Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील चिचोली गावात एका ४० वर्षीय तरुणाने पाण्याच्या टाकीजवळ गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २५ डिसेंबर) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाना अशोक पाटील (वय ४०, रा. चिंचोली, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. नाना पाटील हे आपल्या कुटुंबासह चिंचोली गावात वास्तव्यास होते. गुरुवारी सकाळी गावातील पाण्याच्या टाकीजवळ त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ही घटना गावातील सागर नाळकर व इतर ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने नाना पाटील यांना खाली उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेंदुर्णी जवळ असलेल्या मोराड (ता. जामनेर) येथे मुलगाच हवा या हट्टापायी जन्मदात्या पित्याने अवघ्या तीन दिवसांच्या आपल्या चिमुकल्या लेकीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) याला यापूर्वी तीन मुली असून चौथ्यांदा मुलगा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा मुलगीच झाल्याचा राग मनात साठवून ठेवत आरोपीने १४ नोव्हेंबर रोजी आपल्या तीन दिवसांच्या मुलीच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची हत्या केली. सुरुवातीला या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मुलीचा मृत्यू आईच्या हातातून पडल्यामुळे झाल्याचे सांगत आई-वडिलांनी पोलिसांची दिशाभूल…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२७ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुमचे लक्ष फक्त कामावर केंद्रित असेल आणि यशासाठी तुम्ही कठोर परिश्रम करण्यास तयार असाल. तुम्ही अधिक लोकांशी संपर्क साधाल आणि ते तुम्हाला मदत करण्यास उत्सुक असतील. वृषभ राशी तुमच्या संवाद कौशल्यामुळे इतरांवर प्रभाव पडेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर तुम्ही निकालांची चिंता न करता कठोर परिश्रम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही नवीन लोकांना भेटाल आणि व्यवसायात अनपेक्षित नफा अनुभवाल मिथुन राशी आज आखलेली तुमची नियोजित कामे आणि योजना यशस्वी होतील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यात नशीब तुमची साथ देईल. तुमचे गुण आणि काम तुम्हाला आदर देईल आणि तुमचा सामाजिक दर्जा…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज मुंबईतील टिळक भवन येथे जाहीरपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रशांत जगताप यांचे स्वागत करताना त्यांना गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक देण्यात आले. पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रशांत जगताप भावनिक झाले. “मी तब्बल २६ वर्षे शरद पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो. मात्र, सध्याची लढाई ही भाजप आणि संघ विचारधारेविरोधातील आहे. भाजपला खऱ्या अर्थाने टक्कर देण्याची ताकद केवळ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ज्येष्ठ नेते व माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. मनसेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अखेर त्यांनी शिंदे शिवसेनेचा मार्ग स्वीकारला. प्रकाश महाजन हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय होते आणि अधिकृत प्रवक्ते म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर जोरदार आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंचे सध्याचे राजकारण हे केवळ मतांसाठी केले जाणारे लांगुलचालन असून, त्यातून त्यांच्या विचारधारेची घसरण स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले की, काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी आणि मतांचे राजकारण साधण्यासाठी जे निर्णय घेतले जात आहेत, त्यातून संबंधित नेत्यांची दिशा, विचार आणि चारित्र्य जनतेसमोर उघड होत आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या सुपुत्रांकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये रशिद खान मामू…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रेल्वेने आजपासून प्रवासी भाड्यात वाढ लागू केली असून, त्यामुळे लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागला आहे. नव्या निर्णयानुसार प्रति किलोमीटर २ पैसे दराने भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ २१५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. त्यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार आहे. नव्या दररचनेनुसार, जर एखाद्या प्रवाशाने १००० किलोमीटर अंतरासाठी तिकीट बुक केले, तर त्याला सुमारे २० रुपये अतिरिक्त भाडे द्यावे लागेल. मात्र, २६ डिसेंबरपूर्वी तिकीट बुक केलेल्या प्रवाशांवर या भाडेवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. अशा तिकिटांवर सुधारित भाडे आकारले जाणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. आज किंवा आजनंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत विद्यार्थ्यांच्या पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. हमीद आयुब खान (वय २२, रा. मास्टर कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरी केलेले तीन महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आरोपीविरुद्ध यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे पावणे सहा वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानक परिसरात बसमध्ये चढताना निखिल राजू मानके (वय २०, रा. धानवड, ता. जळगाव), मयुर मांगू पाटील (वय २०, रा. चिंचखेडा, ता. जळगाव) यांच्यासह एका विद्यार्थिनीचा मोबाईल चोरट्याने हातचालाखीने लांबवला. चोरीचा प्रकार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी विषारी द्रव्य प्राशन करणाऱ्या अजय अरुण पाटील (वय २५, रा. हरिविठ्ठलनगर) या तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणारा अजय पाटील हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. दि. २३ रोजी रात्रीच्या सुमारास त्याने विषारी औषध प्राशन केल्यामुळे तो अत्यावस्थ अवस्थेत नशिराबाद रस्त्यावरील गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत होता. याबाबतची माहिती अजय पाटील याचा भाऊ नितीन पाटील याला मिळाल्यानंतर त्याने लागलीच अजय पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी समाजमाध्यमांवर ‘एक लाखाचे दहा लाख मिळतील’ असे आमिष दाखवून देशातील विविध भागातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर मुक्ताईनगर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नकली नोटांसह पाच मोबाईल जप्त केले असून दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एका आरोपीचा शोध सुरू आहे. सविस्तर वृत्त असे की ,  फेसबुक, व्हिडिओ रिल्स व इतर सोशल प्लॅटफॉर्मवरून सोन्याची नाणी, नागमणी, रेड मर्क्युरी, काळी हळद, उलटी वासना आदींच्या नावाखाली मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीस भाग पाडण्याचे प्रकार वाढले होते. कुऱ्हा दुरक्षेत्रातील मधापुरी, हलखेडा, लालगोटा, जोंधनखेडा व चारठाणा परिसरात नागरिकांना बोलावून मारहाण करत लूट केल्याच्या तक्रारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या…

Read More