आजचे राशिभविष्य दि.२५ डिसेंबर २०२५ मेष राशी आज नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न करताना काही अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील एखाद्याला आरोग्य समस्या येऊ शकतात. वृषभ राशी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या सहयोगी जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता. मिथुन राशी आजचा दिवस आनंदाच्या बातम्यांनी भरलेला असेल. एक नवीन नोकरी तुमची वाट पाहत आहे. एखादा मित्र तुम्हाला एखाद्या मोठ्या संस्थेत काम करण्याची संधी देऊ शकतो. कर्क राशी आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल करावे लागतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल करणे तुमच्या हिताचे असेल. आज एखाद्या खास व्यक्तीशी संपर्क साधल्यास रखडलेले…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ईशान्य भारतातील आसाम राज्याच्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परिसरात कर्फ्यू लागू केला असून, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारासह अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला आहे. पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील व्हिलेज ग्राझिंग रिझर्व्ह (व्हीजीआर) आणि प्रोफेशनल ग्राझिंग रिझर्व्ह (पीजीआर) जमिनींवरील बेकायदेशीर कब्जा हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. मात्र या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने तीन दुचाकींना आग लावली, त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थिती अधिक चिघळू नये, तसेच हा हिंसाचार इतर जिल्ह्यांमध्ये पसरण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने भारतीय न्याय…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरेंची मनसेच्या युतीची घोषणा ठाकरे बंधू यांनी केल्यानंतर आज जळगावच्या राजकारणातही उमटले. या युतीच्या स्वागतासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जळगावात एकत्र आले आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. राज्यात युतीची घोषणा जाहीर होताच, जळगावातील आकाशवाणी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मनसे आणि उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्यासह उबाठा गटाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त करण्यात आला. कधीकाळी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने…
ठाणे : वृत्तसंस्था उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे जेलची हवा खाऊन चर्चेत आलेला तडीपार गुंड मयूर शिंदे याला अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आल्याचे समोर आले आहे. मकोका अंतर्गत आरोपी असलेल्या मयूर शिंदेच्या भाजप प्रवेशावर यापूर्वी तीव्र टीका झाल्यामुळे हा प्रवेश थांबवण्यात आला होता. मात्र, ठाणे महापालिका निवडणूक जवळ येताच मंगळवारी सायंकाळी हा पक्षप्रवेश उरकल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने या प्रवेशाचा फारसा गाजावाजा टाळला. ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले आणि काही निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मयूर शिंदेचा प्रवेश पार पडला. या प्रवेशाचे फोटोही सोशल मीडियावर…
नागपूर : वृत्तसंस्था “महाराष्ट्रावर आणि मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा आणि तिला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी आणि तिचे रक्षण करण्यासाठी लढावे लागेल,” असे स्पष्ट मत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू असून, आता मुंबईवर गुजरातचे नियंत्रण दिसू लागले आहे. यामुळे मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी संघर्ष करावा लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आल्याबद्दल प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, “कुटुंब एकत्र येत असेल तर…
मुंबई : वृत्तसंस्था उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर जोरदार टीका करत खिल्ली उडवली आहे. ठाकरे बंधूंची युती ही कोणतीही राजकीय क्रांती नसून, केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आल्याचा दावा फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले, “काही प्रसारमाध्यमे असे चित्र उभे करत आहेत की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. एकीकडे पुतीन आणि दुसरीकडे झेलेन्स्की निघाले आहेत. प्रत्यक्षात ही युती अस्तित्वासाठी केलेली धडपड आहे.” ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाहीत, असे ठामपणे सांगत त्यांनी या युतीचा कोणताही परिणाम महायुतीवर होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. ठाकरे बंधू…
मुंबई वृत्तसंस्था : “कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” या भावनेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात आज ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा झाली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. युतीची घोषणा करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच असणार.” या घोषणेसह त्यांनी महापालिका निवडणुकीच्या रणशिंगाचा निनाद केला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र यावेत, ही दीर्घकाळापासूनची जनभावना आज राजकीयदृष्ट्या साकार झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे म्हणाले की, “कोण किती जागा लढवणार, आकडे काय असतील हे आत्ता सांगणार नाही.…
महापालिकेत उमेदवार-कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिसांचा कडक बंदोबस्त जळगाव : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला मंगळवारी (दि. २३) अधिकृत सुरुवात झाली असून सकाळपासूनच महापालिकेच्या इमारतीत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. नामनिर्देशन अर्ज मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रभागनिहाय तब्बल ७७७ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळी दहा वाजताच अनेक इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या इमारतीत दाखल झाले. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारापासून रस्त्यापर्यंत मोठी गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह इमारतीतील दुसऱ्या आणि अकराव्या…
जळगाव : प्रतिनिधी दुकानाजवळ लघुशंका करून घाण करतात या संशयावरून दोन व्यापाऱ्यांत वाद झाला. एका व्यापाऱ्याने शिवीगाळ करून दुसऱ्या व्यापाऱ्याच्या डोक्यात इलेक्ट्रिक शेगडीची तांब्याची क्वाइल मारून दुखापत केली. सोमवारी दुपारी १२.१५ वाजता सेंट्रल फुले मार्केटमध्ये ही घटना घडली. शहर पोलिस ठाण्यात मारहाण करणारा व्यापारी व त्याचा मुलगा अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला. सविस्तर वृत्त असे कि, अमर चेतनदास कारडा (क्य ३७, रा. सिंधी कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार सोमवारी घनश्याम पोपली व त्यांचा मुलगा शेखर पोपली यांनी कारडा यांना दुकानाजवळ लघुशंका करतात असा संशय घेऊन शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या वेळी शेखर पोपलीने त्याच्या सतनाम इलेक्ट्रिकल्स दुकानातील इलेक्ट्रिक शेगडीची कॉपरची क्वाइलने डोक्यात…
फिनाइल प्राशन; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात २२ डिसेंबर रोजी विवाहिता सासरी नांदत असतानाच तिच्या माहेरी तलाकची नोटीस पाठविण्यात आल्याने मानसिक त्रासातून विवाहितेने फिनाइल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा पती आकीब शेख जहीर याने भुसावळ येथील माहेरी तलाकची नोटीस पाठविल्याचे तिच्या आईने फोनद्वारे कळविले. या घटनेमुळे व्यथित झालेल्या विवाहितेने सासू वैदा नाज शेख यांना याबाबत जाब विचारला असता, “माझ्या मुलाने दुसरे लग्न केले आहे, तू माहेरी निघून जा,” असे अपमानास्पद उत्तर…

