अमळनेर : प्रतिनिधी दुकानदारांना विविध वस्तूंचा वास देऊन त्यांना वश करून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचा प्रकार करणाऱ्या चार साधूंच्या टोळीला पब्लिकने चांगलाच चोप देऊन पोलीस स्टेशनला जमा केल्यावर तेथेही ‘प्रसाद’ दिला. अमळनेरात २५ रोजी ४ ते ५ साधूंच्या वेशातील टोळी दाखल झाली. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे रोडवरील तुळजाई हॉस्पिटल परिसरातील समर्थ ट्रेडिंगचे संचालक जितेंद्र पाटील या दुकानाजवळ ४ जणांच्या साधूंच्या वेशातील टोळी आली अन् टिळा लावला. तर कशाच्या तरी सुगंधाच्या नावाखाली वा गुंगी आणणाऱ्या औषधाचा वापर करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनतर साधूने बळजबरी दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तसेच जितेंद्र पाटील यांच्या गल्ल्यात हात घातला. या प्रकारात त्यांच्याकडून ५ हजारांची…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.२६ डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस गोंधळात टाकू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना सदस्यांची नाराजी ओढवून घेऊ नका. व्यवसायानिमित्त छोटी सहल होईल. परदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. कोणालाही पैसे उधार देणे टाळा, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांची आज प्रलंबित कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत प्रवासाचा योग आहे. करिअरच्या काळजीत असलेल्यांना नवीन नोकरीची संधी मिळेल. गुंतवणुकीचे नियम नीट समजून घ्या. वरिष्ठ आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांचे आज कामात मन लागणार नाही, अस्वस्थता जाणवेल. व्यावसायिकांनी सावध राहावे, चढ-उतार संभवतात. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. जुन्या गुंतवणुकीतून…
नाशिक : वृत्तसंस्था “मी गेल्या ४० वर्षांपासून पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. स्वतःसाठी कधीही जाहीर भूमिका घेतली नाही. मात्र माझ्या डोळ्यांसमोर सामान्य कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल, तर ते मी सहन करू शकत नाही,” अशा शब्दांत नाशिक भाजपच्या महापालिका निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांनी आपली खंत व्यक्त केली. नाशिकमध्ये झालेल्या बड्या पक्षप्रवेशांनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या कमालीच्या भावूक झाल्या असून, त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. नाशिकमध्ये भाजपने आज विरोधी पक्षांतील अनेक बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश करून ‘इनकमिंग’चा धडाका लावला. मात्र, या पक्षप्रवेशांमुळे भाजपमधील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे. विशेषतः माजी महापौर यतीन वाघ यांच्या प्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांचा…
मुंबई : वृत्तसंस्था भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार शब्दांत टीका करत राज ठाकरे यांच्या टोमण्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी ठाकरे बंधूंप्रमाणे कागदी वाघ नाही, तर खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा आणि लोकसभेत गेलो आहे,” असे म्हणत दानवेंनी राजकीय वातावरण तापवले आहे. ठाकरे गट आणि मनसे यांची बुधवारी बहुप्रतिक्षित युती जाहीर झाल्यानंतर या युतीवर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवेंनी टीका केली होती. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी “उत्तरे देवाला दिली जातात, दानवांना नाही,” असा टोला लगावला होता. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दानवेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या…
मुंबई : प्रतिनिधी राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असताना, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी). देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. अनेक वर्षांच्या मतभेदांनंतर ठाकरे बंधू — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — एकत्र आले असून, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेसह बीएमसी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असून, महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या राजकीय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात स्लीपर बसला आग लागून १० हून अधिक प्रवासी जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांचा आकडा १२ ते १७ दरम्यान असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हिरियूर तालुक्यात रात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळूरूहून गोकर्णकडे जाणारी खाजगी सीबर्ड ट्रान्सपोर्ट कंपनीची स्लीपर बस या मार्गावरून जात होती. बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी होते. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या एका लॉरीने रस्त्यावरील दुभाजक तोडत विरुद्ध बाजूने जाऊन बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसला तात्काळ आग लागली. प्रत्यक्षदर्शींनी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शाहू नगरात झालेल्या ड्रग्स कारवाईचे धागेदोरे हे मास्टर कॉलनीतील शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी याच्यापर्यंत पोहचल्यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो दुबई पळून गेल्याचा पोलिसांना संशय होता. परंतू गेल्या मालेगावात ड्रग्सची विक्री करतांना शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी (वय २७, रा. मास्टर कॉलनी, आक्सानगर) पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याला न्यायालयीन कोठडीतून जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शाहू नगरात शहर पोलीसांनी छापा टाकून साडेपाच लाख…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन मुख्य आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच या आरोपींनी ज्या व्यक्तीकडून शस्त्रे घेतली होती, त्याच्या घरावर छापा टाकून आणखी एक गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत. दि. १९ रोजी शहर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार विनोद पाटील, भूपेश वंजारी व पोकों. गोपाल पाटील यांच्या पथकाने सापळा रचून धुळे रोड परिसरातून दीपक सुभाष मरसाळे…
वरणगाव : प्रतिनिधी कच (खडी) घेण्यासाठी जाणारे ट्रॅक्टर उलटून त्याखाली दबून पिता आणि सात वर्षीय बालक ठार झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वरणगाव-किन्ही (ता. भुसावळ) रस्त्यावर घडली. यात एक जण जखमी झाला आहे. संजय श्रवण साबळे (४८) आणि भूषण संजय साबळे (७ वर्षे, रा. सिद्धेश्वरनगर, वरणगाव) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील सिद्धेश्वरनगरमधील मोलमजुरी करणारे संजय साबळे आणि अक्षय संतोष मोरे (२७) सकाळी खडी आणि कच घेण्यासाठी ट्रॅक्टरने किन्ही, ता. भुसावळकडे जात होते. संजय यांच्यासोबत त्यांचा सात वर्षांचा मुलगाही होता. किन्ही गावाजवळ ट्रॅक्टर अचानक उलटले. त्याखाली संजय साबळे आणि भूषण साबळे हे दबले गेले.…
जळगाव | विजय पाटील गेल्या काही दिवसांपासून जळगाव महापालिका निवडणुकीत महायुती होणार की नाही होणार याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. या चर्चांना बुधवारी रात्री भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर पूर्णविराम मिळालेला असून महापालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिंदे सेना हे महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत अजून चर्चा बाकी असल्यामुळे कोणाला किती जागा मिळणार याबाबत सस्पेन्स अद्यापही कायम आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये बुधवारी रात्री बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे निवडणूक प्रमुख तथा…

