आजचे राशिभविष्य दि.२४ डिसेंबर २०२५ मेष राशी लवचिक वर्तन ठेवा आणि इतरांचे बोलणं समजून घेण्यास तयार रहा. आज एखादी वयस्कर व्यक्ती किंवा वरिष्ठ व्यक्ती अभ्यासपूर्ण सल्ला देऊ शकते. वृषभ राशी आज तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. एखादा सहकारी तुम्हाला ऑफिसचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यास मदत करेल. मिथुन राशी आज, तुमचे काम पूर्ण झाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल. संध्याकाळपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे घर आनंदाने भरून जाईल. कर्क राशी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे जवळचे नातेवाईक तुमची मदत घेतील. आज तुम्ही धार्मिक कार्यांवर अधिक लक्ष केंद्रित कराल. सिंह राशी आज जवळच्या मित्राच्या धार्मिक कार्यात सहभागी होता…
Author: editor desk
बीड : प्रतिनिधी जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी आज विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले असून, वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप मान्य नसल्याचे स्पष्ट केले. या खटल्याची पुढील सुनावणी दि. ८ जानेवारी रोजी होणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील काही धक्कादायक छायाचित्रे आणि मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनआक्रोश अधिक तीव्र झाला. बीडसह राज्यातील विविध जिल्ह्यांत मोर्चे काढण्यात आले होते. या प्रकरणात एक आरोपी अद्याप फरार असून उर्वरित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या हत्येप्रकरणात राज्याचे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्याच्या प्रक्रियेला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला. अर्ज प्रक्रिया सुरू होताच इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र महापालिका परिसरात पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सात दिवसांचा कालावधी उपलब्ध असल्याने, अर्जात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी इच्छुकांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यास प्राधान्य दिले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध प्रकारचे दाखले व कागदपत्रे आवश्यक असल्याने संभाव्य गर्दी लक्षात घेऊन उमेदवारांनी लवकर हालचाली सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाचा…
पुणे : प्रतिनिधी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला असून, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज उशिरा महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत पुणे महापालिकेसाठी जागावाटप, निवडणूक रणनीती आणि एकत्र लढण्याचा आराखडा ठरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चा…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या, बुधवार दि. २४ रोजी दुपारी १२ वाजता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर (एक्स) खात्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करत “उद्या १२ वाजता” असे कॅप्शन दिले आहे. या ट्वीटमुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार, याबाबतचा सस्पेन्स संपला आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील २९ महापालिकांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणुका २०२६ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होऊन ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, तर २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ३ जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून, १५ जानेवारी २०२६ रोजी एकाच टप्प्यात मतदान, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. अवघे २३ दिवस हातात असताना राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, प्रत्यक्ष निवडणूक तयारीपेक्षा युती-आघाडीतील गोंधळ आणि जागावाटपाच्या तिढ्यामुळेच अधिक चर्चा रंगताना दिसत आहेत. निवडणूक…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद रस्त्यावरील चिरमाडे पेट्रोल पंपासमोर सोमवारी रात्री ७वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या भरधाव कारने जळगावकडून अमरावतीकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जीएमसीत दाखल करण्यात आले आहे. धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन फेकली गेली. याच वेळी एअर बॅग उघडल्याने चालक व त्याच्या बाजूला बसलेला प्रवासी थोडक्यात बचावला. तर मालवाहू वाहन रस्त्यावरील दुभाजकावर चढले. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावकडे मारुती बलेनो चारचाकी (क्रमांक एमएच-१९, सीव्ही ६३८७) येत होती. तर महेंद्र पिकअप मालवाहू वाहन जळगावकडून अमरावतीकडे खजूर घेऊन जात होते. चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील खोटे नगर परिसरातून हॉटेल समोर बांधलेली हॉटेल मालकाची गाय चोरट्यांनी कारमध्ये कोंबून चोरून नेली. ही धक्कादायक घटना रविवार दि. २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता समोर आली आहे. गाय चोरून नेतांना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगर भागात असलेल्या ‘गावकरी हॉटेल’च्या समोर हॉटेल मालकाची गाय बांधलेली होती. रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात इसम पांढऱ्या रंगाच्या ब्रेजा कारमधून त्या ठिकाणी आले. त्यांनी अत्यंत सराईतपणे गाईला ओढत गाडीच्या मागील डिक्कीत कोंबले. काही सेकंदातच हा सर्व प्रकार आटोपून चोरट्यांनी गाडीसह तिथून पलायन केले. ही संपूर्ण थरारक चोरी हॉटेलच्या…
चाळीसगाव : प्रतिनिधी नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारामुळे आपला पराभव झाल्याच्या रागातून अपक्ष उमेदवार राकेश भीमराव बोरसे यांच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ रोजी दुपारी २.४५ वाजता स्वामी विवेकानंद कॉलनीत घडली असून, या प्रकारामुळे बोरसे कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक ३ मधून एका पक्षाचा उमेदवार पराभूत झाला असून, त्यास अपक्ष उमेदवार कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवराज पाटील, रोहित चौधरी, अजय राजपूत, नीलेश चौधरी यांच्यासह अन्य काही जणांनी बोरसे यांच्या घरासमोर जाऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली. “तुम्ही अपक्ष का उभे राहिलात? तुमच्यामुळे नितीन पाटील यांचा पराभव झाला”…
जळगाव : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील वाघोदा या मूळ गावी कुटुंब देवदर्शनासाठी गेलेले असताना घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख चार हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २० डिसेंबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिव कॉलनीमधील रहिवासी सुभाष रघुनाथ महाजन (७२) हे कुटुंबासह २० डिसेंबर रोजी सकाळी वाघोदा या मूळ गावी देवदर्शनासाठी गेले होते. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातून रोख चार हजार रुपयांसह सोनेचांदीचे दागिने, वस्तू मिळून एकूण एक लाख ४८ हजार…

