खाते उघडले आहे. त्यामुळे नशिराबाद नगरपालिकेत विविध पक्षांचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींचे निकाल आज, २१ डिसेंबर रोजी जाहीर झाले. अनेक ठिकाणी महायुतीला मतदारांनी पसंती दिल्याचे चित्र असताना, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निकालाने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. या निवडणुकीत भाजप नेत्या व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी भावना महाजन यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शिंदेसेनेकडून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना चंद्रकांत पाटील या रिंगणात होत्या. निकालात संजना पाटील यांनी २५८३ मतांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा फैसला आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. सकाळपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएमद्वारे टप्प्याटप्प्याने मतमोजणी होणार आहे. मतमोजणीपूर्वी पोस्टल बॅलेटमधील मतांचा आढावा घेण्यात येतो. आतापर्यंतच्या कलानुसार भाजपने राज्यभरात मोठी आघाडी घेतली असून, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अनुक्रमे पुढील स्थानावर आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार महायुती 150 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असल्याचे संकेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसचे तुलनेने चांगले प्रदर्शन दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. राज्यपातळीवर महायुती आणि महाविकास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कपडे विक्रीसाठी आसोदा येथे जात असताना वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे नंद साबणदास जगिया (६८, रा. भुसावळ) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी, दि. २० रोजी, दुपारी आसोदा सहींस रोडवर झाला. तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  भुसावळ येथील नंद जगिया हे कापड विक्रीसाठी बायपासवरून आसोदा सव्र्व्हस रोडने जात असताना त्यांना मालवाहू वाहनाने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. काही जणांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यांनी जगिया यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. बायपासवर अपघात झाल्याचा व्हिडिओ व्हाटस् अॅप ग्रुपवर शेअर करण्यात आल्यानंतर तो मयताचे पुतणे…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून, निकालाच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या लढतीत चुरशीचे चित्र पाहायला मिळत आहे. यात प्रभाग १ मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी धरणगाव शहर विकास आघाडीच्या लीलाबाई सुरेश चौधरी हे ४९० मतदानाने आघाडीवर, तर महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या भावे वैशाली विनय यांना ३२३ पाठलागावर असल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रभागनिहाय मतमोजणीत आघाडी–पिछाडी बदलताना दिसत असून, काही प्रभागांमध्ये जनविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याने निवडणूक आणखी अटीतटीची बनली आहे. त्यामुळे अंतिम निकालाबाबत अद्यापही स्पष्ट चित्र समोर आलेले नाही. दरम्यान, नगराध्यक्ष पदासह ९ प्रभागांतील नगरसेवक पदांची मतमोजणी सुरू असून, काही प्रभागांमध्ये विकास आघाडी…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२१ डिसेंबर २०२५ मेष राशी आज, तुमच्या आंतरिक शक्तीमुळे कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जाण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कलांमध्ये रस असलेल्यांना हा दिवस अनुकूल वाटेल. तुमच्या कलेची प्रशंसा देखील होऊ शकते. वृषभ राशी आज तुम्ही नवीन व्यवसायाची योजना देखील आखाल. महत्वाच्या निर्णयामध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाची योजना आखू शकता, ज्यामुळे तुमचे मन ताजेतवाने होईल. मिथुन राशी आज खूप एनर्जेटिक वाटेल. जर तुम्ही अधिक उत्साहाने, मन लावून काम केलं तर तुमचं काम कमी वेळेत पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात होणारे बदल आनंद आणतील. घरात सुरू असलेल्या कोणत्याही वैवाहिक समस्या लवकरच दूर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत आयोग भाजपचीच ‘बी-टीम’ म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले, “एवढा नालायक आणि निद्रावस्थेत असलेला निवडणूक आयोग कुठेही नाही. निवडणुकांच्या आधी सरकारी तिजोरीची लूट करून पैसे वाटायचे आणि त्यातून निवडणुका जिंकायच्या हा भाजपचा धंदा झाला आहे.” त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी आरोप केला की, भाजपकडून एकेका मतासाठी तब्बल ५० हजार रुपये वाटण्यात आले. “सध्या सर्वत्र बोगस मतदान आणि व्होटचोरी सुरू आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून, धमकावून निकाल फिरवले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार यांनी बिहारमधील…

Read More

वाशीम : वृत्तसंस्था वाशिम येथील भाजपच्या एका उमेदवाराकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित भाजप उमेदवाराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाशिम जिल्ह्यातील लाखाळा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजता घडली. ठाकरे गटाचे उमेदवार गुड्डू उर्फ प्रवीण डोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखेडे याने निवडणुकीच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत जीवे मारण्याची धमकी दिली. प्रवीण डोळे हे आपल्या मित्रांसोबत चर्चा करत असताना सतीश वानखेडे तेथे आला. निवडणूक आणि मतदानाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद वाढत गेला. वाद…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप व सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करत, आपले राजकारण सत्तेसाठी नसून मूल्यांसाठी असल्याचे ठामपणे सांगितले. “आम्हाला जर फक्त खुर्चीची आणि सत्तेची चिंता असती, तर आम्ही केव्हाच भाजपसोबत गेलो असतो. मात्र आमचे राजकारण मूल्यांवर आधारित आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी, पर्यावरणाचा ऱ्हास आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “देशातील एक तरी असे शहर दाखवा, जिथे भाजपशासित कारभारामुळे प्रत्यक्ष सुधारणा झाल्या आहेत. जिथे भाजप सत्तेत आली, तिथे विकासाऐवजी उलट प्रवास सुरू…

Read More