आजचे राशिभविष्य दि.२३ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा. तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल. मानसिक समस्या दूर होतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. तुमच्या सामाजिक ओळखी आणि आदर देखील वाढेल. वृषभ राशी आज तुम्हाला समजुतदारपणे वागावे लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमच्या वडिलांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुमची सकारात्मकता वाढेल. मिथुन राशी नकारात्मक विचारांमुळे दुःखी वाटू शकेल. तुमच्या कुटुंबात आनंद परत यावा यासाठी तुम्हाला लवकरात लवकर या विचारांतून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. कर्क राशी नोकरी करणाऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. काही प्रयत्नांनंतर मालमत्तेशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. तुमचे तुमच्या नातेवाईकांशी चांगले संबंध निर्माण होतील.…
Author: editor desk
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष आज नागपूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रामगिरी’ बंगल्यावर पाहायला मिळाला. या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने एकट्याने २०० हून अधिक नगराध्यक्ष निवडून आणत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. या विजयानंतर नागपूर जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विजयी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपच नंबर एकचा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्यातील तब्बल ७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे केवळ…
पुणे : वृत्तसंस्था आगामी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नवे समीकरण आकाराला येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला शह देण्यासाठी थेट काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. याच अनुषंगाने अजित पवार यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार, असा अंदाज बांधला जात असतानाच अजित पवारांनी काँग्रेसकडे मैत्रीचा हात पुढे केल्याने राजकीय चर्चांना वेग…
मुंबई : वृत्तसंस्था महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने आरोप करत आहेत. यातच आज दमानिया यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत पार्थ पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. यापूर्वी पार्थ पवारांच्या सहीचे पत्र दिले होते. पण तेव्हा त्यांनी सांगितलं की ते माझ्या सहीचे पत्र नाही. गेल्या 5-6 वर्षापासून हा घोटाळा सुरू आहे. अजित पवारांना हे सर्व माहीत होतं आणि राज्यातले मुख्यमंत्री…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून शेख हसीना विरोधी नेत्यांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. खुलना येथे सोमवारी दुपारी नॅशनल सिटिजन्स पार्टी (NCP) चे नेते मोहम्मद मोतालेब शिकदर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बांगलादेशी माध्यमांच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी मोतालेब शिकदर यांच्या डोक्याला लक्ष्य करत गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने खुलना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सध्या ते धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज यावर सुनावणी पार पडली असून, माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अपात्र ठरणार नसून, हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे. तीन दशकांपूर्वीच्या एका सदनिका वाटप प्रकरणातील अनियमिततेचा ठपका ठेवत नाशिक जिल्हा न्यायालयाने 3-4 दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जनतेचे आभार मानत पक्षाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. मात्र, याच निकालांवर न थांबता त्यांनी आता राज्यातील आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर बसवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर ठेवले आहे. त्याचबरोबर महायुतीमधील मित्रपक्षांकडून होणाऱ्या पदाधिकारी ‘फोडाफोडी’वर नाराजी व्यक्त करत या विषयावर मुंबईत सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांबाबत भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकांमध्ये मर्यादित जागांवर उमेदवार उभे केले होते. तरीही अनेक ठिकाणी पक्षाला चांगले यश मिळाले असून, या निकालांवर पक्षाचे नेतृत्व आणि…
जळगाव : प्रतिनिधी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संजय श्रावण काळे (वय ५२, रा. कोठारी नगर, हरिविठ्ठल नगर) यांना धावत्या रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील टॉवरसमोरील रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कोठारी नगरात संजय श्रावण काळे हे वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे रविवार दि. २१ रोजी सकाळच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. यावेळी आशाबाबा नगरासमोरील टॉवरसमोरील खांबा क्रमांक ४१६/२४ दरम्यान, त्यांना धावत्या रेल्वेची धडक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती रामानंद नगर पोलीसांना मिळताच पोहेकॉ…
पारोळा : प्रतिनिधी मुलीला पळवून नेल्याच्या रागातून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तरुणाच्या घराला आग लावून जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील कन्हेरे गावात घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, दुचाकी तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कन्हेरे येथील भिकन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांचा मुलगा अमोल पाटील हा १६ डिसेंबर रोजी गावातील एका मुलीला पळवून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही घरी परत न आल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पाटील कुटुंबीयांना धमक्या दिल्या होत्या. मुलगी घरी न आल्याचा राग मनात धरून संशयित कल्पेश…
चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव नगरपालिकेवर भाजपने बहुमताचा झेंडा फडकविला असून, थेट नगराध्यक्षपदी प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी शहर विकास आघाडीच्या पद्मजा राजीव देशमुख यांचा ६०१२ मतांनी पराभव केला. एकूण ३६ पैकी भाजपने २४, शहर विकास आघाडी १०, तर दोन अपक्षांनाही कपाळी विजयाचा टिळा लागला. रविवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळी १० वाजता अगोदर टपाली मतदानाची मोजणी झाली. एकूण १६ टेबलवर ७२ कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली. विजयानंतर जल्लोष करताना नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण आणि भाजपाच्या कार्यकर्त्यां. प्रतिभा चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासूनच…

